(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Travel : जम्मू काश्मीरचे एक रहस्यमयी मंदिर! जिथून परतणाऱ्या भाविकांवर झालेला दहशतवादी हल्ला, मंदिराची खासियत जाणून आश्चर्यचकित व्हाल
Travel : जम्मूमधील हे मंदिर हे माता वैष्णो देवीनंतर दुसरे सर्वात मोठे धार्मिक स्थान मानले जाते. या मंदिराशी संबंधित काही रंजक गोष्टी जाणून घ्या..
Travel : भारतात विविध रहस्यमयी गोष्टी आहेत. ज्याचा शोध अजून शास्त्रज्ञांनाही लागला नाही. भारत हा अध्यात्मिक देश असून विविध गावांमध्ये आणि शहरांमध्ये अनेक पवित्र आणि जगप्रसिद्ध मंदिरं आहेत. मात्र आज आम्ही तुम्हाला जम्मू काश्मीरमधील अशा एका रहस्यमयी मंदिराबद्दल सांगणार आहोत, जिथून परतताना भाविकांवर आतंकवादी भ्याड हल्ला झाला होता. या मंदिराशी संबंधित काही रंजक गोष्टी सांगणार आहोत, जाणून घ्या..
शिवखोरी मंदिराशी संबंधित काही रंजक गोष्टी जाणून घ्या..
जम्मू-काश्मीरच्या सुंदर खोऱ्यांमध्ये अनेक पवित्र आणि प्रसिद्ध मंदिरे आहेत. जसे की जम्मू प्रांतातील वैष्णोदेवी मंदिर, अमरनाथ गुहा मंदिर, शंकराचार्य मंदिर आणि मार्तंड सूर्य मंदिर. जम्मू आणि काश्मीरमध्ये असलेल्या इतर मंदिरांप्रमाणे, शिव खोरी मंदिर देखील एक प्राचीन आणि प्रसिद्ध मंदिर मानले जाते. काही दिवसांपूर्वीच या मंदिराचे दर्शन करून परतणाऱ्या बसवर कटरा दहशतवाद्यांनी हल्ला केला आणि या हल्ल्यात सुमारे 10 जणांना प्राण गमवावे लागले. आज आम्ही तुम्हाला शिव खोरी मंदिराशी संबंधित काही रंजक गोष्टी आणि येथे असलेल्या गुहेशी संबंधित काही रहस्यमय कथा सांगणार आहोत.
देवी वैष्णो देवीनंतर जम्मूमधील दुसरे सर्वात मोठे धार्मिक स्थान
शिव खोडी मंदिर हे प्राचीन आणि पवित्र मंदिर मानले जाते. शिव खोरी मंदिराशी संबंधित रंजक गोष्टी जाणून घेण्याआधी, हे मंदिर जम्मू-काश्मीरच्या रियासी जिल्ह्यात स्थित हिंदू धार्मिक महत्त्व असलेली गुहा आहे. हे भगवान शिवाचे मंदिर आहे. शिव खोडी मंदिर वैष्णो देवी मंदिरापासून 80 किमी अंतरावर, कटरापासून सुमारे 80 किमी, जम्मूपासून सुमारे 100 किमी आणि राजधानी श्रीनगरपासून सुमारे 300 किमी अंतरावर आहे. माहितीनुसार, शिव खोडी मंदिर हे श्री माता वैष्णो देवी नंतर जम्मूमधील दुसरे सर्वात मोठे धार्मिक स्थान मानले जाते. शिव खोरी मंदिराशी संबंधित काही रंजक गोष्टी जाणून घ्या..
शिव खोरी मंदिराची पौराणिक कथा
शिव खोरी मंदिराची पौराणिक कथा खूप मनोरंजक आहे. हिंदू मान्यतेनुसार, असे म्हटले जाते की, भस्मासुर नावाच्या राक्षसाने तपश्चर्या केली आणि भगवान शिवाकडे वरदान मागितले की, तो ज्याच्यावर हात ठेवेल तो जळून राख होईल. वरदान मिळाल्यानंतर भस्मासुराने भगवान शंकराला जाळण्याची इच्छा व्यक्त केली. भगवान शिवाला हे कळताच ते शिव खोडी मंदिराच्या गुहेत लपले. पौराणिक मान्यतेनुसार, मोहिनीच्या रूपात भगवान विष्णूने तिचा वध केला होता.
शिव खोरी मंदिराची गुहा डमरूसारखी!
शिव खोरी मंदिराच्या गुंफेबद्दल असे म्हटले जाते की, भगवान शंकराची ही गुहा डमरूच्या आकारात आहे, जी दोन टोकांना रुंद आणि मध्यभागी अरुंद आहे. या गुहेबद्दल असे सांगितले जाते की, ही गुहा इतकी अरुंद आहे की, भक्तांना आत जाण्यासाठी खाली वाकून जावे लागते. शिव खोडी मंदिराच्या गुंफेबद्दल असे मानले जाते की, येथे भगवान शिवासोबतच देवी पार्वती, भगवान कार्तिकेय, गणेश आणि देवी काली यांच्यासह इतर अनेक देवी-देवतांच्या मुर्ती पिंडस्वरुपात आहेत. शिव खोडी गुहेत जाण्यासाठी 3 ते 4 किलोमीटर चढून जावे लागते.
प्रत्येक इच्छा पूर्ण होते! भाविकांची धारणा
शिव खोरी मंदिर आणि गुहा हे पवित्र स्थान मानले जाते. असे म्हणतात की, जो कोणी भक्त देवी वैष्णोच्या दर्शनाला जातो, तो शिव खोडी मंदिराच्या दर्शनालाही जातो. या मंदिराविषयी अशी श्रद्धा आहे की, जो भक्त इथे खऱ्या मनाने पोहोचतो, त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात.
भाविकांच्या बसवर दहशतवादी हल्ला
जम्मूमधील कटरा ते शिव खोरी मंदिरापर्यंत बस जाते. मंदिराचे दर्शन करून बस कटरा येथे परतत असताना बसवर दहशतवादी हल्ला झाला आणि या हल्ल्यात सुमारे 10 जणांना प्राण गमवावे लागले आणि अनेक जण जखमीही झाले.
हेही वाचा>>>
Travel : भारतातील एक रहस्यमयी मंदिर, जिथे चक्क बुलेटची पूजा होते, यामागील रंजक इतिहास जाणून थक्क व्हाल
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )