LIVE BLOG | मुंबई : दादर पोलिस स्टेशन कॉलनीत सिलेंडर स्फोट
LIVE
Background
देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा
1. सहाव्या टप्प्यासाठी सात राज्यात 59 जागांसाठी मतदान, अखिलेश यादव, दिग्विजय सिंग, प्रज्ञा ठाकुरांसह दिग्गजांचं भवितव्य ठरणार
2. मुंबई-चेन्नई संघात आज चौथ्यांदा आयपीएलचा अंतिम सामना, हैदराबादच्या मैदानावर रंगणार महामुकाबला
3. मेडिकल पीजीच्या मराठा विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरुच, आश्वासन नको मेडिकलची सीट द्या, विद्यार्थ्यांची मागणी, तर मुंबईत आज मराठा क्रांती मोर्चाची बैठक
4. बघ्यांच्या असंवेदनशिलतेमुळं अपघातग्रस्त डॉक्टरचा बळी, वेळेवर उपचार न मिळाल्यानं मृत्यू, औरंगाबादेत आठवडाभरातील दुसरी घटना
5. हैदराबादेत एका कार्यक्रमादरम्यान काँग्रेस नेतेच आपापसात भिडले, दोघांमध्ये जबरी मारहाण, सोशल मीडियात व्हिडीओ व्हायरल
6. आई वडिलांची सेवा करणारी मुलगी मिळेना, पुण्यातील तरुणाची मुख्यमंत्र्यांकडे इच्छामरणाची मागणी