एक्स्प्लोर

सोहा अली खान दररोज रिकाम्या पोटी चावून खाते कच्चा लसूण ...; खरंच किती फायद्याचं?

अलीकडेच तिने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमधून एक अनोखी आरोग्य सवय उघड केली ती रोज सकाळी रिकाम्या पोटी कच्चा लसूण चावून खाते!

Soha Ali Khan Weight Loss: बॉलिवूड अभिनेत्री सोहा अली खान (Soha Ali Khan) आपल्या फिटनेस आणि नैसर्गिक सौंदर्यासाठी ओळखली जाते. 47 वर्षांची असूनदेखील तिचं तेज आणि तंदुरुस्ती पाहून तिच्या वयाचा अंदाज लावणं अवघड आहे. काही महिन्यांपूर्वी तिने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमधून एक अनोखी आरोग्य सवय उघड केली ती रोज सकाळी रिकाम्या पोटी कच्चा लसूण चावून खाते! सोहाने पोस्टमध्ये लिहिलं, “गेल्या चार आठवड्यांपासून मी माझ्या दिवसाची सुरुवात एकाट्या लसणाच्या पाकळीसोबत करतेय. हा छोटासा उपाय रोगप्रतिकारक शक्ती, पचनसंस्था, सूज आणि एकूण आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. जुना असला तरी हा नुस्खा अजूनही तितकाच प्रभावी आहे.”(Garlic health Benefits)

लसणाची एक पाकळी रिकाम्या पोटी चावून खाते

ती पुढे सांगते, “मी लसणाची एक पाकळी रिकाम्या पोटी चावून खाते आणि शक्य तितका वेळ चावते, जेणेकरून त्यातला ‘अ‍ॅलिसिन’ हा घटक सक्रिय होतो. नंतर मी ते पाण्याबरोबर गिळते. जर तुम्हाला चावता येत नसेल तर ती पाकळी ठेचून 10 मिनिटे ठेवली तरी चालते.” सोहाने या पोस्टमध्ये एक महत्त्वाची सूचना देखील दिली आहे .“हे सगळ्यांसाठी नाही. जर तुम्ही रक्त पातळ करणाऱ्या औषधांचा वापर करत असाल, तुमचं पोट संवेदी असेल किंवा लवकरच शस्त्रक्रिया करायची असेल, तर लसूण खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.” लसूण खाल्ल्यानंतर येणाऱ्या दुर्गंधीबाबतही तिने उपाय सांगितला “हो, लसणाचा वास खरा आहे, पण त्याचे फायदेही तेवढेच खरे आहेत! त्यामुळे जेवल्यानंतर चांगल्या प्रकारे दात घासा आणि माउथवॉश वापरा.”

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Soha (@sakpataudi)

लसूण आरोग्यासाठी का फायदेशीर आहे?

1. अँटिऑक्सिडंट्स आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुण  शरीरातील सूज आणि ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करण्यात मदत करतात.
2. अँटी-मायक्रोबियल प्रभाव: बॅक्टेरिया, व्हायरस आणि फंगसविरुद्ध लढण्यास सहाय्यक.
3. त्वचेसाठी फायदेशीर :अँटी-बॅक्टेरियल गुणामुळे मुरुम निर्माण करणारे जंतू नष्ट होतात आणि त्वचा स्वच्छ राहते.
4. पचनसंस्थेसाठी उपयुक्त: चांगले बॅक्टेरिया वाढवतो आणि वाईट बॅक्टेरिया कमी करतो.
5. रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो : ‘अ‍ॅलिसिन’ घटक शरीराची इम्युनिटी मजबूत करून वारंवार होणारे आजार टाळतो.

 

महत्त्वाच्या बातम्या

Health Tips : पावसाळ्यात वाढतोय हिपॅटायटिसचा धोका; यकृताच्या आरोग्यासाठी ‘प्रतिंबध’ हाच उपाय
पावसाळ्यात वाढतोय हिपॅटायटिसचा धोका; यकृताच्या आरोग्यासाठी ‘प्रतिंबध’ हाच उपाय
Health Tips : मेहंदी लावलेल्या हाताने जेवणे किती धोकादायक? जाणून घ्या सत्य
मेहंदी लावलेल्या हाताने जेवणे किती धोकादायक? जाणून घ्या सत्य
Tea : गाड्यावर किती वेळापूर्वी बनवलेला चहा प्यावा? पुन्हा गरम केलेला चहा कधी बनतो विष?
गाड्यावर किती वेळापूर्वी बनवलेला चहा प्यावा? पुन्हा गरम केलेला चहा कधी बनतो विष?
Health: पावसाळ्यात कान-नाकाचा त्रास का वाढतो? संसर्ग होऊ नये यासाठी 'अशी' घ्या खबरदारी, डॉक्टर सांगतात...
पावसाळ्यात कान-नाकाचा त्रास का वाढतो? संसर्ग होऊ नये यासाठी 'अशी' घ्या खबरदारी, डॉक्टर सांगतात...

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashok Saraf andn Devendra Fadnavis: अशोक सराफ एक उत्तम माणूस, मराठी माणसाला त्यांच्या भूमिकांमध्ये स्वत:चे अस्तित्त्व दिसायचे: देवेंद्र फडणवीस
अशोक सराफ एक उत्तम माणूस, मराठी माणसाला त्यांच्या भूमिकांमध्ये स्वत:चे अस्तित्त्व दिसायचे: देवेंद्र फडणवीस
Free School Bag: आनंदवार्ता! पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर
आनंदवार्ता! पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv Thackeray Camp Nagarsevak will join BJP: ज्याची भीती होती तेच झालं, धाराशिवमधील 'ते' 10 नगरसेवक मातोश्रीवरच्या बैठकीला गेले नाहीतच अन् आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
ज्याची भीती होती तेच झालं, धाराशिवमधील 'ते' 10 नगरसेवक मातोश्रीवरच्या बैठकीला गेले नाहीत अन् आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Embed widget