News
News
टीव्हीabp shortsABP शॉर्ट्सव्हिडीओ पॉडकास्ट
X

खरीप हंगामासाठी 'महाबीज' 6 लाख क्विंटल बियाणं बाजारात आणणार

FOLLOW US: 
Share:
अकोला : येत्या खरीप हंगामासाठी 'महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ' अर्थात 'महाबीज'ने चांगलीच कंबर कसली आहे. यावर्षीच्या खरीप हंगामात 'महाबीज' आपले तब्बल ६ लाख ५९ हजार क्विंटल बियाणे बाजारात आणणार आहे. यामध्ये सर्वाधिक ५.०९ लाख क्विंटलचा वाटा हा सोयाबीन बियाण्यांचा राहणार आहे. खरीपासाठी 'महाबीज'ची तयारी पूर्ण झाली असून, 'महाबीज'चं ६० टक्के बियाणं सध्या बाजारात आलं आहे. यावर्षी 'महाबीज' ६ लाख ५९ हजार क्विंटल बियाणं बाजारात आणणार आहे. मागच्या वर्षी हाच आकडा ५.११ लाख क्विंटल इतका होता. यावर्षीही 'महाबीज' बियाण्यांमध्ये सर्वाधिक वाटा हा सोयाबीन बियाण्यांचा राहणार आहे. सोयाबीन बियाण्याचा वाटा यामध्ये ५ लाख ९ हजार क्विंटल एवढा असणार आहे. 'महाबीज'च्या 'जे.एस.-३३५', जे.एस.९३०५' आणि एम.ए.यू.एस.७१' या सोयाबीन वाणांना शेतकऱ्यांकडून मोठी मागणी असते. यासोबतच भात, तूर, मुग, उडीद, भुईमुग, ढेंचा, ताग या पिकांच्या बियाण्यांचाही यामध्ये समावेश आहे. 'महाबीज'चे खरीपासाठी बियाणे विक्री नियोजन

बियाणे

विक्रीसाठी उपलब्ध (क्विंटलमध्ये)

1). सोयाबीन

५.०९ लाख क्विंटल

2). तूर

१८,४२१ क्विंटल

3). मुग

५,६६० क्विंटल

4). उडीद

१६,५३० क्विंटल

5). सुधारित कपाशी

८८३ क्विंटल

6). देशी कपाशी

२७० क्विंटल

7). धान

८५,११० क्विंटल

दरवर्षी 'महाबीज'च्या सोयाबीन बियाण्यासंदर्भात होत असलेल्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर 'महाबीज'ने विशेष खबरदारी घेतली आहे. दरम्यान, यावर्षी त्रिस्तरीय प्रमाणीकरणानंतर उगवण क्षमता तपासण्यासाठी सोयाबीन बियाण्यांची शेतचाचणी करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला. मात्र, ७० ते ८० टक्के पाऊस झाल्यानंतरच पेरणी करा, असा सल्ला 'महाबीज'नं शेतकऱ्यांना दिला आहे. याशिवाय शेतकऱ्यांना सोयाबीनचं बियाणं कमी पडू देणार नसल्याचा विश्वासही 'महाबीज'नं शेतकऱ्यांना दिला आहे.
Published at : 22 May 2017 03:53 PM (IST) Tags: बियाणे महाबीज mahabeej खरीप हंगाम

आणखी महत्वाच्या बातम्या

काँग्रेसच्या 'कोल्हापूर कस्सं, तुम्ही म्हणशीला तस्सं'ला आता महायुतीचा 'जे मनात तेच मनपात'चा उतारा! कर्तव्यनामा मांडताच पालकंमत्री, महाडिक, मंत्री मुश्रीफ, चंद्रकांतदादा काय म्हणाले?

काँग्रेसच्या 'कोल्हापूर कस्सं, तुम्ही म्हणशीला तस्सं'ला आता महायुतीचा 'जे मनात तेच मनपात'चा उतारा! कर्तव्यनामा मांडताच पालकंमत्री, महाडिक, मंत्री मुश्रीफ, चंद्रकांतदादा काय म्हणाले?

ठाकरे बंधूंना फक्त भावनात्मक बोलायचंय, पण देवेंद्र फडणवीस म्हणजे डेव्हलपमेंट हाच फॉर्म्युला चालणार, चंद्रशेखर बावनकुळेंचा टोला  

ठाकरे बंधूंना फक्त भावनात्मक बोलायचंय, पण देवेंद्र फडणवीस म्हणजे डेव्हलपमेंट हाच फॉर्म्युला चालणार, चंद्रशेखर बावनकुळेंचा टोला  

परभणी शहर दत्तक घ्यायला तयार, फक्त घड्याळ आणि तुतारीचे उमेदवार विजयी करा, अजित पवारांचं मतदारांना आवाहन

परभणी शहर दत्तक घ्यायला तयार, फक्त घड्याळ आणि तुतारीचे उमेदवार विजयी करा, अजित पवारांचं मतदारांना आवाहन

Vishwas Abaji Patil: ऐन निवडणुकीत कोल्हापुरात काँग्रेसला झटका; 'गोकुळ'चे माजी अध्यक्ष विश्वास आबाजी पाटील शिंदे गटात प्रवेश करणार

Vishwas Abaji Patil: ऐन निवडणुकीत कोल्हापुरात काँग्रेसला झटका; 'गोकुळ'चे माजी अध्यक्ष विश्वास आबाजी पाटील शिंदे गटात प्रवेश करणार

मोठी बातमी! काँग्रेसचे 10 नगरसेवक फोडणाऱ्या भाजपला शिंदेंच्या शिवसेनेचा झटका, अंबरनाथमध्ये राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन करणार

मोठी बातमी! काँग्रेसचे 10 नगरसेवक फोडणाऱ्या भाजपला शिंदेंच्या शिवसेनेचा झटका, अंबरनाथमध्ये राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन करणार

टॉप न्यूज़

Tara Sutaria Veer Paharia Breakup: कॉन्सर्टमधील 'तो' व्हिडिओ भारी पडला, तारा अन् वीर पहारियानं घेतला नातं संपवण्याचा निर्णय? ब्रेकअपच्या चर्चांनी चाहतेही शॉक

Tara Sutaria Veer Paharia Breakup: कॉन्सर्टमधील 'तो' व्हिडिओ भारी पडला, तारा अन् वीर पहारियानं घेतला नातं संपवण्याचा निर्णय? ब्रेकअपच्या चर्चांनी चाहतेही शॉक

Stranger Things season 5 episode 9 update: नेटफ्लिक्सवर स्ट्रेंजर थिंग्सचा आणखी एक एपिसोड येणार? तो शेवट खोटा, Vecna चा डाव कोणालाच कळला नाही?

Stranger Things season 5 episode 9 update: नेटफ्लिक्सवर स्ट्रेंजर थिंग्सचा आणखी एक एपिसोड येणार? तो शेवट खोटा, Vecna चा डाव कोणालाच कळला नाही?

Share Market : सेन्सेक्समध्ये 5 दिवसात 2200 अंकांची घसरण, भारतीय शेअर बाजारातील घसरण सुरुच, बाजारातील घसरणीचं अमेरिका कनेक्शन समोर

Share Market : सेन्सेक्समध्ये 5 दिवसात 2200 अंकांची घसरण, भारतीय शेअर बाजारातील घसरण सुरुच, बाजारातील घसरणीचं अमेरिका कनेक्शन समोर

लेकीच्या सासऱ्यावर आईचा जीव जडला अन् सासरच्या घरातून लेकीलाच हाकलून बाहेर काढलं! जावयाला म्हणाली, माझ्या लेकीचं दुसऱ्यासोबत लफडं सुरुय! आईच्या भलत्याच भानगडीनं संतापलेल्या लेकीनं..

लेकीच्या सासऱ्यावर आईचा जीव जडला अन् सासरच्या घरातून लेकीलाच हाकलून बाहेर काढलं! जावयाला म्हणाली, माझ्या लेकीचं दुसऱ्यासोबत लफडं सुरुय! आईच्या भलत्याच भानगडीनं संतापलेल्या लेकीनं..