Skin Care Tips : मुलतानी माती केवळ उन्हाळ्यातच नाही तर हिवाळ्यातही त्वचेसाठी वरदान; 'असा' वापर करा
Skin Care Tips : हिवाळ्यात त्वचेची आर्द्रता टिकवून ठेवण्यासाठी मुलतानी माती मध मिसळून लावल्याने अनेक फायदे होतात.

Skin Care Tips : ग्लोईंग आणि नितळ त्वचा (Skin Care Tips) कोणाला नको हवी असते? यासाठी अनेकजण अनेक प्रकारचे ब्युटी प्रोडक्ट्स वापरतात. पण, उन्हाळ्यात (Summer Season) जशी आपण त्वचेची काळजी घेतो तशीच हिवाळ्यात देखील घेणं गरजेचं आहे. अनेकदा या ऋतूमध्ये आपल्याला त्वचेशी संबंधित अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी हिवाळ्यात (Winter Season) मुलतानी माती (Multani Mitti) फायदेशीर ठरते. हिवाळ्यात मुलतानी माती वापरण्याचे अनेक फायदे आहोत. तुम्ही उन्हाळ्यात याचा वापर केला असेल, पण थंडीच्या दिवसांत मुलतानी माती वापरण्याची योग्य पद्धत जाणून घेऊन तुम्ही तुमच्या त्वचेला उत्तम ग्लो आणू शकता. चला तर मग जाणून घेऊयात हिवाळ्यात मुलतानी माती लावण्याच्या योग्य पद्धती.
मुलतानी माती आणि मध
हिवाळ्यात (Winter Season) त्वचेची आर्द्रता टिकवून ठेवण्यासाठी मुलतानी मातीत तुम्ही जर मध (Honey) मिक्स करून तुमच्या त्वचेवर लावले तर त्यामुळे तुमच्या त्वचेला अनेक फायदे मिळतात. हा फेसपॅक (Facepack) साधारण 10 ते 15 मिनिटं चेहऱ्यावर लावा. आणि 15 मिनिटांनी चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा. तुम्हाला जर चांगले रिझल्ट्स हवे असतील तर आठवड्यातून दोनदा हा उपाय करा.
मुलतानी माती आणि दूध
दुधात मुलतानी माती मिक्स करून चेहऱ्यावर लावल्याने तुमच्या चेहऱ्यावर एक प्रकारे गुलाबी ग्लो येतो. या दोघांचे मिश्रण तुमच्या कोरड्या त्वचेला टवटवीत करण्यास मदत करते. हे पीएच पातळी संतुलित करण्यास देखील मदत करते.
मुलतानी माती आणि दही
मुलतानी मातीमध्ये दही मिसळून त्वचेवर लावल्याने त्वचेवर चांगला ग्लो येतो. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही या पॅकमध्ये गुलाबपाणी देखील समाविष्ट करू शकता आणि त्याचे स्किनकेअर फायदे घेऊ शकता. यामुळे त्वचेत एक वेगळीच चमक दिसून येईल.
तेलकट त्वचा मऊ राहील
ज्या लोकांची त्वचा तेलकट आहे अशा लोकांसाठी मुलतानी माती वरदानापेक्षा कमी नाही. सर्दीमध्ये, ग्लिसरीन इत्यादीसारख्या मॉइश्चरायझिंग एजंटमध्ये मिसळून ते लावणे केव्हाही चांगले मानले जाते. असे केल्याने त्वचेवर होणारा कोरडेपणा दूर होऊ शकतो.
महत्त्वाच्या बातम्या :
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
Health Tips : 'या' पदार्थांतून शरीराला मिळतात हेल्दी फॅट; वजन कमी करण्यासाठी खूप उपयुक्त
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
