BMI Measurement: जगातील बऱ्याच लोकांमध्ये लठ्ठपणाचं प्रमाण वाढत आहे. शरीराचा फिटनेस (Fitness) आणि लठ्ठपणाचा अनुमान लावण्यासाठी सर्वत्र बॉडी मास इंडेक्सचा (BMI) वापर केला जातो. पण आता केवळ या प्रमाणाचा वापर करण्यावर बरेच डॉक्टर आणि लठ्ठपणा चिकित्सक प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. त्याचप्रमाणे 4 जून 2023 रोजी, अमेरिकन मेडिकल असोसिएशनने एक नवीन धोरण स्वीकारलं, ज्यामध्ये डॉक्टरांना क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये बॉडी मास इंडेक्स, म्हणजेच बीएमआयची भूमिका कमी करण्यास सांगितलं आहे.
BMI द्वारे परिभाषित केल्यानुसार 40 टक्क्यांपेक्षा जास्त अमेरिकन लोकांमध्ये लठ्ठपणा आहे. BMI पेक्षा वेगळे परिमाण अंमलात आणण्याची गरज असल्याचं डॉक्टर सांगतात. BMI मध्ये दिसणाऱ्या परिणामामुळे रुग्ण अधिक चिंतेत जातात. त्यामुळे, हेल्थकेअर सेटिंग्जमध्ये BMI च्या सध्याच्या वापराचे पुनरावलोकन करण्याची आणि भारदस्त शरीराच्या वजनाच्या आरोग्य धोक्यांच्या मूल्यांकनासाठी भविष्यात वेगळी परिमाणे आणण्याची गरज असल्याचं डॉक्टर सांगतात.
बीएमआयचा परिमाण काय?
एखाद्या व्यक्तीचा उंची आणि वजनाच्या आधारावरील बीएमआय इंडेक्स 18.5 पेक्षा कमी आला तर तो सामान्यपेक्षा कमी असतो. जर तुमचा बीएमआय स्तर 18.5 पासून 24.9 दरम्यान असेल तर तो योग्य आहे. मात्र बीएमआय स्तर जर 25 किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर काळजीचं कारण आहे. अशा व्यक्तींना हृदयाचे आजार, स्ट्रोक, मधुमेह होण्याची भीती असते. 30 पेक्षा जास्त बीएमआय असल्यास लठ्ठपणाशी संबंधित सर्व आजार तुम्हाला होऊ शकतात.
प्रमुख मर्यादा
बीएमआय एखाद्या व्यक्तीच्या शरीरातील चरबीच्या टक्केवारीचा अचूक अंदाज लावते आणि त्यामुळे, भारदस्त वजनाच्या लोकांमधील आरोग्य धोक्यांचा अंदाज लावला जातो. परंतु BMI एखाद्या व्यक्तीसाठी शरीरातील चरबी थेट मोजत नाही. वय, स्नायूंचे प्रमाण, लिंग यांसारख्या विविध घटकांवर आधारित शरीरातील चरबीची टक्केवारी लक्षणीयरीत्या भिन्न असू शकते.
उदाहरण घ्यायचे झाल्यास, वयाच्या पंचविशीत असलेल्या शरीरातील चरबीची टक्केवारी पुरुषांसाठी 14% ते 35% आणि महिलांसाठी 26% ते 42% पर्यंत असते. त्यामुळे, बीएमआय डॉक्टरांना शरीराच्या वजनाबद्दल अचूक माहिती देऊ शकत नाही किंवा ती चरबी शरीरात कशी वितरीत केली जाते हे सांगू शकत नाही, हे संशोधनात दिसून आले.
सूचवलेले पर्याय
AMA संशोधनाने BMI व्यतिरिक्त इतर उपायांची चाचपणी करण्याचे निर्देश दिले आहेत. जास्त वजन असलेल्यांना आरोग्याशी संबंधित जोखीमा सुरळीतपणे कळाव्या, यासाठी डॉक्टरांनी ही शिफारस केली आहे. बॉडी अॅडिपोसिटी इंडेक्स (Body Adiposity Index), सापेक्ष फॅट मास (Relative Fat Mass), वेस्ट-टू-हिप रेशो (waist-to-hip ratio) आणि कंबरेचा घेर (waist circumference) यासह विविध पर्याय अमेरिकेतील डॉक्टरांनी सुचवले आहेत. हे उपाय शरीरातील चरबीचे वितरण अधिक चांगल्या प्रकारे दर्शवण्याचा प्रयत्न करतात आणि त्यामुळे अंतर्गत अवयवांच्या सभोवतालच्या चरबीमुळे वाढलेले आरोग्याचे धोके लक्षात घेता येतात.
आरोग्याचे सामान्य उपाय म्हणून किंवा लठ्ठपणाच्या उपचारांच्या गरजेचे मूल्यांकन करण्यासाठी एक साधन म्हणून BMI वापरण्यातील मर्यादा मान्य करून, AMA ने क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये BMI ची भूमिका कमी करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे. भारदस्त शरीराच्या वजनाच्या लोकांच्या आरोग्य धोक्यांचे मूल्यांकन करण्यासाठी सर्वोत्तम मार्ग ओळखण्यासाठी पुढील संशोधन आवश्यक आहे, असंही ते म्हणाले.
हेही वाचा: