(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Travel : बजेट असेल 10 हजार, तर 'ही' ठिकाणे एक्सप्लोर कराल! विचार कसला? उन्हाळ्याच्या सुट्टीत कुटुंबासह प्लॅन करा
Travel : 2024 च्या उन्हाळ्याच्या सुट्टीत तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत काही खास ठिकाणं फिरू शकता, फक्त 10,000 रुपयांमध्ये ही ठिकाणे एक्सप्लोर करा
Travel : परीक्षा संपल्या, आणि उन्हाळ्याची सुट्टी (Summer Vacation) मुलांना लागली की कुटुंबीय कुठेतरी बाहेर जाण्याचा प्लॅन बनवतात, आता एप्रिल (April) महिना आणि उन्हाळा नुकताच सुरू झाला आहे, अशात आता काही मुलांच्या सुट्ट्या देखील सुरू झाल्या आहेत. तुम्हालाही या सुट्टीमध्ये आपल्या मुलांना काही खास ठिकाणी घेऊन जायचं असल्यास आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत बजेटमध्ये कोणत्या ठिकाणांना भेट देऊ शकता? आणि जी ठिकाणं आम्ही सांगणार आहोत, ती तुम्ही केवळ 2 दिवसात फिरून येऊ शकता.
अल्मोडा
तुम्ही तुमच्या कुटुंबासमवेत एखाद्या हिल स्टेशनला भेट देण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही अल्मोडाला भेट दिलीच पाहिजे. अल्मोडा हे नैसर्गिक दृश्यांसाठी ओळखले जाते. अल्मोडा मध्ये, तुम्ही तुमच्या मुलासह आणि कुटुंबासह झिरो पॉइंट, दुनागिरी आणि डीअर पार्क सारख्या अद्भुत ठिकाणांना भेट देऊ शकता. शहराच्या रणरणत्या उन्हात अल्मोडा येथे जाऊन तुम्हाला थोडा दिलासा मिळणार आहे. तुम्ही 10,000 रुपयांमध्ये अल्मोडा येथे सहज प्रवास करू शकता. या उन्हाळ्याच्या सुट्टीत तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत काही खास ठिकाणेही फिरू शकता.
मसुरी
तुम्ही दिल्लीहून कार किंवा बसने उत्तराखंडमधील मसुरीला सहज पोहोचू शकता. स्वस्त असण्यासोबतच मसुरी हे खूप खास आणि सुंदर ठिकाण आहे. बजेटमध्ये कुटुंबासह भेट देण्यासाठी हे ठिकाण सर्वोत्तम आहे. मसुरीमध्ये भेट देण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत, जसे की तुम्ही मसुरी लेक, मसूरी शॉपिंग मार्केट, केम्पटी फॉल्स यासारखी ठिकाणे एक्सप्लोर करू शकता.
देहरादून
या उन्हाळ्याच्या सुट्टीत तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत काही खास ठिकाणेही फिरू शकता. उत्तराखंडची राजधानी देहरादून हे देखील उन्हाळ्यात भेट देण्याचे खास ठिकाण आहे. येथे अनेक प्रकारचे अतिरिक्त Activites आहेत, ज्यांचा तुम्ही तुमच्या कुटुंबासह आनंद घेऊ शकता. देहरादूनमधील रॉबर्स केव्ह हे एक अतिशय सुंदर ठिकाण आहे, येथे गेल्यावर तुम्हाला परदेशाची आठवण होईल. तुम्ही फक्त 10,000 रुपयांमध्ये तुमच्या कुटुंबासह या ठिकाणांना भेट देऊ शकता.
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
हेही वाचा>>
Travel : 'कुछ तुफानी करेंगे!' एप्रिलमध्ये 'एडवेंचर ट्रीप' करायचीय? फक्त 'हे' पॅकेज बुक करा, मित्रांसोबत करा 'हँग आउट...