एक्स्प्लोर
दुधात गूळ मिसळून पिण्याचे 5 फायदे
नवी दिल्लीः गूळ आणि दूध हे पदार्थ शरिरासाठी किती फायदेशीर आहेत, हे अनेकदा सिद्ध झालं आहे. गूळ शरिराची पचनक्रिया तंदुरुस्त ठेवण्यास मदत करतो, तर दूध शरिरातील कॅल्शिअम वाढवते. मात्र दूध आणि गूळ एकत्र करुन पिण्याचे देखील काही महत्वाचे फायदे आहेत.
दुधात गूळ मिसळून पिल्यास शरिराच्या अनेक मुलभूत गरजा पूर्ण होतात. रोगप्रतिकारक शक्ति वाढवणे, रक्त पुरवठा सुरळित होणे, थकवा दूर करणे, असे अनेक फायदे होतात, असं तज्ज्ञांचं मत आहे.
काय आहेत दूधात गूळ मिसळून पिण्याचे फायदे?
- दुधात गूळ मिसळून पिल्यास रक्त स्वच्छ राहण्यास मदत होते. रक्तामध्ये गाठी तयार होणे, रक्त पुरवठ्याचा त्रास होणे, अशा समस्या कमी होतात.
- पचनक्रिया तंदुरुस्त ठेवण्यासाठी आणि कफ टाळण्यासाठी याचा फायदा होतो.
- मासिक पाळीचा त्रास कमी करण्यासाठी याचा फायदा होतो.
- गुडघेदुखीच्या त्रासासाठीही याचा फायदा होतो.
- गरोदर महिलांना थकवा आणि अशक्तपणा जाणवल्यास दुधात गूळ मिसळून पिण्याचा सल्ला दिला जातो.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
क्रिकेट
शेत-शिवार
राजकारण
Advertisement