Women Health : महिलांनो सावधान...'या' 2 हार्मोन्सच्या असंतुलनामुळे होऊ शकतो Breast Cancer,आहारात या पदार्थांचा नक्की समावेश करा
Women Health : शरीरातील काही हार्मोन्सच्या असंतुलनामुळे स्तनाच्या कर्करोगाची शक्यता वाढते. या हार्मोन्सचे संतुलन राखण्यासाठी तुमच्या आहारात काही खास गोष्टींचा समावेश करा.
Women Health : अलीकडेच टिव्ही अभिनेत्री हिना खानला स्टेज 3 ब्रेस्ट कॅन्सर झाल्याचे निदान झाले, तशी पोस्ट तिने सोशल मीडियावर स्वत: केली. ज्यानंतर या विषयाकडे आणखी गंभीरतेने लक्ष देण्याची गरज आहे. महिलांमध्ये सध्या ब्रेस्ट कॅन्सरच्या प्रमाणात झपाट्याने वाढ होत आहे. यामागे अनेक कारणे असू शकतात. मात्र, अद्याप कोणतेही विशेष कारण समोर आलेले नाही. आजकालची बदलती जीवनशैली, अयोग्य आहार, कौटुंबिक जबाबदाऱ्या, व्यायामाचा अभाव, कामाचा ताण यासारख्या गोष्टींमुळे महिलांमध्ये तणाव निर्माण होत असल्याचं अनेकदा समोर आलं आहे. महिलांच्या शरीरातील काही हार्मोन्सचे असंतुलन होते, ज्यामुळे ब्रेस्ट कॅन्सरचा धोका वाढू लागतो. जाणून घ्या असे कोणते हार्मोन्स आहेत, ज्यांच्या असंतुलनामुळे स्तनाच्या कर्करोगाची शक्यता वाढते.
महिलांनो.. 'या' 2 हार्मोन्सचे संतुलन राखण्याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, शरीरातील काही संप्रेरकांच्या असंतुलनामुळेही स्तनाच्या ऊतींचा असामान्य विकास होऊ शकतो. स्तनाच्या कर्करोगाच्या सुरुवातीच्या लक्षणांकडे लक्ष देणे आवश्यक आहे जसे की स्तनामध्ये गाठ, काखेत गाठ, स्तनाच्या त्वचेचा रंग बदलणे किंवा स्तनाग्रातून स्त्राव होणे. कौटुंबिक इतिहास हे देखील स्तनाच्या कर्करोगाचे एक कारण आहे. स्तनाचा कर्करोग टाळण्यासाठी शरीरातील इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन हार्मोन्सचे संतुलन राखण्याकडे लक्ष दिले पाहिजे. येथे आम्ही तुम्हाला अशा काही पदार्थांबद्दल सांगत आहोत, जे या दोन हार्मोन्सचे संतुलन राखतात. एका वृत्तसंस्थेने घेतलेल्या मुलाखतीनुसार, आहारतज्ज्ञ मनप्रीत याविषयी माहिती देत आहेत. त्यांनी दिल्ली विद्यापीठातून न्यूट्रिशन्स विषयात मास्टर्स केले आहे.
स्तनांचे आरोग्य आणि हार्मोन्स
तज्ज्ञांच्या मते, स्तनाच्या कर्करोगाच्या पेशींच्या विकासात हार्मोनल असंतुलन महत्त्वाची भूमिका बजावते. शरीरातील प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजेन हार्मोन्स स्तनाच्या ऊतींच्या वाढीवर परिणाम करतात. महिलांची प्रजनन क्षमता, मासिक पाळी आणि लैंगिक आरोग्याव्यतिरिक्त हे दोन्ही हार्मोन्स स्तनांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे आहेत.
हार्मोन्स संतुलित करण्यासाठी हे पदार्थ खा
हार्मोन्स संतुलन राखण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात हरभऱ्याचा समावेश करावा.
ते व्हिटॅमिन बी 6 मध्ये समृद्ध आहेत आणि प्रोजेस्टेरॉनच्या उत्पादनास मदत करतात.
ब्रोकोलीमध्ये कर्करोगविरोधी गुणधर्म देखील आढळतात. शिवाय, त्यात ग्लुकोसिनोलेट्स असतात, जे इस्ट्रोजेन डिटॉक्सिफिकेशनमध्ये मदत करतात.
चेस्टबेरी चहा प्रोजेस्टेरॉनच्या निर्मितीमध्ये देखील मदत करते.
हे शरीरात प्रोजेस्टेरॉन हार्मोनचे उत्पादन वाढवते.
भोपळ्याच्या बिया हार्मोनल बॅलेन्ससाठीही खूप फायदेशीर असतात.
त्यामध्ये झिंक असते जे प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजेन हार्मोन्सचे स्तर संतुलित करते.
सूर्यफुलाच्या बिया देखील गुणांनी परिपूर्ण आहेत. हे शरीरातील इस्ट्रोजेनची पातळी संतुलित करतात आणि हार्मोनचे कार्य सुधारतात.
हेही वाचा>>>
Women Health : महिलांनो सतर्क राहा! Breast Cancer चे विविध टप्पे माहित आहेत? ते कशाप्रकारे शरीरात पसरतात? लक्षणं जाणून घ्या
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )