PCOS : रोजच्या धावपळीच्या आणि बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक महिलांना PCOS सारख्या गंभीर आजाराला सामोरे जावे लागते. PCOS म्हणजे 'पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम'. आजकाल बऱ्याच महिला PCOS ने ग्रस्त असलेल्या पाहायला मिळतात. हा आजार महिलांच्या शरीरातील हार्मोन्सचे संतुलन बिघडल्यामुळे होतो. साधारपणे हा आजार 18 ते 35 वयोगटातील महिलांना होतो. मात्र PCOS ने ग्रस्त असलेल्या महिलांनी या आजाराला वेळीच नियंत्रणात ठेवणे गरजेचे आहे. 'ऍपल आणि हार्वर्ड'च्या 'वुमेन्स हेल्थ रिसर्च'नुसार, पीसीओएसने पीडित महिलांमध्ये उच्च रक्तदाब (High Blood Pressure) होण्याची शक्यता तीन पटीने वाढते. जाणून घेऊयात सविस्तर.


इंडियन एक्सप्रेसच्या एका वृत्तानुसार, शरीरातील इंन्श्युलिनची पातळी नियंत्रणात नसेल तर PCOS होऊ शकतो. ज्यामुळे अचानक तु्मचे खूप वजन वाढते, अनियमित पाळी तसेच अँड्रोजनचे प्रमाणही वर-खाली होते. या सर्व कारणांमुळे हार्मोन ओव्हयुलेशन पॅटर्नमध्ये अडथळा निर्माण होतो. परिणामी उच्च रक्तदाब होण्याची शक्यता वाढते.


PCOS ने ग्रस्त असणाऱ्या महिलांना उच्च रक्तदाबाचा होण्याचा मोठा धोका असतो. PCOS ने ग्रस्त असणाऱ्या महिलांना लठ्ठपणा येतो. त्यामुळे त्या महिलांनी चांगली झोप आणि संतुलित आहार घेणे अत्यंत गरजेचे आहे. सोबतच त्यांनी मीठाचे आणि साखरेचे प्रमाण कमी करणे देखील गरजेचे आहे. पीसीओएस रुग्णांना गर्भधारणेसाठी खूप अडचणी येतात. मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचेही ते बळी होतात.


PCOS असलेल्या महिलांनी काय काळजी घ्यावी


- रोजच्या आहारात कार्बोहायड्रेट्स , जीवनसत्वे अशा पोषक घटकांचा समावेश करावा. तसेच रोज व्यायाम करणं गरजेचे आहे. मद्यपान , धुम्रपान , तणाव घेणे या गोष्टी तात्काळ बंद करा.


- व्यायाम करा, त्यासोबत कार्डिओ करा. जसे धावणे, सायकल चालवणे, पोहणे, अॅरोबिक्स, दोरीवरच्या उड्या हे न चुकता करा. 


- पीसीओएसने त्रस्त महिलांनी त्यांचे बीपी नियंत्रणात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच वेळोवेळी डाॅक्टरांचा सल्ला घ्या.


PCOS पासून कशी सुटका मिळवाल?


PCOS आजार पूर्णपणे बरा होऊ शकत नाही परंतु योग्य काळजी घेतल्यास यावर नियंत्रण मिळवता येते. यासाठी योग्य आहार, नियमित व्यायाम आणि औषधं घेणे अतिशय महत्वाचं आहे. हा आजार नियंत्रणात ठेवण्यासाठी तंदुरुस्त राहणं सर्वात आवश्यक आहे. वजन कमी झाल्यामुळे PCOS कमी होण्यास सुरुवात होते आणि जास्त वजनामुळे PCOS वाढते. त्यामुळे तुमचे वजन नियंत्रणात ठेवणं गरजेच आहे. 


 


इतर महत्वाच्या बातम्या


Health Tips: मस्त चव घेऊन खाताय लोणचं? तर सावधान, अतिसेवनाने 'या' आजारांना पडाल बळी