LIVE BLOG : चंद्राबाबू नायडूंनी दोन दिवसात दोनवेळा घेतली शरद पवारांची भेट
LIVE
Background
राज्यातील आणि देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा संक्षिप्त आढावा
1. केदारनाथच्या चरणी लीन झाल्यानंतर नरेंद्र मोदींचा रात्रभर गुहेतच मुक्काम, पराभवाची कल्पना आल्यानं मोदींकडून देवाचा धावा, विरोधकांचं टीकास्त्र
2. लोकसभेच्या अखेरच्या टप्प्यासाठी आज 8 राज्यातल्या 59 जागांसाठी मतदान, पंतप्रधान मोदींसह, योगी आदित्यनाथ, ममतांची मोठी परीक्षा, अभिनेतेही आखाड्यात
3. नरेंद्र मोदींना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी विरोधकांची मोर्चेबांधणी, आंध्रचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंनी घेतली राहुल गांधी, शरद पवार, मायावती आणि अखिलेश यादवांची भेट
4. हिंदू शब्द प्राचीन धर्मग्रंथात नसून तो मुघलांनी दिला, अभिनेता कमल हसनचे वादग्रस्त वक्तव्य, कमलच्या ट्वीटवरुन नव्या वादाला तोंड
5. मराठा आरक्षणाला विरोध करणारे गुणरत्न सदावर्ते खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी सरसावले, अध्यादेशाला हायकोर्टात आव्हान देणार, राज्यपालांनाही पत्र
6. मान्सून भारताच्या वेशीवर, अंदमान-निकोबारसह बंगालच्या उपसागराचा काही भाग व्यापला.. तर 25 मे पर्यंत मराठवाडा, विदर्भात उष्णतेच्या लाटेचा अंदाज