LIVE BLOG : राफेलप्रकरणी राहुल गांधी खोटं बोलत होते हे सिद्ध झालं : प्रकाश जावडेकर

Background
राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा संक्षिप्त आढावा
1. श्रीलंकेतल्या बॉम्बस्फोटात तीन भारतीयांसह 262 जणांचा मृत्यू, 13 संशयित अटेकत, अद्याप कुणीही हल्ल्याची जबाबदारी घेतलेली नाही
2. आम्ही अणुबॉम्ब फक्त दिवाळीसाठी ठेवलेले नाहीत, मोदींचा पाकिस्तानला इशारा, श्रीलंकेच्या घटनेवरुन मोदींचं राजकारण, काँग्रेसचा आरोप
3. तिसऱ्या टप्प्यासाठी प्रचाराच्या तोफा थंडावल्या, उद्या महाराष्ट्रात 14 जागांसाठी मतदान, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
4. मोठ्या वादानंतर मनसेच्या सभेला अखेर परवानगी, 24 एप्रिलऐवजी 23 तारखेला राज ठाकरेंची मुंबईत सभा,
5. प्रचारादरम्यान पातळी सोडून शेरेबाजी, संघाच्या गणवेशावरून शरद पवारांचं मोहितेंवर टीकास्त्र, तर मुख्यमंत्र्यांकडून चड्डी उतरवण्याची भाषा
6. अटीतटीच्या सामन्यात बंगलोरचा चेन्नई सुपर किंग्जवर विजय, अखेरच्या षटकात चेन्नईचा एका धावेने पराभव, धोनीची तुफान फलंदाजी























