Chandra Grahan 2022 : वर्षातील पहिले चंद्रग्रहण 'या' दिवशी होणार, भारतात त्याची वेळ काय असेल? जाणून घ्या
Chandra Grahan 2022 : धार्मिकदृष्ट्या ग्रहण अशुभ मानले जाते. या काळात अनेक गोष्टी करणे वर्ज्य मानले जाते. 2022 सालचे पहिले चंद्रग्रहण कोणत्या महिन्यात होणार याविषयी सविस्तर माहिती जाणून घ्या.

Chandra Grahan 2022 : 2022 मध्ये दोन चंद्रग्रहण होणार आहेत. वर्षातील पहिले पूर्ण चंद्रग्रहण 16 मे 2022 रोजी होणार आहे. 2022 मध्ये दोन्ही चंद्रग्रहण पूर्ण चंद्रग्रहण असणार आहेत. पहिले चंद्रग्रहण 16 मे 2022 रोजी आणि दुसरे चंद्रग्रहण 8 नोव्हेंबर 2022 रोजी होईल. भारतातील धार्मिक मान्यतेनुसार ग्रहण अशुभ मानले जाते. या काळात अनेक गोष्टी करण्यास मनाई आहे. चंद्रग्रहण नेहमी पौर्णिमेच्या दिवशी होते. परंतु, प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी चंद्रग्रहण होऊ शकत नाही. जेव्हा पृथ्वीची सावली चंद्रावर पडते तेव्हा त्याला चंद्रग्रहण म्हणतात. चला तर मग जाणून घेऊयात भारतातील चंद्रग्रहणाची वेळ, सुतक कालावधी आणि तिथी...
चंद्रग्रहण वेळ 2022 :
भारतीय वेळेनुसार, हे चंद्रग्रहण सोमवार, 16 मे 2022 रोजी सकाळी 08:59 ते 10:23 पर्यंत असेल, हे संपूर्ण चंद्रग्रहण असेल. भारतात या चंद्रग्रहणाची दृश्यमानता शून्य असेल, त्यामुळे येथे सुतक काल लागणार नाही.
वर्षातील पहिले चंद्रग्रहण कुठे दिसेल?
वर्षातील पहिले चंद्रग्रहण दक्षिण-पश्चिम युरोप, दक्षिण-पश्चिम आशिया, आफ्रिका, उत्तर अमेरिकेचा बहुतांश भाग, दक्षिण अमेरिका, पॅसिफिक महासागर, हिंदी महासागर, अटलांटिक आणि अंटार्क्टिका येथेही दिसणार आहे. कारण हे चंद्रग्रहण भारतात दिसरणार नाही, त्यामुळे त्याचा सुतक काळ येथेही प्रभावी राहणार नाही.
दुसरे चंद्रग्रहण कधी होईल?
2022 वर्षातील दुसरे चंद्रग्रहण मंगळवार 8 नोव्हेंबर 2022 रोजी रात्री 17:28 ते 19:26 पर्यंत असेल. हे चंद्रग्रहण भारतात काही ठिकाणी पाहता येणार आहे. त्यामुळे या ग्रहणाचा धार्मिक प्रभाव आणि सुतक भारतात वैध असेल.
वर्षातील दुसरे आणि शेवटचे चंद्रग्रहण कोठे दिसेल?
हे चंद्रग्रहण ईशान्य युरोप, आशिया, ऑस्ट्रेलिया, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, पॅसिफिक महासागर, अटलांटिक, हिंदी महासागर, आणि अंटार्क्टिका या भागातून दिसणार आहे. हे चंद्रग्रहण भारतातह दिसणार असल्याने त्याचे सुतक येथेही प्रभावी ठरेल.
महत्वाच्या बातम्या :
- Holi 2022 : रंगाच्या भीतीने होळी खेळणं टाळताय? चेहरा, केस आणि अंगावरील होळीचा रंग कसा काढायचा? वापरा 'या' टिप्स
- Holi 2022 : रंगपंचमीच्या एक दिवस आधी का केले जाते होलिका दहन? जाणून घ्या यामागची कथा...
- Important Days in March 2022 : मार्च महिना दिनविशेष, जाणून घ्या महत्वाचे दिवस कोणते आहेत?
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
