(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Winter Health Tips : तुमच्या दिवसाची सुरुवात 'या' सुपरफूड्सने करा; मिळतील आश्चर्यकारक फायदे
What To Eat In Morning : जर तुम्हीसुद्धा सकाळी पोट साफ न होण्याच्या समस्येने त्रस्त असाल तर या ठिकाणी आम्ही तुम्हाला काही पदार्थांची नावं सांगणार आहोत.
What To Eat In Morning : हिवाळ्यात दिवसाच्या सुरुवातीलाच जर पोट साफ झाले नाही तर त्याचा परिणाम तुमच्या संपूर्ण दिवसावर होतो. त्याचबरोबर, पोट साफ न झाल्यामुळे त्वचेवरही हा परिणाम दिसू लागतो. जर तुम्हीसुद्धा सकाळी पोट साफ न होण्याच्या समस्येने त्रस्त असाल तर या ठिकाणी आम्ही तुम्हाला काही पदार्थांची नावे सांगणार आहोत. हे पदार्थ रोज खाल्ल्याने तुमचे पोटही साफ होईल. तसेच तुमची मुरुमांपासूनही सुटका होईल आणि तुमची पचनशक्तीही नीट राहील. हे पदार्थ कोणते ते जाणून घ्या.
बद्धकोष्ठता टाळण्यासाठी काय करावे?
हिवाळ्यात अनेकांना बद्धकोष्टतेचा त्रास जाणवतो. अशा वेळी सकाळच्या नाश्त्यापूर्वी काही पदार्थांचे सेवन करावे. असे पदार्थ खावेत जे तुमच्या शरीरासाठी फायदेशीरही ठरतील आणि त्यातून तुम्हाला भरपूर फायबरही मिळेल. हे पदार्थ खालीलप्रमाणे आहेत.
- खजूर
- मेथीचे दाणे
- आवळा
- गायीचे तूप
- मनुके
'या' पदार्थांचे सेवन कसे करावे?
खजूर : खजूर तुमच्या पोटासाठी फार चांगले मानले जाते. यासाठी दररोज 2 ते 3 खजूर रात्रभर पाण्यात भिजत ठेवा आणि सकाळी नाश्त्यापूर्वी त्याचे सेवन करा. तुम्ही ते दुधाबरोबर खाऊ शकता किंवा कोमट पाण्याबरोबर देखील खाऊ शकता.
मेथीच्या दाण्याची पावडर : जर तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास वाढत असेल तर रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा मेथीदाण्यांचे चूर्ण कोमट पाण्याबरोबर घ्या.
आवळा : बद्धकोष्ठता दूर ठेवण्याबरोबरच आवळा आरोग्याच्या अनेक समस्यांपासून बचाव करतो. तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी आवळा खा. जर बद्धकोष्ठतेची समस्या जास्त जाणवत असेल तर तुम्ही जेवणात किंवा सूपमध्ये आवळ्याचा वापर केला तरी चालेल.
गायीचे तूप : देशी गाईचे शुद्ध तूप पचनसंस्थेसाठी रामबाण औषधासारखे काम करते. गाईचे तूप सकाळी दूध किंवा चहामध्ये घालून सेवन करू शकता. यामुळे तुम्हाला बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून मुक्ती मिळेल.
मनुका : रात्री पाण्यात भिजवलेले 5 ते 10 मनुके सकाळी रिकाम्या पोटी खा. यामुळे सुद्धा तुमचा बद्धकोष्टतेचा त्रास दूर होईल.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्त्वाच्या बातम्या :