Health Tips : पिस्ता आरोग्यासाठी चांगला... पण दिवसात कधी आणि किती खावा? जाणून घ्या
Health Tips : हिवाळ्यात ड्रायफ्रूट्स खाल्ल्याने शरीराला कोणतीही हानी होत नाही, परंतु विशेषतः उन्हाळ्यात जर तुम्ही भरपूर ड्रायफ्रुट्स खाल्ले तर त्याचे दुष्परिणाम शरीरावर दिसून येतात.
Health Tips : पिस्ता हा ड्रायफ्रूटचा एक प्रकार आहे. पिस्ता तुम्ही असाही खाऊ शकता आणि दुधात मिसळून खाल्ल्यास त्याची चव दुप्पट वाढते. सण, उत्सव किंवा लग्नाच्या शुभ मुहूर्तावर लोक एकमेकांना भेट म्हणून सुका मेवा नक्कीच देतात. काहींना भाजलेले स्नॅक्स पिस्ता खायला आवडतात तर काहींना ते नुसतेच खायला आवडतात. पिस्त्याचा वापर अनेक पदार्थांत केला जातो. विशेषत: गोड पदार्थांत पिस्ता वापरला जातो. एकूणच पिस्ता हा पौष्टिकतेने परिपूर्ण आहे. पण एका दिवसात पिस्ते आणि बदाम किती खावे हे तुम्हाला माहित आहे का?
पिस्ते कधी खावेत?
तुम्ही जेव्हाही पिस्ता खाता तेव्हा वेळेची काळजी घ्या. सकाळी रिकाम्या पोटी पिस्ता खा. जर तुम्ही रोज रिकाम्या पोटी पिस्ते खाण्याचा विचार करत असाल तर रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. आणि सकाळी रिकाम्या पोटी खा. कारण भिजवलेले पिस्ते खाल्ल्याने तुमचे आरोग्य सुधारेल.
एका दिवसात किती पिस्ते खावेत?
उन्हाळ्यात पिस्ता खाणे टाळा कारण त्याचा प्रभाव उष्ण असतो. तुम्ही एका दिवसात 10-12 पिस्ता खाऊ शकता. जर तुम्ही ते जास्त प्रमाणात खाल्ले तर ते आपल्या आरोग्याशी संबंधित घातक ठरू शकते.
'हे' आहेत पिस्ता खाण्याचे फायदे
पिस्ता आपल्या त्वचेसाठी आणि केसांसाठी खूप चांगला असतो. यामध्ये कॉपर आणि व्हिटॅमिन ई असते, ज्यामुळे त्वचा आणि केस खूप निरोगी राहतात. तसेच त्वचा कोरडी होण्यापासून प्रतिबंधित करते. ज्या लोकांना अशक्तपणा, थकवा जाणवत असेल त्यांनी पिस्ते आणि बदाम आवश्यक खावेत कारण त्यात भरपूर लोह असते, ज्यामुळे अॅनिमियासारखे आजार दूर राहतात.
पिस्त्यामध्ये व्हिटॅमिन बी 6 आणि झिंक आढळतात, जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात आणि संसर्गाचा धोका मोठ्या प्रमाणात कमी करतात.
पिस्ता हा नेहमीच फायबरचा समृद्ध स्त्रोत मानला जातो. त्यामुळे पोटाशी संबंधित आजार दूर राहतात.
ज्या लोकांना वजन कमी करायचे आहे त्यांनी रोज पिस्ते खावे जेणेकरून त्यांना पोट भरलेले वाटेल. परंतु, जास्त खाणे टाळा.
पिस्ता मेंदू आणि डोळ्यांसाठी खूप फायदेशीर आहे.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्वाच्या बातम्या :