एक्स्प्लोर

महाराष्ट्रातल्या सत्तापेचावर भेटीगाठींचा सिलसिला वाढला....कोण कुणाला भेटतंय?

निकालाला 14 दिवस उलटले तरी महाराष्ट्रातल्या सत्तास्थापनेचा तिढा काही सुटायला तयार नाहीय. आणि त्यातच एकापाठोपाठ एक बैठकीचा सिलसिला मात्र सुरु आहे. जे नेते आजवर एकमेकांना भेटत नव्हते तेही अशा परिस्थितीत भेटू लागलेत आणि त्यामुळे या भेटीगाठींची एक गंमतीदार साखळीच तयार झाली आहे.

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या दिवसरात्र बैठकांचा सिलसिला सुरु आहे. शरद पवार सोनिया गांधीना भेटतात. त्यानंतर दोनच दिवसात सोनिया गांधीचे उजवे हात अहमद पटेल नितीन गडकरींना भेटतात. मुख्यमंत्री सरसंघचालक मोहन भागवतांना भेटतात. तर तिकडे मुंबईत संजय राऊत पुन्हा पवारांना भेटतात. म्हणजे एक वर्तुळ पूर्ण. या सगळ्या भेटी गेल्या काही तासांत वेगवेगळ्या शहरांत झालेल्या आहेत. पण त्या सगळ्या भेटींची साखळी नीट जोडली तर त्यात एक समान लिंक नक्कीच दिसू शकते. आज सकाळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल हे दिल्लीत नितीन गडकरींच्या भेटीसाठी पोहोचले. दोनच दिवसांपूर्वी शरद पवार हे सोनिया गांधींना भेटले होते. त्यानंतर सोनिया गांधींचे उजवे हात गडकरींना भेटल्यामुळे भुवया उंचावल्या नसत्या तरच नवल. अहमद पटेल आणि नितीन गडकरींमध्ये जवळपास 20 ते 25 मिनिटे चर्चा झाली. गडकरी हे रस्ते वाहतूक मंत्री आहेत, त्यामुळे त्यांना कुणीही भेटू शकतं हे खरं असलं तरी ज्या टायमिंगला ही भेट झाली ती महत्त्वाची. या वेळेला आपण भेटल्यावर त्याचे वेगळे अर्थ काढले जाणार याची माहिती असतानाही हे नेते भेटले. शिवसेनेच्या बार्गेनिंग पॉवरची सगळी ताकद काँग्रेसच्या भूमिकेवर आहे असं असताना या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त होतं. अपेक्षेप्रमाणे अहमद पटेल यांनी मात्र या भेटीत आपण महाराष्ट्राचा 'म' ही उच्चारला नसल्याचं सांगितलं. शेतकरी, रस्त्याच्या प्रश्नावर नितीन गडकरी यांची भेट घेतली. ही राजकीय भेट नव्हती, महाराष्ट्राच्या राजकारणावर कोणतीही चर्चा झाली नाही, अशी माहिती अहमद पटेल यांनी भेटीनंतर दिली. आता अहमद पटेल आणि शेतीचा काय संबंध हे देव जाणो..पण या भेटीमुळे एक झालं..2014 नंतर गडकरींनी महाराष्ट्राच्या विषयात लक्ष घालणं बंद केलं होतं. पण सध्याची सत्ताकोंडी फोडण्यासाठी आता ते महाराष्ट्राच्या या सत्ताकारणाच्या खेळात महत्त्वाची भूमिका बजावताना दिसत आहेत. मुख्यमंत्री दिल्लीत आले तेव्हाही त्यांनी गडकरींची भेट आवर्जून घेतली होती. दिवसभरात चर्चेत राहिलेली दुसरी भेट म्हणजे पवार-राऊत..आज पवारांची महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद होत होती, त्याच्याच काही मिनिटे आधी संजय राऊत पवारांना भेटले. महाराष्ट्रातल्या निकालानंतरची त्यांची ही दुसरी भेट. युतीत एकत्र लढलेले शिवसेना-भाजपचे नेते अजून एकदाही चर्चेसाठी भेटलेले नाहीत, पण पवार-राऊत मात्र वारंवार भेटत आहेत, यातच सेनेचा आक्रमकपणा का वाढलाय याचं उत्तर दडलं आहे. या भेटीगाठींच्या साखळींमधली एक महत्त्वपूर्ण भेट तिकडे नागपुरातही पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मोहन भागवतांच्या भेटीला पोहोचले. शिवसेना आणि भाजपच्या युतीतला समान धागा म्हणजे हिंदुत्वाचा. त्यामुळे शिवसेनेला मनवण्यासाठी संघाची मदत घेतली जातेय का असाही प्रश्न त्यामुळे चर्चिला जाऊ लागला. निकालाला आता 14 दिवस उलटले आहेत. 9 नोव्हेंबरच्या आधी नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होणं आवश्यक आहे. त्या पार्श्वभूमीवर आता भेटींचा सिलसिला नेमकं काय उत्तर घेऊन येणार हे पाहणं औत्सुक्याचं असेल.

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 जुलै 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 जुलै 2026 | रविवार
Crime News: नालासोपाऱ्यातील काकांना फेसबुकवर 'रशियन' मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट, गोडगोड गप्पा मारुन भुलवलं अन् एका झटक्यात सात लाखांना चुना लावला
नालासोपाऱ्यातील काकांना फेसबुकवर 'रशियन' मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट, गोडगोड गप्पा मारुन भुलवलं अन् एका झटक्यात सात लाखांना चुना लावला
SIR News : मतदानाचे फॉर्म घेऊन घरी का आला नाहीस म्हणत BLOला मारहाण; परळीत 4 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल, तर वर्ध्यात SIRच्या कामात कुचराई भोवली; तीन कर्मचाऱ्यांचे निलंबन
मतदानाचे फॉर्म घेऊन घरी का आला नाहीस म्हणत BLOला मारहाण; परळीत 4 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल, तर वर्ध्यात SIRच्या कामात कुचराई भोवली; तीन कर्मचाऱ्यांचे निलंबन
Maharashtra Breaking LIVE Updates:सोनम वांगचुक यांना शिवसेना ठाकरे गटाकडून पाठिंबा; दादर येथील छ.शिवाजी पार्क परिसरात आज आंदोलन
Maharashtra Breaking LIVE Updates: सोनम वांगचुक यांना शिवसेना ठाकरे गटाकडून पाठिंबा; दादर येथील छ.शिवाजी पार्क परिसरात आज आंदोलन

व्हिडीओ

Nana patole Solapur : देशभरात मोठा उद्रेक सुरू, मोदी सरकारविरोधात रोष; नाना पटोलेंचा हल्लाबोल
SIR Form Pune Update : भाजप नगरसेविकेच्या कार्यालयात भरून घेतले जातायत फॉर्म
Mahesh Kale On Majha Katta : विठ्ठलाशी नातं, वडिलांची शिकवण, कधीही न ऐकलेले महेश काळे 'माझा' कट्ट्यावर
NEET Exam Paper Scam : NEET फेरपरीक्षेच्या निकालावर प्रश्नचिन्ह! | ABP Majha Special Report
Ramdas Kadam On Sunil Tatkare : तटकरे माझ्या घराला गटार म्हणता, गटार काय ते दाखवेन : रामदास कदम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Aaditya Thackeray : 'आता शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा मागतोय, पुढे पंतप्रधानांचा मागू'; आदित्य ठाकरेंचा भाजपवर घणाघाती हल्ला!
'आता शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा मागतोय, पुढे पंतप्रधानांचा मागू'; आदित्य ठाकरेंचा भाजपवर घणाघाती हल्ला!
Crime News: नालासोपाऱ्यातील काकांना फेसबुकवर 'रशियन' मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट, गोडगोड गप्पा मारुन भुलवलं अन् एका झटक्यात सात लाखांना चुना लावला
नालासोपाऱ्यातील काकांना फेसबुकवर 'रशियन' मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट, गोडगोड गप्पा मारुन भुलवलं अन् एका झटक्यात सात लाखांना चुना लावला
Beed Crime: 'पायावर नाही... मुंडक्यावर मारा'; बीडमध्ये नगरसेवकाने जुन्या भांडणाचा राग काढला, तरुणावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने वार
'पायावर नाही... मुंडक्यावर मारा'; बीडमध्ये नगरसेवकाने जुन्या भांडणाचा राग काढला, तरुणावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने वार
Rancho 3 Idiots Director: सोनम वांगचुक नाही तर कोण आहे खरा 'रांचो'? 17 वर्षांनंतर '3 इडियट्स'मागचं गुपित उघड, दिग्दर्शकाने सगळंच सांगितलं
सोनम वांगचुक नाही तर कोण आहे खरा 'रांचो'? 17 वर्षांनंतर '3 इडियट्स'मागचं गुपित उघड, दिग्दर्शकाने सगळंच सांगितलं
Parliament Monsoon Session: पावसाळी अधिवेशनापूर्वी सर्वपक्षीय बैठक; विरोधी खासदारांचा अवघ्या 15 मिनिटांतच सभात्याग; मान्यता नसतानाही टीएमसीच्या फुटीर खासदारांच्या उपस्थितीचा निषेध
पावसाळी अधिवेशनापूर्वी सर्वपक्षीय बैठक; विरोधी खासदारांचा अवघ्या 15 मिनिटांतच सभात्याग; मान्यता नसतानाही टीएमसीच्या फुटीर खासदारांच्या उपस्थितीचा निषेध
'सफदरजंग सरकारी रुग्णालयावर विश्वास नाही, जर सोनम यांना काहीही झालं, तर...' पत्नी गीतांजली यांचा अत्यंत गंभीर आरोप, तिकडं सोनम वांगचुक यांचाही उद्याच्या आंदोलनासाठी अत्यंत भावूक संदेश
'सफदरजंग सरकारी रुग्णालयावर विश्वास नाही, जर सोनम यांना काहीही झालं, तर...' पत्नी गीतांजली यांचा अत्यंत गंभीर आरोप, तिकडं सोनम वांगचुक यांचाही उद्याच्या आंदोलनासाठी अत्यंत भावूक संदेश
Gold Silver Rates: सोन्या- चांदीच्या घसरणीचा ट्रेंड कायम! आज 10 ग्रॅम सोन्यासाठी किती पैसे मोजावे लागतील? वाचा ताजे दर
सोन्या- चांदीच्या घसरणीचा ट्रेंड कायम! आज 10 ग्रॅम सोन्यासाठी किती पैसे मोजावे लागतील? वाचा ताजे दर
जम्मूतील पूंछ आणि किश्तवारमध्ये साखर झोपेतच ढगफुटीचा थरकाप, 8 जणांचा जीव गेला, सहा बेपत्ता, 250 वाहने धडाधड वाहून गेली; केदारनाथ मार्गावर भूस्खलन, 14 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
जम्मूतील पूंछ आणि किश्तवारमध्ये साखर झोपेतच ढगफुटीचा थरकाप, 8 जणांचा जीव गेला, सहा बेपत्ता, 250 वाहने धडाधड वाहून गेली; केदारनाथ मार्गावर भूस्खलन, 14 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
Embed widget