Winter Hair Care Tips : हिवाळ्यात केसांशी संबंधित 'ही' चूक करताय? वेळीच सावध व्हा; अन्यथा...
Winter Hair Care Tips : केसांची जर योग्य निगा राखली नाही तर केस पातळ होऊ लागतात. ही परिस्थिती हळूहळू केस गळण्याचे कारण होऊ शकते.
Winter Hair Care Tips : हिवाळ्यात केसांची योग्य काळजी घेतली नाही तर त्याचा थेट परिणाम केसांच्या वाढीवर होतो. केसांची जर योग्य निगा राखली नाही तर केस पातळ होऊ लागतात. ही परिस्थिती हळूहळू केस गळण्याचे कारण होऊ शकते. म्हणूनच हिवाळ्यात तुमच्या केसांचे प्रमाण कोणत्या कारणांमुळे कमी होते याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. सुरुवात आपण हेअर कंडिशनरपासून करूयात.
जर तुम्ही हिवाळ्यात हेअर कंडिशनर जास्त वापरत असाल तर तुम्हाला पातळ केसांच्या समस्येला सामोरे जावे लागू शकते. कारण हेअर कंडिशनरच्या जास्त वापरामुळे केसांना फायदा होण्याऐवजी नुकसान होते. हेअर कंडिशनर देखील एका मर्यादेत वापरावे तरच केसांना फायदा होतो.
केसांचे कंडिशनर किती वेळा करावे?
- हिवाळ्यात प्रत्येक वेळी शॅम्पू करताना कंडिशनर वापरू नका.
- केसांमध्ये ओलावा टिकवण्यासाठी तेल लावा. केस धुण्यापूर्वी केसांना तेल लावा, चांगलं मसाज करा आणि कमीत कमी अर्धा तास ठेवल्यानंतर शॅम्पू करा. त्यामुळे केसांमध्ये ओलावा टिकून राहून केसांचं प्रमाणही वाढू लागतं.
हिवाळ्यात केस पातळ होण्याची कारणे कोणती?
जास्त प्रमाणात हेअर कंडिशनर वापरण्याव्यतिरिक्त, इतर अनेक कारणांमुळे हिवाळ्यात केसांचे प्रमाण कमी होऊ लागते. जसे की...
- मोकळ्या हवेत केस न बांधणे, केस मोकळे सोडणे.
- वारंवार केस धुणे आणि केसांना तेल न लावणे.
- केसांवर अनेक कॅमिकलयुक्त पदार्थांचा वापर करणे.
- कोरडे केस मोकळे सोडणे.
- कोमट पाण्याऐवजी गरम पाण्याने केस धुणे.
हिवाळ्यात केसांशी संबंधित दुसरी सर्वात सामान्य चूक म्हणजे गरम पाण्याने केस धुणे. लक्षात ठेवा की, केस धुण्यासाठी कोमट पाण्याचा वापर करा. गरम पाण्याने केसांची मुळे पूर्णपणे कोरडी होतात.
केस निरोगी आणि घनदाट ठेवण्यासाठी काय करावे?
- आठवड्यातून किमान दोनदा केसांना तेल लावावे.
- आठवड्यातून दोन ते तीन वेळा केस धुवणे.
- हर्बल शैम्पूचा वापर करणे.
- आहारात लोहयुक्त अन्न आणि दुग्धजन्य पदार्थांचा समावेश करा.
- शारीरिकदृष्ट्या सक्रिय राहा, यामुळे रक्त परिसंचरण वाढते आणि केसांचे आरोग्य सुधारते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्त्वाच्या बातम्या :