LIVE BLOG : किरीट सोमय्या आणि पियुष गोयल वर्षा बंगल्यावर दाखल

Background
देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा
1. पटकण्याची भाषा करणाऱ्या अमित शाहांच्या रॅलीत उद्धव ठाकरे आज सहभागी होणार, तर अफजल खानाच्या मदतीला उंदरांची कुमक, काँग्रेसचा हल्लाबोल
2. पंतप्रधान नरेंद्र मोदींना निवडणूक आयोगाकडून दिलासा, 'मिशन शक्ती'विषयी दिलेलं भाषण आचारसंहितेचे उल्लंघन नसल्याचा निर्वाळा
3. लंडन कोर्टाचा नीरव मोदीला सलग दुसऱ्यांदा दणका, साक्षीदारांच्या जीवाला धोका असल्याने जामीन फेटाळला, 26 एप्रिलपर्यंत कोठडी कायम
4. महाराष्ट्रात काँग्रेसच्या तिकीट वाटपातील घोळाची हायकमांडकडून दखल, डॅमेज कंट्रोलसाठी तीन नेत्यांचं शिष्टमंडळ मुंबईत
5.आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुलं लावारिस, भाजप प्रवक्ते अवधुत वाघांची ट्विटरवर मुक्ताफळं, विरोधकांची टीका तर शेतकऱ्यांचा तीव्र संताप
6. आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादकडून राजस्थान रॉयल्सचा पाच विकेट्सनी धुव्वा, पाच विकेट्स आणि सहा चेंडू राखून राजस्थान रॉयल्सवर मात























