LIVE BLOG | एक्झिट पोलशी निगडीत सर्व ट्वीट्स काढून टाका, निवडणूक आयोगाचे 'ट्विटर इंडिया'ला आदेश
LIVE
Background
देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा
1. कोलकातामध्ये अमित शाहांच्या रोड शोमध्ये तुफान राडा, रोड शो अर्धवट सोडून शाहांना सुरक्षित स्थळी हलवलं, ममतांच्या कार्यकर्त्यांनी राडा घातल्याचा भाजपचा आरोप
2. ईव्हीएमवरुन पवार कुटुंबातच मतभेद, ईव्हीएमबाबत कुठलीही शंका नाही, अजितदादांचा शरद पवारांना घरचा आहेर, सुप्रिया सुळेंना शंका कायम
3. मोदी सत्तेत आले, तरी सरकार 13 दिवसात पडेल, 'माझा'च्या एक्स्क्लुझिव मुलाखतीत शरद पवारांचं भाकीत, रोहित पवारच्या विधानसभा उमेदवारीचेही संकेत
4. मान्सून 4 जून रोजी केरळमध्ये दाखल होणार, सरासरीच्या फक्त 93 टक्के पाऊस, विदर्भ आणि मराठवाड्यात कमी पावसाची शक्यता, स्कायमेटचा शेवटचा अंदाज
5. स्वातंत्र्यवीर सावरकरांवरुन राजस्थानमध्ये वाद, काँग्रेसकडून अभ्यासक्रम बदलत दहावीच्या पुस्तकात सावरकरांच्या माफीचा उल्लेख, भाजपकडून आक्षेप
6. सायन हॉस्पिटलमध्ये महिलेवर बलात्कार, एकाला अटक, पाचव्या मजल्यावर निर्जन ठिकाणी अत्याचार