LIVE BLOG : अहमदनगरमध्ये दरोडेखोरांची टोळी गजाआड, 10 लाखांचा मुद्देमाल जप्त
LIVE
Background
देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा
1. पाच वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदींची पहिलीच पत्रकार परिषद, पण प्रश्नांना बगल राहुल गांधींकडून मोदींच्या पत्रकार परिषदेची खिल्ली
2. साध्वी प्रज्ञासिंह ठाकूरला मनापासून माफ करु शकणार नाही, नथुराम गोडसेवरच्या विधानावर मोदींची नाराजी समोर, अमित शहांकडून वाचाळवीरांना नोटीस
3. लोकसभा अखेरचा टप्प्यातल्या तोफा थंडावल्या, वाराणसी आणि पश्चिम बंगालमध्ये दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला रविवारी मतदान
4. मराठा विद्यार्थ्यांच्या पदवुत्तर मेडिकल प्रवेशासाठी सरकारचा अध्यादेश, मात्र खुल्या प्रवर्गातील विद्यार्थी नाराज, सुप्रीम कोर्टात दाद मागणार
5. मुंबईला वीजपुरवठा करणाऱ्या बेस्टने 561 कोटी रुपये थकवले, टाटा वीज कंपनीची नोटीस, 21 मेपासून वीज विक्री बंद करण्याचा इशारा
6. रविवारी मध्य रेल्वेवर कल्याण ते कसारा दरम्यान इंटिग्रेटेड ब्लॉक, लांब पल्ल्याच्या गाड्यांचे मार्ग बदलणार तर प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता