Travel : विदेशातील 'थायलंड' विसराल, जेव्हा भारतातील 'मिनी थायलंड' पाहाल, कमी बजेटमध्ये अनुभवा स्वर्गसुख!
Travel : जर तुम्हाला थायलंडला जायचे असेल आणि बजेटमुळे जाणे शक्य नसेल, तर भारतात असे एक सुंदर ठिकाण आहे जे तुम्हाला थायलंड विसरायला लावेल.
Travel : स्वित्झर्लंड, लंडन, बॅंकॉक, सिंगापूर, थायलंड (Thailand) ही ठिकाणं भारतीय पर्यटकांमध्ये अतिशय लोकप्रिय ठिकाण आहे. सुट्टीमध्ये लोक हमखास या ठिकाणी फिरायला जातात. पण विदेशात न जाता आपल्या भारतात विदेशातील निसर्गाचा आनंद अनुभवायला मिळाला, तर क्या बात है! पण हे खरंय. भारतात एक असं ठिकाण आहे, जे थायलंड पेक्षा कमी नाही. बजेटमुळे अनेक वेळा लोकांना थायलंडला जाता येत नाही. आम्ही तुम्हाला भारतातील अशा ठिकाणाविषयी सांगणार आहोत ज्याचे सौंदर्य थायलंडपेक्षा कमी नाही. या ठिकाणाला ‘मिनी थायलंड’ असेही म्हणतात. जाणून घेऊया या ठिकाणा विषयी
'मिनी थायलंड' ला जाऊन बघा...
थायलंडमध्ये अन्नापासून ते साहसी आणि सुंदर ठिकाणांपर्यंत सर्व काही आहे. यामुळेच मोठ्या संख्येने लोक थायलंडला जातात. हनिमूनसाठी थायलंड हे जोडप्यांचे आवडते ठिकाण आहे. मात्र, जर तुम्हाला थायलंडला जायचे असेल आणि बजेटमुळे जाणे शक्य नसेल, तर भारतात असे एक सुंदर ठिकाण आहे जे तुम्हाला थायलंड विसरायला लावेल. हे ठिकाण 'मिनी थायलंड' म्हणून ओळखले जाते. हिमाचल प्रदेशच्या सौंदर्याबद्दल साधारणपणे सर्वांनाच माहिती असेल. येथील पर्वत आणि हिरवळ मनाला भुरळ घालते. जर तुम्हाला निसर्गाच्या सानिध्यात चांगला वेळ घालवायचा असेल तर तुम्ही हिमाचल प्रदेशात येऊ शकता. हिमाचलमध्ये सुट्टीसाठी अनेक ठिकाणे आहेत आणि त्यापैकी एक जिभी आहे. जेथे मिनी बेट आहे.
'मिनी थायलंड'चे दृश्य पाहून तुमचे मन मोहेल
हिमाचल प्रदेशातील जिभी हे थायलंडमधील बेटांची आठवण करून देणारे ठिकाण आहे. येथे नदी दोन मोठ्या खडकांमधून वाहते, जे पाहून तुम्हाला पूर्ण थायलंडमध्ये असल्यासारखे वाटेल. हे दोन मोठे खडक किंवा बोल्डर्स येथील आकर्षणाचे केंद्र आहेत.
सुंदर धबधबा काय पाहाल!
जिभी येथे एक सुंदर धबधबाही आहे. जो फार कमी लोकांनी पाहिले असेल. हा धबधबा घनदाट जंगलाच्या मध्यभागी आहे. इथे पडणाऱ्या पाण्याचा आवाज मधुर संगीतापेक्षा कमी वाटत नाही. जर तुम्हाला निसर्ग जवळून अनुभवायचा असेल तर तुम्ही इथे एकदा येऊ शकता, तर 'मिनी थायलंड'चे सुंदर नजारे तुमचे मन जिंकण्यासाठी पुरेसे आहेत.
कुटुंब, जोडीदार किंवा मित्रांसह सहलीची योजना करा
जिभी हे दाट देवदार वृक्ष, पाइन तलाव आणि प्राचीन मंदिरांसाठी देखील प्रसिद्ध आहे, येथे तुम्ही कुटुंब, जोडीदार, मित्रांसह येऊ शकता किंवा एकट्या सहलीचेही नियोजन केले जाऊ शकते. जिभीला जाण्यासाठी ट्रेनपासून विमान आणि खासगी टॅक्सीपर्यंतच्या सुविधा उपलब्ध आहेत.
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
हेही वाचा>>>
Travel : मुंबईहून हनिमूनला निघताय? 'हनी' होईल खूश, ट्रीप कराल एन्जॉय! IRCTC चे पॅकेजस पाहिले?