LIVE BLOG : मसूदचा उद्या फैसला, आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित होण्याची शक्यता, संयुक्त राष्ट्रांच्या निर्णयाकडे लक्ष
LIVE
Background
देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा
1. राधाकृष्ण विखे पाटील विरोधी पक्षनेतेपद सोडण्याच्या तयारीत, मुलगा सुजयच्या उमेदवारीसाठी नगरची जागा सुटत नसल्याने हायकमांडविरोधात नाराजी
2. नातू पार्थसाठी शरद पवारांची लोकसभेतून माघार, मात्र माढातून लढण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते पवारांना गळ घालणार, पार्थसाठी अजितदादांच्या लॉबिंगची चर्चा
3. राहुल गांधींकडून जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहरचा आदराने उल्लेख, भाजपकडून जोरदार टीका
4. लोकसभेसाठी प्रकाश आंबेडकर सोलापूरमधून शड्डू ठोकणार, सुशीलकुमार शिंदेंच्या अडचणीत वाढ, भाजपचा फायदा होण्याची शक्यता
5. मनसेचे एकमेव आमदार शरद सोनावणेंचा शिवसेनेत प्रवेश, सोनावणेंच्या पक्षप्रवेशाच्या मुहूर्तावर प्रचाराचा नारळ वाढवत असल्याची उद्धव ठाकरेंकडून घोषणा
6. मुंबई, नागपूर आणि मराठवाडा विद्यापीठाच्या वेळापत्रकात बदल, निवडणुकांच्या तारखांमुळे सीए परीक्षाही लांबणीवर