LIVE BLOG : पुणे विमानतळावर प्रवाशांचा खोळंबा, स्पाइसजेटची सेवा विस्कळीत
LIVE
Background
राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर
1. लोकसभेच्या चौथ्या टप्प्यासाठी आज मतदान, महाराष्ट्रातील 17 मतदारसंघात तगडी फाईट, मावळमध्ये पवार कुटुंबाची तर नाशकात भुजबळांची प्रतिष्ठा पणाला
2. चौथ्या टप्प्यात देशभरातील 9 राज्यांच्या 71 जागांसाठी आज मतदान, सुमारे 13 कोटी मतदार 943 उमेदवारांचं भवितव्य ठरवणार, 14 उमेदवार पीएचडीधारक
3. राजकीय फायद्यासाठी पंतप्रधान मोदी स्वतःला मागासवर्गीय सांगत असल्याचा मायावतींचा आरोप, जातीवरुन प्रियांक गांधींचाही हल्लाबोल, तर जेटलींचा विरोधकांवर पलटवार
4. ममता, मायावती, चंद्राबाबू हे पंतप्रधानपदासाठी प्रबळ दावेदार, राहुल गांधींना अप्रत्यक्ष आव्हान देणारा शरद पवारांचा अंदाज, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
5. दिग्विजय सिंह यांनी हिंदू दहशतवाद जन्माला घातला, सुमित्रा महाजन यांची 'एबीपी माझा'ला स्फोटक मुलाखत, साध्वी प्रज्ञाची पाठराखण करताना हेमंत करकरेंवर गंभीर आरोप
6. राज ठाकरे म्हणजे लोकसभेसाठी महाआघाडीने आऊटसोर्स केलेले नेते, निवडणुकांच्या तोंडावर पंतप्रधान मोदींचं पहिल्यांदाच टीकास्त्र, लोकमत वृत्तपत्राला पंतप्रधानांची मुलाखत
7. अकोला आणि चंद्रपूर जगातील सर्वाधिक उष्ण शहर, पारा 47. 2 अंशांवर, परभणी, हिंगोलीतही पारा पंचेचाळिशी पार, कडाक उन्हात डोसा, ऑम्लेट आणि चपातीही भाजली