एक्स्प्लोर

Coronavirus Update : देशात 4 दिवसांनी कोरोनाबाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत वाढ, 24 तासांत 431 रुग्णांचा मृत्यू

India Coronavirus Updates : गेल्या 24 तासांत 30,570 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 431 कोरोना रुग्णांचा मृत्यू, तर 38,303 रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त

India Coronavirus Updates : कोरोनाबाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत चढ-उतार सुरुच आहे. देशात चार दिवसांनी पुन्हा एकदा दैनंदिन कोरोना रुग्णांच्या संख्येत काहीशी वाढ झाल्याचं दिसून आल. गुरुवारी आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 30,570 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 431 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 38,303 रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत. 

कोरोनाबाधितांची गेल्या दहा दिवसांतील आकडा : 

10 सप्टेंबर : 33,376
11 सप्टेंबर : 28,591
12 सप्टेंबर : 27,254
13 सप्टेंबर : 25,404
14 सप्टेंबर : 27,176
15 सप्टेंबर : 30,570

भारतातील कोरोनाची स्थिती 

कोरोना महामारीच्या सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण तीन कोटी 33 लाख 47 हजार रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी 4 लाख 43 हजार 928 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, आतापर्यंत 3 कोटी 25 लाख 60 हजार रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या चार लाखांहून कमी आहे. तर एकूण 3 लाख 42 हजार 923 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

कोरोनाची एकूण आकडेवारी :

कोरोना रुग्णांची एकूण संख्या : तीन कोटी 33 लाख 47 हजार 325
एकूण कोरोनामुक्त रुग्ण : तीन कोटी 25 लाख 60 हजार 474
सक्रिय रुग्णांची एकूण संख्या : तीन लाख 42 हजार 923
एकूण मृत्यू : चार लाख 43 हजार 928
एकूण लसीकरण : 76 कोटी 57 लाख 17 हजार लसीचे डोस 

राज्यात काल (बुधवारी) 3783 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 4364  रुग्ण कोरोनामुक्त

राज्यात काल (बुधवारी) 3,783 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 4 हजार 364  रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 63 लाख 17 हजार 070  रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.07 टक्के आहे. 

राज्यात काल (बुधवारी) 56 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे.  राज्यात सध्या 49 हजार 034 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 13,258 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.  राज्यातील एकूण 16 जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. जळगाव (11), नंदूरबार (2),  धुळे (1), जालना (40), परभणी (55), हिंगोली (18),  नांदेड (24), अकोला (30), वाशिम (01),  यवतमाळ (04), वर्धा (3), भंडारा (2), गोंदिया (2), चंद्रपूर (52),   गडचिरोली (12 ) या 16 जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे.

राज्यातील 46 महानगरपालिक क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये आज एकही कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली नाही. धुळे, अमरावती, यवतमाळ, वाशिम, वर्धा, गोंदिया, चंद्रपूर या सात जिल्ह्यात एकाही कोरोनाबाधित रुग्णाची नोंद झालेली नाही. 

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5,63,61,089 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 65,07,930 (11.55 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 2,87,356 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 1,926  व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 

महत्त्वाच्या बातम्या

देशात रोजगाराच्या बाबातीत उत्तर प्रदेश आघाडीवर, महाराष्ट्राचा कितवा नंबर? इंडिया स्किल्स रिपोर्टमधून महत्वाची माहिती समोर
देशात रोजगाराच्या बाबातीत उत्तर प्रदेश आघाडीवर, महाराष्ट्राचा कितवा नंबर? इंडिया स्किल्स रिपोर्टमधून महत्वाची माहिती समोर
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Maharashtra Live News Updates: डॉ. नरेंद्र दाभोलकर प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन अंदुरेला जामीन मंजूर
Maharashtra Live News Updates: डॉ. नरेंद्र दाभोलकर प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन अंदुरेला जामीन मंजूर
Jharkhand Protest: झारखंडमधील विद्यार्थी आंदोलन अखेर 24 दिवसांनी मिटलं; भाजपने काँग्रेस-इंडिया आघाडीला कसं कोंडीत पकडलं अन् राहुल गांधींच्या पत्रानंतर परिस्थिती कशी बदलली? वाचा इनसाईड स्टोरी
झारखंडमधील विद्यार्थी आंदोलन अखेर 24 दिवसांनी मिटलं; भाजपने काँग्रेस-इंडिया आघाडीला कसं कोंडीत पकडलं अन् राहुल गांधींच्या पत्रानंतर परिस्थिती कशी बदलली? वाचा इनसाईड स्टोरी

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Embed widget