LIVE BLOG | दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या कानाखाली लगावली
LIVE
Background
1. फनी चक्री वादळाच्या तडाख्यामुळे पूर्व किनारपट्टीवरचं जनजीवन विस्कळीत, दिवसभरात एक हजार कोटींपेक्षा अधिक नुकसान, वादळाची ओदिशानंतर बंगालला धडक..
2. गारूड्यांचा साप हाताळणाऱ्या प्रियंका गांधींवर निशाणा साधताना मोदींचा नेहरूंवर हल्लाबोल, तर माझाला दिलेल्या एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीत प्रियंकांचा मोदींवर प्रहार
3. सहा सर्जिकल स्ट्राईक केल्याचा दावा करणाऱ्या काँग्रेसची मोदींकडून खिल्ली, स्ट्राईकविरोधात निदर्शने करणारे आता मीटू मीटू करताहेत, राजस्थानातल्या सभेत मोदींचा हल्लाबोल
4.जावई हर्षवर्धन जाधवांसाठी दानवेंनी सेनेच्या पाठीत खंजीर खुपसला, चंद्रकांत खैरेंचा गंभीर आरोप, मातोश्री-वर्षासह शाहांच्या दरबारातही तक्रार
5.पानी फाऊंडेशनच्या वॉटर कपसाठी श्रमदान करणाऱ्या ग्रामस्थांवर जीवघेणा हल्ला, नाशकातल्या चांदवडमधली संतप्त घटना,
6. पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहीद आफ्रिदी वय चोरी करुन खेळला असल्याचे समोर, खुद्द आफ्रिदीकडून त्याच्या 'गेम चेंजर' या आत्मचरित्रात खुलासा