एक्स्प्लोर

Blood Donation: रक्तदान केल्यानं अशक्तपणा येतो? तज्ज्ञांनी फोडले 4 मोठे गैरसमज; कोण अन् कधी करु शकतं रक्तदान?

World Blood Donar Day 2026: जागतिक रक्तदाता दिन 2026: रक्तदान कोण करू शकते? दूर करा रक्तदान याबाबत असलेल्या गैरसमजुती

World Blood Donar Day 2026: रक्तदान (Blood Donation) हेच श्रेष्ठ दान, असं म्हटलं जातं. रक्तदान (Health) हे एक असे दान आहे जे थेट एखाद्या व्यक्तीचा जीव वाचवू शकते. अपघातग्रस्त रुग्ण, शस्त्रक्रिया होणारे रुग्ण, कर्करोगग्रस्त व्यक्ती, थॅलेसेमिया (Donate Blood) असलेली मुले तसेच प्रसूतीदरम्यान रक्ताची गरज भासणाऱ्या महिलांसाठी रक्तदान अत्यंत महत्त्वाचे ठरते. रक्तदानाबाबत समाजात अनेक गैरसमज पसरलेले आहेत. त्यामुळे अनेक पात्र व्यक्ती रक्तदान करण्यास घाबरतात. प्रत्यक्षात रक्तदान ही सुरक्षित आणि वैज्ञानिकदृष्ट्या मान्य प्रक्रिया आहे.

भारतात रक्तदानाबाबत आजही जागरूकतेचा अभाव दिसून येतो. देशभरात रक्ताचा तुटवडा हे एक मोठे आव्हान आहे. पात्रतेचे निकष पूर्ण करणारे बहुतेक निरोगी प्रौढ व्यक्ती रक्तदान करू शकतात. रक्तदात्याचे वय 18 ते 65 वर्षांच्या दरम्यान असावे, वजन किमान 50 किलो असावे आणि आरोग्य उत्तम असावे. रक्तदात्याला कोणताही सक्रिय संसर्ग किंवा ॲनिमिया (रक्तक्षय) नसावा, कारण त्यामुळे रक्तदानाची सुरक्षितता धोक्यात येऊ शकते. रक्तदात्याची आणि रक्त घेणाऱ्याची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी रक्तदान करण्यापूर्वी सामान्यतः आरोग्य तपासणी केली जाते. संसर्गाच्या भीतीमुळे अनेक लोक रक्तदान करणे टाळतात. मात्र, रक्तदान अत्यंत सुरक्षित आणि गरजूंचे प्राण वाचवणारे असते.

रक्तदानाशी संबंधित गैरसमज आणि त्यामागची वास्तविकता (World Blood Donar Day 2026)

गैरसमज 1: रक्तदान केल्याने अशक्तपणा येतो

वास्तविकता: निरोगी व्यक्तीकडून रक्तदान करण्यापूर्वी हिमोग्लोबिन, रक्तदाब, वजन आणि एकूण आरोग्याची तपासणी केली जाते. पात्र व्यक्तीकडून घेतले जाणारे रक्ताचे प्रमाण सुरक्षित मर्यादेत असते. रक्तदानानंतर शरीर नवीन रक्तपेशी तयार करून ही भरपाई करते. त्यामुळे योग्य आहार, पुरेशी विश्रांती आणि द्रवपदार्थ घेतल्यास रक्तदानामुळे कायमस्वरूपी अशक्तपणा येत नाही.

गैरसमज 2: रक्तदान करणे रक्तदात्यासाठी अत्यंत वेदनादायक असते

वास्तविकता: रक्तदान ही साधारणपणे सुरक्षित आणि कमी वेदनादायक प्रक्रिया असते. सुई टोचताना काही सेकंदांसाठी किरकोळ टोचल्यासारखे वाटू शकते, परंतु त्यानंतर बहुतेक रक्तदात्यांना विशेष वेदना जाणवत नाहीत. यामुळे रक्तदात्याला कोणतीही अस्वस्थता जाणवत नाही. त्यामुळे, कोणत्याही दुष्परिणामांची किंवा गुंतागुंतीची काळजी करू नका.

गैरसमज 3: रक्तदान करणे धोकादायक असते

वास्तविकता: नाही, रक्तदान केल्याने लोकांना कोणताही आजार होत नाही. यासाठी वापरल्या जाणाऱ्या सुया, स्वॅब्स आणि रक्त गोळा करण्याच्या पिशव्या (बॅग्ज) अगदी नवीन आणि निर्जंतुक असतात व वापरानंतर लगेचच टाकून दिल्या जातात. त्यामुळे संसर्गाचा धोका शून्य असतो. 

गैरसमज 4: रक्तदान करण्यास खूप वेळ लागतो.

वास्तविकता : नाही, या प्रक्रियेसाठी 4 ते 5 तास लागत नाहीत. वास्तविक, ही संपूर्ण प्रक्रिया 40 मिनिटांत पूर्ण होते आणि रक्त काढण्याची क्रिया 10 मिनिटांच्या आतच पार पडते.

रक्तदान करण्यापूर्वी पौष्टिक आहार घेणे आणि पुरेसे पाणी पिऊन शरीरातील पाण्याचे प्रमाण योग्य राखणे आवश्यक आहे. तसेच, रक्तदान केल्यानंतरही पुरेसे पाणी प्यावे, कोणतीही कष्टाची किंवा शारीरिक थकवा आणणारी कामं करू नयेत आणि थोडा वेळ विश्रांती घ्यावी. दर तीन महिन्यांनी रक्तदान करणे योग्य असते.

डॉ. नेहा सारडा, पॅथॉलॉजिस्ट आणि रक्त संक्रमण अधिकारी, एम्स हॉस्पिटल, डोंबिवली

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Health: काय सांगता..जास्त टेन्शनमुळे पोटाच्या समस्या वाढू शकतात? पचनावर याचा नेमका कसा परिणाम होतो? डॉक्टर सांगतात...
काय सांगता..जास्त टेन्शनमुळे पोटाच्या समस्या वाढू शकतात? पचनावर याचा नेमका कसा परिणाम होतो? डॉक्टर सांगतात...
Money Plant : घरात 'मनी प्लांट' लावल्याने खरंच पैसा येतो का? जाणून घ्या वास्तू अन् विज्ञानातील सत्य
घरात 'मनी प्लांट' लावल्याने खरंच पैसा येतो का? जाणून घ्या वास्तू अन् विज्ञानातील सत्य
Tea Side Effects : तुम्हीही रोज सकाळी उपाशीपोटी चहा पिता? जरा सांभाळून... आरोग्याचं होऊ शकतं भयंकर नुकसान!
तुम्हीही रोज सकाळी उपाशीपोटी चहा पिता? जरा सांभाळून... आरोग्याचं होऊ शकतं भयंकर नुकसान!
Health Tips : पावसाळ्यात वाढतोय हिपॅटायटिसचा धोका; यकृताच्या आरोग्यासाठी ‘प्रतिंबध’ हाच उपाय
पावसाळ्यात वाढतोय हिपॅटायटिसचा धोका; यकृताच्या आरोग्यासाठी ‘प्रतिंबध’ हाच उपाय
Advertisement

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BJP Team for Generation G: जेन-जी सोबत कनेक्ट होण्यासाठी भाजपच्या विशेष टीमची घोषणा; विनोद तावडेंना पुन्हा मोठी जबाबदारी, टीममध्ये कोणाकोणाचा समावेश?
जेन-जी सोबत कनेक्ट होण्यासाठी भाजपच्या विशेष टीमची घोषणा; विनोद तावडेंना पुन्हा मोठी जबाबदारी, टीममध्ये कोणाकोणाचा समावेश?
Subodh Savji on Sugar Price Hike : साखरेचे भाव निम्म्यावर आणून दारूचे भाव दहा पटीने वाढवा; माजी मंत्र्यांची मागणी, साखरेच्या दरवाढीवर मुख्यमंत्र्यांना पाठवलं पत्र
साखरेचे भाव निम्म्यावर आणून दारूचे भाव दहा पटीने वाढवा; माजी मंत्र्यांची मागणी, साखरेच्या दरवाढीवर मुख्यमंत्र्यांना पाठवलं पत्र
आईच्या शोधात भटकतंय व्हेल माशाचं पिल्लू; समुद्रकिनारी ह्रदयस्पर्शी दृश्य, मोठ्या बोटीतून मध्यभागी सोडलं जाणार
आईच्या शोधात भटकतंय व्हेल माशाचं पिल्लू; समुद्रकिनारी ह्रदयस्पर्शी दृश्य, मोठ्या बोटीतून मध्यभागी सोडलं जाणार
NHAI Toll Pass: 'या' लोकांचा आता टोल कट होणार नाही; NHAI ने आणला विशेष पास, कसा मिळवता येईल?
'या' लोकांचा आता टोल कट होणार नाही; NHAI ने आणला विशेष पास, कसा मिळवता येईल?
रोहित पवारांना एवढंच काम शिल्लक; पुण्यातील कार्यक्रमावरुन विखे पाटलांची राहुल गांधींवरही बोचरी टीका
रोहित पवारांना एवढंच काम शिल्लक; पुण्यातील कार्यक्रमावरुन विखे पाटलांची राहुल गांधींवरही बोचरी टीका
Chhatrapati Sambhaji Nagar Boy Jumps Down From Mountain: मुलाने iPhone साठी जीवन संपवल्याची चर्चा; आता प्रत्यक्षदर्शीने वेगळचं सांगितलं, डोंगरावर काय घडलं?
मुलाने iPhone साठी जीवन संपवल्याची चर्चा; आता प्रत्यक्षदर्शीने वेगळचं सांगितलं, डोंगरावर काय घडलं?
Udgir Crime News : तब्बल 2 हजार 134 कोटींचा महाघोटाळा; 16 कंपन्यांशी संगनमत करून निधी थेट परदेशात पाठवला, आयकर विभागाच्या तीन दिवसाच्या तपासानंतर प्रकार उघड
उदगीरमध्ये तब्बल 2 हजार 134 कोटींचा महाघोटाळा; 16 कंपन्यांशी संगनमत करून निधी थेट परदेशात पाठवला, आयकर विभागाच्या तपासानंतर प्रकार उघड
आयफोन हे कारण नाही, ती केवळ चर्चा; पोलिसांच्या तपासातून वेगळीच माहिती, DCP नवलेंकडून स्पष्टीकरण
आयफोन हे कारण नाही, ती केवळ चर्चा; पोलिसांच्या तपासातून वेगळीच माहिती, DCP नवलेंकडून स्पष्टीकरण
Embed widget