Health Tips: बऱ्याचदा त्याच त्याच जेवणामुळे (Food) आपल्याला कंटाळा येतो, मग आपण अशा वेळी जेवणाची चव वाढवण्यासाठी लोणचं किंवा पापडाचा आधार घेतो. पण जर तुम्ही दररोज जेवणासोबत लोणचं खात असाल तर सावधान, कारण हे अनेक आजारांचं कारण बनू शकतं. कळत-नकळत तुम्हाला आजारांचा सामना करावा लागू शकतो. जेवणासोबत लोणचं खाल्ल्याने कोणत्याही साध्या जेवणाची चव वाढते हे जरी खरं असलं तरी, जास्त लोणचं खाणं तुमच्या आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे. त्याचबरोबर ते अनेक आजारांना आमंत्रण देणारं आहे.


लोणचं जास्त खाऊ नये असं का सांगितलं जातं?


जास्त लोणचं खाऊ नये असं अनेकदा सांगितलं जातं, कारण त्यात मोठ्या प्रमाणात मीठ वापरलं जातं. त्यामुळे तुमच्या शरीरात सोडियमचं प्रमाण वाढू शकतं. जास्त प्रमाणात लोणचं खाल्ल्यास पोट फुगणे, उच्च रक्तदाब (High BP) आणि किडनीच्या आजाराशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. लोणच्यामध्ये असलेलं सोडियम तुमच्या शरीरातील कॅल्शियम कमी करू शकतं, त्यामुळे हाडं आकुंचन पावतात.


कोलेस्ट्रॉलची समस्या


अति प्रमाणात लोणचं खाणाऱ्या व्यक्तीला उच्च कोलेस्ट्रॉलची (High Cholestrol) समस्या उद्भवते, त्यामुळे जास्त लोणचं खाणं टाळावं. लोणचं दीर्घकाळ साठवले जाते आणि त्यामध्ये भरपूर तेल वापरलं जातं. त्याताल तेलामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉल वाढतं.


उच्च रक्तदाबाचा त्रास


बीपीच्या रुग्णांसाठी लोणचं खाणे विषासमान आहे. लोणच्यामध्ये असलेलं मीठ बीपीच्या रुग्णांच्या शरीरात सोडियमचं प्रमाण वाढवतं, ज्यामुळे हृदयविकार होऊ शकतो. त्याच वेळी, रक्तवाहिन्यांचं देखील नुकसान होऊ शकतं.


शरीरात सूज येऊ शकते


लोणचं जास्त खाल्ल्याने सूज येऊ शकते. कारण लोणचं जास्त काळ ताजं ठेवण्यासाठी त्यात मीठ आणि तेल मिसळून ते जास्त काळ टिकवलं जातं. जास्त लोणचं खाल्ल्याने पोटात गॅसची समस्या देखील होऊ शकते आणि चयापचय आणि यूरिक ऍसिडच्या समस्या देखील वाढू शकतात.


हाडं कमकुवत होतात


लोणच्यामध्ये सोडियमचं प्रमाण जास्त असल्याने हाडं कमकुवत होतात, त्यामुळे शरीरात कॅल्शियमची समस्या सुरू होते. यामुळेच जास्त आंबट पदार्थ खाणाऱ्यांना सांधेदुखीचा त्रास होतो. लोणच्याचा जास्त वापर केल्याने आपल्या पोटातील आम्लता वाढते. तसंच त्याचं जास्त प्रमाणात सेवन केल्याने अ‍ॅसिडिटी, गॅस, करपट ढेकर येणं या सारख्या समस्या उद्भवू शकतात.


हेही वाचा:


Health Tips: सतत पाठदुखीचा त्रास जाणवतोय? तर घरीच सुरु करा 'हे' योगासन; त्वरित मिळेल आराम