Disease Cause Due To Vitamin Deficiencies : गाडी निट चालण्यासाठी ज्याप्रमाणे पेट्रोलची गरज असते, तशीच आपल्या शरीराला गरज असते ती व्हिटामिनची. शरीराला सुरळीत चालवण्यासाठी विविध पदार्थातून  व्हिटामिन शरीरात जायला हवेत. व्हिटामिन कमतरतेमुळे तुम्हाला अनेक आजारांचा सामना करावा लागतो. जाणून घेऊया कोणत्या व्हिटामिनच्या कमरतेमुळे कोणता आजार होतो. 


व्हिटामिन बी


व्हिटामिन बी आपल्या शरीरासाठी फार महत्वाचे आहे. व्हिटामिन बी चे अनेक प्रकार आहेत. या प्रकारांचे देखील आपल्या शरीरात फार महत्व आहे. शरीरात व्हिटामिन  B1 आणि व्हिटामिन  B2 ची कमतरता असेल तर नर्व्हस सिस्टम, स्किन, डोळे या भागांवर थेट परिणाम होतो. तसेच व्हिटामिन  B3 च्या कमतरतेमुळे थकवा , उलटी आणि पचन प्रक्रिया नीट न होणे या समस्या उद्भवतात. B6 च्या कमतरतेमुळे डिप्रेशन, कन्फ्यूजन, अॅनेमियाचा सामना करावा लागतो. तसेच व्हिटामिन  B12 मुळे भूक न लागणे, पोटात गॅस तयार होणे श्वास घेण्यास त्रास होणे असे आजार होऊ शकतात. व्हिटामिन बी हे जीन्स आणि डीएनए आपल्या शरीरात तयार करण्यासाठी फार महत्वाचे असते. शरीरात रेड ब्लड सेल्स तयार करण्याचे कामही व्हिटामिन बी करते. व्हिटामिन बीची कमतरता भरून काढायची असल्यास रोजच्या आहारात अंडे, मटण, मासा आणि दुधाचे पदार्थ यांचा समावेश करावा. 


व्हिटामीन ए


इतर व्हिटामिन प्रमाणेच व्हिटामिन ए शरीरासाठी फार महत्वाचे आहे. हे एक उत्कृष्ट अँटिऑक्सिडेंट आहे जे फ्री रॅडिकल्सच्या हानिकारक प्रभावापासून संरक्षण करण्यास मदत करते. शरीराच्या विकासातही ते खूप महत्त्वाची भूमिका बजावते. व्हिटॅमिन एच्या कमतरतेचा सर्वात जास्त परिणाम डोळ्यांवर होतो. त्याच्या कमतरतेमुळे रोगप्रतिकारशक्ती कमकुवत राहते. तुम्हाला वारंवार संसर्ग होऊ शकतो.


व्हिटॅमिन एच्या कमतरतेमुळे तुम्हाला अॅनिमियाचा देखील होऊ शकतो. मूत्रमार्गाच्या संसर्गाव्यतिरिक्त श्वसनाचा त्रास उद्भवू शकतो. व्हिटामिन ए च्या कमतरतेमुळे यकृताचे आजारही होऊ शकतात. हे व्हिटामिन आपल्या शरीराच्या स्किन , केस , दात आणि हिरड्या यासाठी सुद्धा महत्वाचे असते. सोबतच व्हिटामिन ए च्या अभावामुळे  स्किनच्या समस्या निर्माण होतात. व्हिटामीन ए आपल्या हाडांना भक्कम बनवते. गहू, पालक, पालेभाज्या, केळी, गाजर, सोयाबीन इ. समावेश आहारात करावा. 


व्हिटामिन के


व्हिटामिन के च्या कमतरतेमुळे अनेक भयंकर आजारांना तुम्हाला सामोरे जावे लागू शकते. आरोग्याच्या दृष्टीने विचार केला तर व्हिटामिन के संतुलित मात्रामध्ये असणे गरजेचे आहे. याच्या अभावामुळे ऑस्टियोपोरोसिस हा आजार तुम्हाला होऊ शकतो. तसेच कर्करोग होण्याचीही रिस्क मोठ्या प्रमाणात वाढू शकते. शरीरातील धमन्या कडक होतात. मासिक पाळीमध्ये पोटात खूप दुखणे , जास्त प्रमाणात रक्त जाणे अशा अनेक समस्या व्हिटामिन के च्या कमतरतेमुळे होतात. याची कमतरता भासू नये म्हणून कीवी, लाल मिरची, ब्रोकली, ऑलिव ऑईल हे खाऊ शकता. 


व्हिटामिन सी


शरीराच्या योग्य विकासासाठी व्हिटॅमिन सी देखील खूप महत्वाचे आहे. व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे केवळ त्वचेच्या समस्या उद्भवत नाहीत तर दात आणि हिरड्यांवरही त्याचा विशेष परिणाम होतो. शरीरात व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे, कोलेजनची कमतरता निर्माण होते. त्यामुळे हिरड्यांमधून रक्त येते. तसेच पुन्हा पुन्हा दात तुटू शकतात. व्हिटॅमिन सी हे रोगप्रतिकारक शक्तीसाठी खूप महत्वाचे आहे. त्याच्या कमतरतेमुळे रोग प्रतिकारशक्ती कमी होऊ शकते. तुम्ही पुन्हा पुन्हा आजारी पडू शकता. तुम्हाला थकवा, स्नायू दुखणे, अशक्तपणा जाणवू शकतो. जर तुमच्या शरीरात व्हिटॅमिन सीची कमतरता असेल तर तुमच्या जखमा बऱ्या होण्यासाठी बराच वेळ लागू शकतो. व्हिटॅमिन सीची कमतरता भरून काढण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात मोसंबी, लिंबू, संत्री, जॅकफ्रूट, द्राक्षे, पुदिना, टोमॅटो,  फळे आणि भाज्यांचा आहारात समावेश करू शकता.


व्हिटामिन डी


शरीराच्या योग्य वाढीसाठी व्हिटामिन डी ची आवश्यकता असते. याच्या कमतरतेमुळे हाडे ठिसूळ होतात. अर्थराइटिस, ऑस्टियोपोरोसिस असे भयानक आजार तुम्हाला होऊ शकतात.  शरीरात व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे, हाडे ठिसूळ होतात आणि ते लगेच मोडू शकतात. यावरील सगळ्यात चांगला उपाय म्हणजे सकाळचे कोवळे ऊन. सकाळी उठल्या उठल्या कोवळ्या ऊन्हात 15 मिनट बसला तर व्हिटामिन डी तुम्हाला मिळू शकते. 


व्हिटामिन ई


त्वचा आणि सुंदर केसांकरीता व्हिटामिन ई चा आहारात समावेश असणे गरजेचे असते. तसेच व्हिटामिन ई तुमचे अनेक आजारांपासून संरक्षण करू शकते. व्हिटामिन ई कमतरतेमुळे इम्यून सिस्टम कमजोर बनू शकते. डोळ्यांचे आजार उद्भवू शकतात. याव्यतिरीक्त व्हिटामिन ई कोलेस्ट्रॉल नियंत्रणीत ठेवण्यास मदत करते. याची कमतरता भरून काढण्यासाठी पालक , बदाम , भुईमूग , अंडे , पालेभाज्या , आंबा याचा समावेश आहारात करावा. 


 


इतर महत्वाच्या बातम्या


Latur Pattern: शंभर नंबरी 'लातूर पॅटर्न'... दहावीच्या निकालात लातूरची भरारी...