Hair Care Tips : तुमच्या ‘या’ चुकांमुळेच सुरू होते केसगळती, जाणून घ्या अधिक..
Hair Care : बदलती जीवनशैली, तणाव किंवा आहाराव्यतिरिक्त केसगळतीची इतर अनेक कारणे आहेत. मात्र, या सर्वांशिवाय दैनंदिन जीवनात अशा काही चुका होतात, ज्याचा परिणाम केसांवर होतो
Hair fall : आजकाल केस गळणे (Hair Fall) आणि तुटणे ही एक सामान्य समस्या बनली आहे. सगळ्यांनाच त्याची काळजी आहे. सामान्यतः 50 ते 100 केस गळणे सामान्य मानले जाते. परंतु, त्यापेक्षा जास्त केस गालात असल्यास, उपचार आवश्यक आहेत. बदलती जीवनशैली, तणाव किंवा आहाराव्यतिरिक्त केसगळतीची इतर अनेक कारणे आहेत. मात्र, या सर्वांशिवाय दैनंदिन जीवनात अशा काही चुका होतात, ज्याचा परिणाम केसांवर होतो. त्यामुळे केस कमकुवत होऊन तुटायला लागतात.
केस बांधण्याची पद्धत बदला
मोकळे केस हाताळणे कठीण असते. अशा स्थितीत अनेक महिला घट्ट वेणी किंवा अंबाडा बांधतात. केसांना घट्ट बांधणे हा योग्य पर्याय नाही. याशिवाय काही लोक केसांना एकाच ठिकाणी ठेवण्यासाठी क्लिप किंवा हेअर पिन देखील वापरतात. हे सर्व केस गळणे आणि तुटण्याचे कारण ठरत आहेत. केस घट्ट बांधल्यामुळे केसांमध्ये ताण येतो, ज्यामुळे केसगळतीची समस्या सुरू होते. कधीकधी क्लिप काढताना केस तुटतात. अशावेळी, सैल रबर बँड लावा, जे केसांना बांधून ठेवण्यास मदत करतात.
ओले केस विंचरु नका
केस धुतल्यानंतर लगेच केस विंचरण्याची सवय तुमच्या केसांना खराब करू शकते. त्यामुळे केस गुंततात आणि नंतर तुटायला लागतात. म्हणून केस कोरडे होऊ द्या आणि नंतर विंचरा.
स्काल्प स्वच्छ ठेवा
स्काल्प अस्वच्छ राहिली तर, कोंडा, टाळूला खाज सुटणे, सेबोरेरिक त्वचारोग किंवा टाळूचा सोरायसिस होण्याची शक्यता असते. जर, तुम्हाला यापैकी कोणतीही समस्या दिसत असेल, तर तुम्ही तत्काळ त्वचारोगतज्ज्ञांशी संपर्क साधणे चांगले. योग्य वेळी उपचाराने या समस्यांवर नियंत्रण मिळवता येते आणि त्यावर मात करता येते.
केस घट्ट बांधू नका
केस घट्ट बांधल्यामुळे केसांमध्ये तणाव निर्माण होतो, ज्यामुळे केस गळणे किंवा तुटणे देखील सुरू होते. अशा परिस्थितीत तुम्ही तुमची हेअरस्टाईल सतत बदलत राहायला हवी. यासोबतच केस कधीही समोरून किंवा मागे ओढून घट्ट बांधू नयेत.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
हेही वाचा :
- Kitchen Tips : घरच्या घरी बनवा चविष्ट व्हेज गार्लिक सूप, लहान मुलांच्या आरोग्यासाठीही फायदेशीर!
- Beauty Tips : लिंबाच्या सालीचा असा करा वापर, फाटलेल्या ओठांपासून कोंड्यापर्यंतची समस्या होईल दूर
- Coffee Benefits: दररोज किती कॉफी पिणे योग्य? पाहा कॉफीचे फायदे
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha