Winter Health Tips : हिवाळ्यात 'या' लोकांना सर्दी, खोकल्याचा जास्त त्रास होतो; यामागचं कारण नेमकं काय? वाचा सविस्तर
Winter Health Tips : तापमान कमी होताच सर्दी-खोकल्याचा त्रास वाढतो. पण तुम्हाला माहित आहे का की या समस्येमागील सर्वात मोठे कारण म्हणजे तुमची कमजोर प्रतिकारशक्ती आहे.
Winter Health Tips : हिवाळ्यात (Winter Season) सर्वसामान्यपणे सर्वांनाच होणारे दोन आजार म्हणजे सर्दी आणि खोकला. तापमान कमी होताच सर्दी-खोकल्याचा त्रास वाढतो. पण तुम्हाला माहित आहे का की या समस्येमागील सर्वात मोठे कारण म्हणजे तुमची कमजोर प्रतिकारशक्ती आहे. कमजोर प्रतिकारशक्ती असलेल्या लोकांना आजार लवकर होतात. म्हणूनच या ऋतूत लोकांना विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. आज या ठिकाणी आम्ही तुम्हाला अशी पाच कारणे सांगणार आहोत ज्यांमुळे सर्दी आणि खोकला आपली साथ सोडत नाही.
'या' पाच कारणांमुळे सर्दी, खोकला होतो
1. धूम्रपान
जर तुम्हाला वारंवार सर्दी आणि खोकल्याचा त्रास होत असेल तर तुम्ही वेळीच धूम्रपान करणे बंद केले पाहिजे. धूम्रपानामुळे तुमच्या रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम होतो, ज्यामुळे एखाद्या व्यक्तीला वारंवार सर्दी होण्याची शक्यता असते. धूम्रपान सोडण्याचा आणि निरोगी राहण्याचा प्रयत्न करा.
2. स्वच्छता न राखणे
वारंवार सर्दी आणि खोकल्याचा त्रास उद्भवणे यासाठी तुमचं अस्वच्छ राहणे हे देखील एक कारण असू शकतं. अशा परिस्थितीत, आपण आपल्या सभोवतालची स्वच्छता ठेवली पाहिजे. खोकताना आणि शिंकताना तोंड झाकून ठेवा. साबण आणि पाण्याने हात वेळोवेळी स्वच्छ धुवा. मास्क घाला आणि आजारी लोकांपासून दूर राहा.
3. ताणतणाव
तणाव केवळ तुमच्या मानसिक आरोग्यावरच नाही तर तुमच्या शारीरिक आरोग्यावरही परिणाम करू शकतो. तणावामुळे मनःशांती नाहीशी होते. तणावाखाली राहणाऱ्या लोकांची रोगप्रतिकार शक्ती कमजोर असते त्यामुळे त्यांच्यामध्ये सर्दी होण्याचा धोका वाढतो.
4. झोपेचा अभाव
शरीर निरोगी ठेवण्यासाठी रोज आठ तासांची चांगली झोप आवश्यक आहे. जर तुम्हाला चांगली झोप मिळाली नाही तर, तुमची रोगप्रतिकारक शक्ती कमजोर होते आणि सर्दी, खोकल्याचा त्रास होतो.
5. थंडीच्या दिवसांत घरात राहणे
हिवाळ्याच्या दिवसांत थंड तापमानामुळे, बहुतेक लोक त्यांचा बहुतेक वेळ घरामध्ये घालवतात. असे केल्याने तुमची रोगप्रतिकारक शक्ती कमजोर होते आणि तुम्ही आजारी पडतात. याचबरोबर, थंड तापमानामुळे, आपल्याला अनेक ऍलर्जीदेखील उद्भवतात.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्त्वाच्या बातम्या :