Diabetes : फक्त साखर आणि गोड खाण्यामुळेच निर्माण होते का मधूमेहाची शक्यता? जाणून घ्या कोणती आहेत इतर कारणं
पण मधुमेह होण्यामागे फक्त गोड खाणं हेच एक कारण नाही.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयामागे अनेक कारणं आहेत.
मधुमेह हा रक्तातील साखर वाढण्याशी संबंधित आजार आहे.
खरंतर ज्या पदार्थांमध्ये साखरचे प्रमाण असते म्हणजेच बटाटा, भात यांसारख्या पदार्थांचा देखील त्यामध्ये समावेश आहे.
त्यामुळे मधूमेहासाठी फक्त साखर किंवा एखादा गोड पदार्थ कारणीभूत नसून ज्या पदार्थांमध्ये साखरेचे प्रमाण असते त्यामुळे मधूमेह होण्याची शक्यता निर्माण होते.
जेव्हा आपलं स्वादुपिंड पुरेसं इन्सुलिन तयार करण्यास सक्षम नसते तेव्हा आपल्या शरीराला इन्सुलिनची गरज पडते.
यामुळे अनेक समस्या देखील होतात.
हृदय आणि किडनीशी संबंधित आजार यामुळे उद्भवतात.
जर मधूमेहाचे प्रमाण जास्त असेल तर यामुळे दृष्टी जाणे यांसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात.
तसेच व्यायाम न करणं, वजन जास्त असणं, पुरेशी झोप न होणं यांमुळे देखील मधूमेहाची सम्या निर्माण होऊ शकते.