LIVE BLOG | राज ठाकरे हे लोकसभेसाठी महाआघाडीने आऊटसोर्स केलेले नेते, नरेंद्र मोदींचा राज ठाकरेंना टोला

Background
1. मतदान केंद्रावर मोबाईल नेल्यास गुन्हा दाखल होणार, फेसबुक लाईव्ह, टीकटॉकसारखे गैरप्रकार टाळण्यासाठी निवडणूक आयोगाचा महत्वपूर्ण निर्णय़
2. चौथ्या टप्प्यातल्या 17 मतदारसंघातला प्रचार थंडावला, मुंबई, ठाणे, नाशिकात महत्त्वाच्या लढती, मावळमध्ये पवार कुटुंबाची प्रतिष्ठा पणाला
3.राज ठाकरेंच्या लाव रे तो व्हीडिओला भाजपचं 'बघाच तो व्हिडीओ'ने उत्तर, मुंबईत आशिष शेलारांकडून अनेक मुद्द्यांवर पोलखोल, मित्रा चुकलास म्हणत भावनिक उद्गार
4. दक्षिण मुंबई वगळता इतर 5 मतदारसंघात अडीच लाखांनी मतदार घटले, तर सलगच्या सुट्ट्यांमुळं मुंबईतील उमेदवारांची धाकधुक वाढली
5. विदर्भ आणि मराठवाड्यातल्या अनेत जिल्ह्यात पारा पंचेचाळीशी पार, परभणीत उष्माघातामुळं शेतकऱ्यांचा मृत्यू, मात्र कोल्हापूर आणि चंदगडात गारांचा तडाखा
6. नालासोपाऱ्यात इमारतीच्या चौथ्या मजल्यावरुन उडी मारत जेट एअरवेजच्या कर्मचाऱ्याची आत्महत्या, आजारपणाला कंटाळून जीवन संपवल्याचा पोलिसांचा अंदाज























