Karva Chauth 2024: गरोदरपणात केलाय करवा चौथचा उपवास? काय काळजी घ्याल? कसा सोडाल उपवास? तज्ज्ञांकडून जाणून घ्या..
Karva Chauth 2024: गरोदरपणात करवा चौथ व्रत करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत? उपवास सोडण्याचा योग्य मार्ग तज्ज्ञ सांगत आहेत.
Karva Chauth 2024 Women Health: आज 20 ऑक्टोबर.. आज करवा चौथचा सण साजरा केला जात आहे. या दिवशी देशभरातील विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करत निर्जला उपवास करतात. अनेक गरोदर महिला ज्यांना देखील हा उपवास करायची इच्छा असते, तर त्यांना सांगायचं म्हणजे, गरोदरपणाचा काळ आव्हानात्मक असतो. अशा परिस्थितीत, कोणत्याही प्रकारच्या निष्काळजीपणामुळे समस्या निर्माण होऊ शकतात, जर तुम्ही गरोदरपणात करवा चौथचे व्रत करत असाल तर काय काळजी घ्याल? उपवास कसा सोडावा? डॉक्टर काय सांगतात? जाणून घ्या...
गरोदरपणात केलाय करवा चौथचा उपवास?
अनेक गरोदर महिला देखील करवा चौथचा उपवास ठेवतात. मात्र, गर्भवती महिलांनी करवा चौथ उपवास करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी त्यांच्या डॉक्टरांचा सल्ला घेण्याचं आवाहन करण्यात येतंय. एका वृत्तसंस्थेने घेतलेल्या मुलाखतीनुसार पोषणतज्ज्ञ नमामी अग्रवाल म्हणतात की, गरोदरपणात दीर्घकाळ उपाशी राहिल्याने आई आणि न जन्मलेल्या बाळाच्या आरोग्यावर परिणाम होतो. पाणी न प्यायला दिवसभर उपवास केल्यास त्रास होऊ शकतो. गरोदरपणात करवा चौथ व्रत करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत हे जाणून घेऊया. यासोबतच आम्ही तुम्हाला उपवास सोडण्याचा योग्य मार्ग देखील सांगणार आहोत.
पाण्याशिवाय उपवास करू नका
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, महिलांना गरोदरपणात उपवास करायचा असेल तर त्यांनी निर्जला उपवास करू नये. असे केल्याने ॲसिडिटी होऊ शकते, ज्यामुळे उलट्या आणि चक्कर येण्याचा धोका असतो. अशावेळी महिलांनी फळे आणि ज्यूसचे सेवन करत राहावे. हे त्यांना हायड्रेटेड ठेवेल.
सरगीमध्ये 'या' गोष्टी खा
जेव्हा तुम्ही सरगी खाता, तेव्हा त्यामध्ये अशा गोष्टींचा समावेश करा, ज्यामुळे तुमचे पोट जास्त काळ भरलेले राहते आणि ज्यामुळे तुम्हाला वारंवार तहान लागत नाही. यासाठी तुम्ही प्रथिनयुक्त गोष्टींचा समावेश करू शकता. तुम्ही क्विनोआ, मसूर, अंकुरलेले मसूर, हिरव्या भाज्या, फळे, उच्च प्रथिनेयुक्त आहार, कोरडे फळे घेऊ शकता.
विश्रांती देखील महत्वाची
गर्भधारणेदरम्यान, डॉक्टर महिलांना जास्तीत जास्त विश्रांती घेण्याचा सल्ला देतात. रिकाम्या पोटी उपवास केल्याने महिलांना अशक्तपणा जाणवू शकतो. अशा स्थितीत पुरेशी विश्रांती घेणेही गरजेचे आहे. यासोबतच गर्भवती महिलांनी जास्त बोलू नये आणि प्रवास करणेही टाळावे.
उपवास कसा मोडावा?
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, व्रत ठेवण्यासोबतच उपवास सोडण्याकडेही लक्ष दिले पाहिजे. हे लक्षात ठेवा की उपवास सोडताना तुम्ही एकाच वेळी जास्त अन्न खाऊ नये. प्रथम पाणी प्या आणि नंतर ताज्या रसाने उपवास सोडावा. चहा-कॉफी सारख्या पदार्थांनी उपवास तोडू नका. यामुळे ॲसिडिटी होऊ शकते.
हेही वाचा>>>
Karva Chauth 2024: करवा चौथचा निर्जला उपवास आहे? मग दिवसभर स्वतःला 'असं' हायड्रेट ठेवा! 'या' टिप्स फॉलो करा
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )