Travel : आज शनिवार, भारतातील 6 चमत्कारी शनि मंदिरांचं घ्या दर्शन! जिथे शनिदेव साक्षात विराजमान, भाविकांची धारणा काय?
Travel : भारतात शनिदेवाची अनेक मंदिरे आहेत, पण काही ठिकाणं अशी आहेत जिथे शनिदेव वास्तव्य करतात. आज शनिवार निमित्त भारतातील 6 चमत्कारी शनि मंदिरांचं दर्शन घ्या.
Travel : भारतात शनिदेवाची अनेक मंदिरे आहेत, धार्मिक मान्यतेनुसार, अशी काही ठिकाणं आहेत जिथे शनिदेव वास्तव्य करतात. पौराणिक मान्यतेनुसार, शनिदेवांची कृपा भक्तांवर सदैव असते. शनिदेव लवकरच भक्तांवर प्रसन्न होतात आणि त्यांच्या चुकाही क्षमा करतात. असं म्हणतात, शनिदेवाला सर्वस्व अर्पण करणारा भक्त जीवनात नेहमी आनंदी राहतो. आज शनिवार निमित्त भारतातील 6 चमत्कारी शनि मंदिरांचं दर्शन घ्या, जिथे शनिदेव साक्षात विराजमान आहे, काय आहे या मंदिरांचा इतिहास? भाविकांची धारणा काय?
शनि शिंगणापूर - जिथे कधीही चोरी होत नाही...
शिंगणापूर हे गाव महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यात आहे, त्याला शनी शिंगणापूर असेही म्हणतात. या गावात शनिदेवाचे चमत्कारिक मंदिर आहे. या गावात कोणत्याही घराला किंवा दुकानाला दरवाजा नाही. येथे शनिदेवाची मूर्ती नसून एक मोठी शिला आहे, जी शनिदेवाची मूर्ती आहे, अशी भाविकांची धारणा आहे. तसेच या गावात शनिदेवाची कृपा सदैव राहते आणि येथे कधीही चोरी होत नाही.
उज्जैनचे शनी मंदिर - शनिदेवासह इतर नवग्रहांच्या मूर्तींचही दर्शन
उज्जैन ही मध्य प्रदेशची धार्मिक राजधानी मानली जाते. येथे भगवान महाकालचे मंदिर आहे जे जगभरात प्रसिद्ध आहे. भगवान शंकराच्या मंदिरासोबतच येथे एक प्राचीन शनि मंदिर देखील आहे. येथे असलेल्या शनी मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे येथे शनिदेवासह इतर नवग्रहांच्या मूर्तीही आहेत, त्यामुळे याला नवग्रह मंदिर असेही म्हणतात. उज्जैनच्या या मंदिरात दूरवरून शनि भक्त येतात.
महादेवासोबत विराजमान शनिदेव- साडेसाती होते दूर
तिरुनल्लर शनि मंदिराची गणना तामिळनाडूतील प्रमुख मंदिरांमध्ये केली जाते. असे मानले जाते की ज्या लोकांवर शनीची साडेसाती सुरू असते, ते लोक येथे दर्शनासाठी येतात. शनि मंदिर, तिरुनल्लर हे तामिळनाडूमधील नवग्रह मंदिरांपैकी एक आहे, जे शनिदेवाला समर्पित आहे. भारतातील शनिदेवाच्या मंदिरांमध्ये हे सर्वात पवित्र मानले जाते. असे मानले जाते की, या मंदिरात शनिदेवांसह भगवान शिवाची पूजा केल्याने शनि ग्रहाच्या सर्व वाईट प्रभावांपासून मुक्ती मिळते.
जिथे भगवान श्रीकृष्णाने शनिदेवाचे दर्शन घेतले होते
उत्तर प्रदेशातील ब्रज मंडळाच्या कोसिकलन गावाजवळ एक शनी मंदिर आहे. मान्यतेनुसार या मंदिरात भगवान श्रीकृष्णाने शनिदेवाचे दर्शन घेतले होते. ज्याचे वर्णन गीतेत आढळते. या स्थानाविषयी असेही म्हटले जाते की, येथे प्रदक्षिणा करणाऱ्या भक्ताला शनिदेव कधीही त्रास देत नाहीत.
स्त्री रूपात विराजमान शनिदेव
गुजरातमधील भावनगरच्या सारंगपूरमध्ये भगवान हनुमानाचे एक प्राचीन मंदिर आहे. या मंदिराला संकटभंजन हनुमानजी म्हणूनही ओळखले जाते. या मंदिराची खास गोष्ट म्हणजे येथे हनुमान सोबत शनिदेव देखील आहेत. येथे शनिदेव स्त्री रूपात हनुमानाच्या पायाशी बसलेले दिसतात. या मंदिराविषयी असे म्हटले जाते की, जर कोणत्याही भक्ताच्या कुंडलीत शनिदोष असेल तर कष्टभंजन हनुमानाचे दर्शन घेतल्यास सर्व दोष दूर होतात.
इंदूरचा शनिदेव - प्राचीन आणि चमत्कारिक मंदिर
इंदूर (अहिल्या नगरी) येथील जुनी इंदूर येथे शनिदेवाचे प्राचीन आणि चमत्कारिक मंदिर आहे. या मंदिराबाबत एक प्रचलित कथा आहे, जिथे एका पुजारीचे पूर्वज पंडित गोपालदास तिवारी यांना स्वप्नात दर्शन झाले आणि त्यांनी सांगितले की त्यांची एक मूर्ती त्या ढिगाऱ्यात पुरली आहे. शनिदेवाने पंडितांना टिळा खोदून मूर्ती बाहेर काढण्याची आज्ञा केली होती. ही मूर्ती आज या मंदिरात स्थापित आहे.
हेही वाचा>>>
Shravan Travel : शंभो शंकरा! श्रावणात घ्यायचंय महाराष्ट्रातील ज्योतिर्लिंगांचं दर्शन? सर्वकाही जाणून घ्या
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )