Women safety: रात्रीच्या वेळी एकटीनं ओला-उबरनं प्रवास करताय? काय खबरदारी घ्याल?
जर कॅब मधून तुम्ही प्रवास करू शकत असाल तर त्यातील ॲप मध्ये असणारे सेफ्टी प्रेफरन्स तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे.
Women Safety: कोलकत्यात डॉक्टर वरील अत्याचार प्रकरण, बदलापुरात अल्पवयीन मुलीसह राज्यभरात घडणाऱ्या महिलांवरील अत्याचार प्रकरणांमध्ये वाढ होत असून बाईने बाहेर जायचं का नाही? या प्रश्नापर्यंत आता सगळे येऊन थांबलेत. आपल्या मुलीला रात्रीच्या वेळी घराबाहेर पाठवण्यास पालकांचा जीव मुठीत जातोय. सुरक्षित प्रवासासाठी महिलांनीच आता सजग होण्याची गरज आहे. नोकरीनिमित्त कामानिमित्त बाहेर राहणाऱ्या महिलांना रात्री अप रात्री प्रवास करावा लागतो. वाढत्या अत्याचारांच्या घटनांमुळे सुरक्षित प्रवास करण्यावर महिला भर देत असल्याचे दिसत असून अनेक महिला ओला ,उबर अशा कॅब बुक करण्याऐवजी ऑटो रिक्षा बुक करण्याला प्राधान्य देत असल्याचं दिसून येतंय. यामागील कारण काही महिलांना विचारल्यास त्यांचं म्हणणं जर आमच्या सुरक्षिततेला धोका असेल तर रिक्षातून उडी मारून स्वतःला वाचवू शकते पण त्यामध्ये हे शक्य नसल्याचं ते सांगतात. पण जर कॅब मधून तुम्ही प्रवास करू शकत असाल तर त्यातील ॲप मध्ये असणारे सेफ्टी प्रेफरन्स तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे.
कॅबमध्ये बसण्याआधी ही काळजी नक्की घ्या
जर तुम्ही कॅबमधून प्रवास करणार असाल तर काही गोष्टींची काळजी घेणं तुम्हाला आवश्यक आहे. जर तुम्ही उबर कॅब वापरत असाल तर कॅब बुक केल्यानंतर तुम्हाला सेटिंग मध्ये जाऊन सेफ्टी प्रेफरन्स वर असणाऱ्या सुरक्षेच्या ऑप्शन्स मध्ये जायचं आहे. यामध्ये गेट मोर सेफ्टी चेक इन, रेकॉर्ड ऑडिओ आणि शेअर ट्रिप स्टेटस या तीनही ऑप्शन्स ला ऑन करून मगच कॅबमधे बसायचं आहे.
या ऑप्शन्स चा अर्थ काय?
जेव्हा तुमची गाडी चुकीच्या दिशेने वळते किंवा अनेकदा लोकेशन वेगळे दाखवत असलं तरी शॉर्टकट च्या मार्गाने जर गाडी जात असेल तर तुमची राईड उबर कंपनी संपूर्ण वेळ चेक करते. त्याचबरोबर तुमच्या प्रत्येक राईडच्या वेळी उभर तुमचा आवाज रेकॉर्ड करते. ज्यामुळे जर काही धोक्याची कुणकुण लागली तर त्यावर कारवाई करता येऊ शकेल. याशिवाय तुमच्या राईडची सगळी माहिती आणि जीपीएस लोकेशन तुमच्या जवळच्या व्यक्तीला ऑटोमॅटिकली टाकण्यात येतं. जर तुम्हाला वाटत असेल की तुमचा जीव धोक्यात आहे तर या ॲपच्या माध्यमातून 100 नंबर डायल तुम्ही करू शकता. ज्यातून तुमच्या कॅब चा नंबर, तसेच तुमच्या राईटची संपूर्ण माहिती पोलिसांपर्यंत थेट पोहोचते.
आपल्या पर्समध्ये काही गोष्टी अवश्य ठेवा
रात्रीच्या वेळी त्यात मधून असो किंवा रिक्षाने असो, केवळ एखादा ॲपच्या माध्यमातून सुरक्षेची हमी दिली जाऊ शकत नाही. त्यामुळे तुमच्याकडे बॅकअप ऑप्शन म्हणून पर्स मध्ये काही गोष्टी जरूर ठेवाव्यात. पेपर स्प्रे, सेफ्टी पिन, किंवा तिखटाची पुडी, लेझर टॉर्च याचाही वापर केला जाऊ शकतो.