LIVE BLOG | मनसेला आघाडीत घेण्याबाबत अद्याप विचार नाही, मतभेद आहेत : अशोक चव्हाण

Background
राज्य आणि देशभरातील बातम्यांना संक्षिप्त आढावा
1. मुंबईसह कोकणात मुसळधार तर मराठवाडा आणि विदर्भात हलक्या पावसाचा अंदाज, कोल्हापुरातही पंचगंगेच्या पाणीपातळीत वाढ
2. पहिल्याच पावसानं केली सरकारची पोलखोल, ठाण्यात अर्ध्या फुटानं रस्ता खचला, गोवा हायवेचीही चाळण तर विजापूर गुहागर मार्गावर चिखलाचं साम्राज्य
3. विधानसभेसाठी वंचित आघाडीला सोबत घेण्यासाठी काँग्रेसचे प्रयत्न सुरू, 3 जुलैला चर्चेची पहिली फेरी, दिल्लीत राहुल गांधींसोबत झालेल्या बैठकीत निर्ण
4. मराठा आरक्षण 16 टक्केच ठेवण्यासाठी प्रयत्न करणार, मराठा कार्यकर्त्यांना उद्धव ठाकरेंचं आश्वासन, तर महाराष्ट्र क्रांती सेनेकडून मुख्यमंत्र्यांना मराठा गौरव पुरस्कार जाहीर
5. संत तुकोबांची पालखी आज वरवंड तर ज्ञानोबांची पालखी जेजुरी मुक्कामी, भक्तिमय वातावरणात वारकरी पंढरीच्या दिशेनं
6. विश्वचषकाच्या रणांगणात टीम इंडियासमोर आज यजमान इंग्लंडचं आव्हान, इंग्लंडला हरवल्यास भारतीय संघाचं उपांत्य फेरीचं तिकीट कन्फर्म























