Most Billionaires : जगातील टॉप 10 अब्जाधीशांच्या यादीत चीन आघाडीवर; भारताचा 'या' स्थानावर
Top 10 Cities with Most Billionaires : वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्सने टॉप 10 शहरांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये चीनमधील एक शहर अव्वल स्थानावर आहे.
Top 10 Cities with Most Billionaires : जगभरात श्रीमंत लोकांची संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. भारतातही अब्जाधीशांची संख्या वाढत आहे. वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्सने एक आकडा जारी केला आहे, ज्यामध्ये जगातील टॉप 10 शहरे अशी आहेत जिथे सर्वाधिक अब्जाधीश राहतात (Top 10 Cities with Most Billionaires). महत्त्वाचे म्हणजे अब्जाधीशांच्या यादीत भारताचाही समावेश आहे.
वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्सनुसार (World of Statistics) या यादीत चीनमधील एक शहर आघाडीवर आहे. या यादीत अमेरिकेतील दोन शहरांचाही समावेश आहे. तर, भारतातील मुंबई शहर अब्जाधीश शहरांच्या यादीत 8 व्या क्रमांकावर आहे.
चीन आणि अमेरिका जवळपास सारख्याच क्रमांकावर
वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्सच्या यादीनुसार चीनचे बीजिंग शहर पहिल्या क्रमांकावर आहे. चीनची राजधानी बीजिंगमध्ये 2.30 कोटींहून अधिक लोक राहतात आणि तेथील अब्जाधीशांची संख्या 100 आहे. अमेरिकेतील न्यूयॉर्क शहर दुसऱ्या क्रमांकावर आहे. या शहराची लोकसंख्या 84.7 लाख आहे, त्यापैकी अब्जाधीशांची संख्या 99 आहे.
अब्जाधीशांच्या यादीत चीनमधील तीन शहरांचा समावेश
जगातील टॉप 10 अब्जाधीश शहरांच्या यादीत हाँगकाँग तिसऱ्या क्रमांकावर आहे. हॉंगकॉंगमध्ये 80 अब्जाधीश राहतात. मॉस्कोचे नाव चौथ्या स्थानावर आहे आणि येथे 79 लोक राहतात. यानंतर चीनची आणखी तीन शहरे येतात. शेन्झेन पाचव्या क्रमांकावर आहे, जिथे 68 अब्जाधीश राहतात. त्यानंतर सहाव्या क्रमांकावर शांघाय शहर आहे. शांघायमध्ये 64 अब्जाधीशांची नावे आहेत. चीनमधील आणखी एक शहर हांगझोऊ 10 व्या क्रमांकावर आहे. येथे अब्जाधीशांची संख्या 47 आहे.
Top 10 cities with the most billionaires:
— World of Statistics (@stats_feed) December 11, 2022
1.🇨🇳 Beijing: 100
2.🇺🇸 New York City: 99
3.🇭🇰 Hong Kong: 80
4.🇷🇺 Moscow: 79
5.🇨🇳 Shenzhen: 68
6.🇨🇳 Shanghai: 64
7.🇬🇧 London: 63
=8.🇮🇳 Mumbai: 48
=8.🇺🇸 San Francisco: 48
10.🇨🇳 Hangzhou: 47
ब्रिटन आणि भारतातील शहरांची स्थिती
चीनच्या दोन शहरांनंतर ब्रिटनचे लंडन शहर 63 अब्जाधीशांसह या यादीत 7 व्या क्रमांकावर आहे. यानंतर भारतातील मुंबई शहराचा क्रमांक येतो, जिथे 48 अब्जाधीश राहतात. भारताबरोबरच अमेरिकेचे सॅन फ्रान्सिस्को 48 अर्पाटीसह 8 व्या क्रमांकावर आहे.
चीन आणि अमेरिका अव्वल स्थानावर
जागतिक आकडेवारीच्या या यादीत चीन आणि अमेरिका यांचे वर्चस्व आहे. अमेरिकेत दोन शहरे आहेत, तर चीनमध्ये चार शहरे आहेत. चीनमध्ये या चार शहरांमध्ये 279 अब्जाधीश आहेत, तर अमेरिकेच्या दोन शहरांमध्ये 147 अब्जाधीश राहतात.
महत्त्वाच्या बातम्या :