Health Tips : उच्च रक्तदाब ही आजकाल एक सामान्य समस्या बनत चालली आहे. बिघडलेल्या जीवनशैलीमुळे मोठ्या प्रमाणात लोक हाय बीपीला बळी पडत आहेत. अमेरिकन हार्ट असोसिएशनने जारी केलेल्या अॅडव्हायझरीमध्ये असे सांगण्यात आले आहे की, बहुतेक लोक घरामध्ये बीपी व्यवस्थित तपासत नाहीत. ते डिजिटल ब्लड प्रेशर मॉनिटर मशीनने ब्लडप्रेशरचे चुकीचे रीडिंग करतात आणि त्यामुळे चिंता करतात. याबाबत इंडियन मेडिकल असोसिएशनशी संबंधित डॉक्टर आणि कार्डिओलॉजिकल सोसायटी ऑफ इंडियाच्या सदस्यांनी घरच्या घरी बीपी तपासण्याचा योग्य मार्ग सांगितला आहे. याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
 
रक्तदाब कधी तपासू नये?


अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या म्हणण्यानुसार रक्तदाब तपासताना काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यापैकी एक म्हणजे बसण्याची पद्धत. काही शारीरिक काम केल्यावर लगेच बीपी कधीच तपासू नये. हृदयरोग तज्ञांच्या मते, घरी रक्तदाब तपासण्यापूर्वी, टॉयलेट देखील करणं गरजेचं आहे. बेडवर बसूनही बीपी तपासू नये.
 
BP तपासताना स्थिती कशी हवी?


डॉक्टरांच्या मते, बीपी तपासताना खुर्चीवर बसा आणि खुर्चीच्या मदतीने पाठ सरळ ठेवा. पायाचे तळवे जमिनीच्या समान ठेवा. बीपी तपासताना हाताचं कोपर टेबलावर सरळ ठेवा. अशा परिस्थितीत, तुमचा बीपी अचूक येऊ शकतो.
 
बेडवर बसून बीपी तपासता येतो


तज्ज्ञांच्या मते, बेडवर बसून रक्तदाबाचं रिडींग करणे ही योग्य सवय नाहीये. त्यामुळे अचूक वाचन होण्याची शक्यता कमी राहते. हृदयरोग तज्ञ सांगतात की, बरेच लोक सकाळी बेडवरच रिडींग करतात. हा पूर्णपणे चुकीचा मार्ग आहे. अशा परिस्थितीत बीपीचे रिडींग चुकीचे असू शकते. तसेच, अनेकदा आकड्यांमध्ये बदल देखील होऊ शकतो.
 
हॉस्पिटलमध्ये बेडवर झोपून बीपी तपासला जातो


याबाबत हृदयरोगतज्ज्ञ सांगतात की, रुग्णाला रुग्णालयात बसण्याचीही मुभा दिली जात नाही. अशा स्थितीत बेडवरच रूग्णाच्या बीपीचे निरीक्षण केले जाते. हे काम डॉक्टर आणि प्रशिक्षित पॅरामेडिकल स्टाफच्या देखरेखीखाली केले जाते. बहुतेक रुग्णांचा रक्तदाब अशा प्रकारे तपासला जातो. रूग्णालयातही रूग्णाने नेहमी पाठ खुर्चीवर ठेवून, टेबलावर हात ठेवून आणि पाय खाली ठेवूनच बीपी तपासावा.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


महत्त्वाच्या बातम्या :


Health Tips : तपासल्यावर मशीन प्रत्येक वेळी वेगवेगळे वजन दाखवते? जाणून घ्या वजन तपासण्याची सर्वात योग्य वेळ कोणती?