LIVE BLOG : राष्ट्रवादीची दुसरी उमेदवारी यादी जाहीर, मावळमधून पार्थ पवार मैदानात
LIVE
Background
देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा
1. मुंबई सीएसएमटीलगतचा पूल कोसळला, 6 जणांचा मृत्यू तर 31 जखमी, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
2. पूल दुर्घटनेत जीटी रुग्णालयातील 3 परिचारिकांचा मृत्यू, वडिलांसोबत गेलेल्या झायेद खानवरही काळाचा घाला, रेड सिग्नल सुरु असल्यानं मोठा अनर्थ टळला
3. ऑडिटदरम्यान पुलाची किरकोळ दुरुस्ती सुचवण्यात आल्याची तावडेंची माहिती, मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश, मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत
4. कोसळलेला पूल मुंबई महापालिकेचाच असल्याची अधिकाऱ्यांची कबुली, रेल्वेसह मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद
5. अर्जुन खोतकरांबद्दल दोन दिवसात गूड न्यूज, अर्जुन खोतकरांच्या भेटीनंतर अब्दुल सत्तार यांचा गौप्यस्फोट, दानवेंच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्ह
6. क्रिकेटर मोहम्मद शमीविरोधात हुंडा आणि लैंगिक छळाचा गुन्हा दाखल, पत्नीच्या तक्रारीनंतर कारवाई, मोहम्मद शमीच्या अडचणीत वाढ