एक्स्प्लोर

Skin Care Tips : मानेवरचा काळवंडलेपणा दूर करायचाय? ‘या’ सोप्या टिप्स नक्की ट्राय करा!

Skin Care Tips : घाम आणि सतत उन्हाचा मारा झाल्यामुळे मान काळवंडते. अशावेळी काही घरगुती उपाय वापरून आपण हा काळवंडलेपणा दूर करू शकतो.

Skin Care Tips : ज्या प्रमाणे आपण आपल्या त्वचेची काळजी घेतो, त्याच प्रमाणे शरीराच्या इतर भागांची काळजी घेणे देखील आवश्यक आहे. शरीराचे अनेक भाग काळवंडतात, त्यामुळे ते खराब दिसू लागतात. तसेच, शरीरावर धूळ जमा होऊन, तिथे जंतू देखील साचू लागतात. आपण अंघोळ करताना किंवा ब्युटी ट्रीटमेंट घेताना केवळ चेहऱ्याच्या सौंदर्याची काळजी घेतो. मात्र, शरीराचे काही भाग या ब्युटी ट्रीटमेंटमध्ये किंवा इतर वेळी देखील विसरले जातात. मान हा देखील शरीराचा असा भाग आहे, जो स्वच्छतेच्या किंवा सौंदर्याच्या बाबतीत दुर्लक्षित केला जातो.

घाम आणि सतत उन्हाचा मारा झाल्यामुळे मान काळवंडते. मानेवरचा काळवंडलेपणा दूर करण्यासाठी बाजारात अनेक प्रोडक्ट उपलब्ध आहेत. पण, प्रत्येकवेळी हे प्रोडक्ट काम करतीलच असे नाही. या उत्पादनांच्या वापरामुळे अनेक समस्या देखील उद्भवतात. अशावेळी काही घरगुती उपाय वापरून आपण हा काळवंडलेपणा दूर करू शकतो. चला तर जाणून घेऊया...

काकडी, कोरफड जेल, गुलाब पाणी पॅक

साहित्य : 2 मोठे चमचे काकडीचा रस, 1 चमचा कोरफड जेल, एक छोटा चमचा गुलाब पाणी

कृती : एका वाटीत या तीनही गोष्टी व्यवस्थित एकत्र मिसळा. हा पॅक कापसाने मानेवर व्यवस्थित लावा. लवकर परिणाम दिसावा म्हणून हा पॅक रात्री झोपताना लावावा. रात्रभर ठेवा आणि सकाळी धुवून टाका. नियमित हा पॅक लावल्यास लवकर परिमाण दिसून येईल.

हळद, बेसन आणि दही पॅक

साहित्य : 1 मोठा चमचा बेसन, 1 चमचा दही, चिमुटभर हळद

कृती : एका वाटीत या तीनही गोष्टी व्यवस्थित एकत्र मिसळा आणि जाडसर पेस्ट तयार करा. ही पेस्ट मानेवर लावा आणि काहीवेळाने धुवून टाका. याच्या नियमित वापराने मानेवरचा काळपटपणा निघून जाईल.

टोमॅटोचा रस आणि कॉफी पावडर पॅक

साहित्य : 1 मोठा चमचा टोमॅटोचा रस, 1 छोटा चमचा कॉफी पावडर

कृती : 1 मोठा चमचा टोमॅटोच्या रसात कॉफी पावडर मिसळून त्याचा स्क्रब पॅक तयार करा. या स्क्रबने मान व्यवस्थित घासा. दोन ते तीन मिनिट मसाज केल्यानंतर धुवून टाका.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्वाच्या बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

Women Health: नवमातांनो लक्ष द्या.. स्तनपानामुळे स्तनाच्या कर्करोगाचा धोका कमी होतो? योग्य मार्गदर्शनाची आवश्यकता, तज्ज्ञ सांगतात..
नवमातांनो लक्ष द्या.. स्तनपानामुळे स्तनाच्या कर्करोगाचा धोका कमी होतो? योग्य मार्गदर्शनाची आवश्यकता, तज्ज्ञ सांगतात..
Kojagiri Purnima 2026 : कोजागिरी पौर्णिमा नेमकी कधी साजरी करायची? चंद्राला दूध दाखवण्याची योग्य वेळ कोणती? जाणून घ्या याचं महत्त्व
कोजागिरी पौर्णिमा नेमकी कधी साजरी करायची? चंद्राला दूध दाखवण्याची योग्य वेळ कोणती? जाणून घ्या याचं महत्त्व
Vastu Tips : रात्री शांत झोप हवीय? बेडची चुकीची दिशा तर कारण नाही ना? झोपण्यापूर्वी 'ही' गोष्ट नक्की तपासा...वास्तूशास्त्रात म्हटलंय...
रात्री शांत झोप हवीय? बेडची चुकीची दिशा तर कारण नाही ना? झोपण्यापूर्वी 'ही' गोष्ट नक्की तपासा...वास्तूशास्त्रात म्हटलंय...
Child Health: पालकांनो लक्ष द्या..गरज नसतानाही मुलांना प्रोटीन सप्लिमेंट्स दिलं जातंय? तज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती... 
पालकांनो लक्ष द्या..गरज नसतानाही मुलांना प्रोटीन सप्लिमेंट्स दिलं जातंय? तज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती... 

व्हिडीओ

Karjat Tree Cutting : टोरंट कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पावरुन राजकारण जोरात : Special Report
Nashik kumbh Mela 2026 : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणात ऐतिहासिक क्षण, नाशिकमध्ये 501 शंखांचा एकत्रित नाद
Nashik Kumb Mela 2026 : कुंभमेळ्याची परंपरा नेमकी कशी सुरू झाली? History of kumb Mela
Nashik Kumb mela : नाशिक कुंभमेळ्यात विश्वविक्रम, 501 गोदासेवकांचा एकाचवेळी शंखनाद, अमेरिकेचा विक्रम मोडीत
Raj Thackeray Speech | दुचाकी, चारचाकी, सिग्नल ते सरकार... नवी मुंबईतील मेळाव्यातलं राज यांचं भाषण!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी, प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणी मीनाक्षी शिंदेंची चौकशी होणार, ठाणे पोलिसांचं खंडणीविरोधीपथकानं चौकशीला बोलावलं
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणी मीनाक्षी शिंदेंची चौकशी होणार, ठाणे पोलिसांचं खंडणीविरोधीपथकानं चौकशीला बोलावलं
Election : सरपंचपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात महिलेचा पराभव..., गावकऱ्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला, चिडी देवींच्या कुटुंबाला थेट 25 लाखांची आर्थिक मदत
चिडी देवींचा निवडणुकीत पराभव, गावकऱ्यांकडून थेट 25 लाखांची आर्थिक मदत, लोकांच्या एका निर्णयानं कुंटुंबाला आश्चर्याचा धक्का
Mumbai Pune Missing Link : मुंबई-पुणे 'मिसिंग लिंक'वर नवे नियम; पिकअप व्हॅन, मालवाहतूक ट्रकसह अनेक वाहनांना प्रवेशबंदी, 1 नोव्हेंबरपासून बस, कारची वेगमर्यादा निश्चित
मुंबई-पुणे 'मिसिंग लिंक'वर नवे नियम; पिकअप व्हॅन, मालवाहतूक ट्रकसह अनेक वाहनांना प्रवेशबंदी, 1 नोव्हेंबरपासून बस, कारची वेगमर्यादा निश्चित
कॉम्प्युटर क्लास करुन घरी निघाला होता साहिल, मृत्यूला रेल्वेचा गलथान कारभारच जबाबदार; कुटुंबीयांचा आक्रोश
कॉम्प्युटर क्लास करुन घरी निघाला होता साहिल, मृत्यूला रेल्वेचा गलथान कारभारच जबाबदार; कुटुंबीयांचा आक्रोश
Arunachal Border Tension : 'आशा आहे भारत कराराचे पालन करेल'; अरुणाचल सीमेवरील तणावावर चीनच्या उलट्या बोंबा 
'आशा आहे भारत कराराचे पालन करेल'; अरुणाचल सीमेवरील तणावावर चीनच्या उलट्या बोंबा 
Vande Bharat Sleeper Train : मुंबई-बंगळुरु वंदे भारत स्लीपर ट्रेनबाबत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांकडून अपडेट, ट्रेन कोणत्या मार्गे धावणार?
मुंबई-बंगळुरु वंदे भारत स्लीपर ट्रेनबाबत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांकडून अपडेट, ट्रेन कोणत्या मार्गावरुन धावणार?
खोळंब्यानंतर लोकल सुरळीत, पण तुडूंब गर्दीमुळे प्रवाशांची हाणामारी; ठाणे रेल्वे स्थानकावर चाकरमानी संतप्त
खोळंब्यानंतर लोकल सुरळीत, पण तुडूंब गर्दीमुळे प्रवाशांची हाणामारी; ठाणे रेल्वे स्थानकावर चाकरमानी संतप्त
इंग्रजांकडून होत नव्हता, तेवढा त्रास यांच्याकडून; वृक्षतोडीवरुन जरांगे पाटील संतप्त, साय डोंगर परिसरात भेट देणार
इंग्रजांकडून होत नव्हता, तेवढा त्रास यांच्याकडून; वृक्षतोडीवरुन जरांगे पाटील संतप्त, साय डोंगर परिसरात भेट देणार
Embed widget