LIVE UPDATE | अमिताभ बच्चन नानावटी रुग्णालयात दाखल, यकृताच्या आजारामुळे बिग बींवर दोन दिवसांपासून उपचार सुरु
LIVE
Background
'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in
1. विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचा अंतर्गत सर्व्हे 'एबीपी माझा'च्या हाती, 122 जागांवर विजयाचं भाकित, तर परळीत मुंडे, वांद्र्यात शेलार, राम शिंदेंच्या कर्जत जामखेडमध्ये टफ फाईट
2. 15 नोव्हेंबरपर्यंत राममंदिर प्रकरणी अंतिम निकाल, 40 दिवसांच्या युक्तिवादानंतर कोर्टाने निकाल राखून ठेवला, सुनावेळीवेळी कोर्टात नाट्यमय घडामोडी
3. पाठीत वार करणाऱ्यांपासून सावधान, कणकवलीत नारायण राणेंवर प्रहार करताना उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना इशारा, तर निलेश राणेंची ट्वीटद्वारे उद्धव ठाकरेंवर टीका
4. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आज मुंडेंच्या परळीत, मुख्यमंत्र्यांच्या सहा तर उद्धव ठाकरेंच्या तीन सभा तर शरद पवार नाशिक जिल्ह्यात
5. जागावाटपात नमतं घ्यावं लागलेल्या शिवसेनेचा राज ठाकरेंकडून समाचार, नाशिकतल्या सभेत अनेकांची खिल्ली, नाशकातला पराभव जिव्हारी लागल्याची खदखद व्यक्त
6. बार्शीतील बंडखोर उमेदवार राजेंद्र राऊतांविरोधात गुन्हा, आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने भाजप नेते राजेंद्र मिरगणे यांची तक्रार