एक्स्प्लोर

Shravan Food : खुसखुशीत..खमंग.. साबुदाणा वडा! श्रावणात बनतो स्पेशल.. बनवताना 'या' चार चुका करू नका, खाणारे करतील कौतुक

Shravan Food : श्रावण महिन्यात लोक उपवास करतात. या दरम्यान साबुदाणा वडा खास बनवला जातो. मात्र, साबुदाणा वडा बनवताना काही छोट्या चुका टाळाव्यात.

Shravan Food : श्रावण महिना येताच अनेकांच्या घरात उपवासांच्या पदार्थांची रेलचेल असते. श्रावण महिना म्हणजे व्रत-वैकल्याचा महिना, हिंदू धर्मात हा महिना अत्यंत महत्त्वाचा समजला जातो. हा महिना भगवान भोलेनाथाला समर्पित असतो. या दरम्यान भाविक भगवान शंकराच्या भक्तीत तल्लीन होतात. या काळात लोक उपवास करतात. इतकेच नाही तर जे लोक उपवास ठेवू शकत नाहीत ते त्यांच्या खाण्याच्या सवयींचीही विशेष काळजी घेतात. श्रावणात लोक अनेक प्रकारचे अन्नपदार्थ टाळतात. त्याऐवजी फळे, दुग्धजन्य पदार्थ, राजगीरा पीठ, शिंगाड्याचे पिठ आणि साबुदाणा इत्यादींना त्यांच्या आहाराचा भाग बनवतात. आज आम्ही तुम्हाला उपवास स्पेशल साबुदाणा वडा संदर्भात सांगत आहोत, साबुदाणा भिजवताना काय काळजी घ्यावी? इथपासून ते साबुदाणा वडा खुसखुशीत आणि खमंग होईपर्यंत काय चुका टाळाव्यात. हे जाणून घ्या..

 

साबुदाणा खाणे आरोग्यासाठीही चांगले

साबुदाणा खाणे आरोग्यासाठीही चांगले मानले जाते आणि उपवासाच्या वेळीही खाऊ शकतो. साधारणपणे साबुदाणा वापरून अनेक प्रकारच्या गोष्टी बनवता येतात. पण यापैकी साबुदाणा वडा एकदम चविष्ट लागतो. अनेकदा लोक ते तयार करून खातात. हा पदार्थ अगदी कुरकुरीत लागतो, त्यामुळे तो बनवून खावासे वाटते. तर काही लोक तक्रार करतात की, त्यांचा साबुदाणा वडा ओलसर होतो किंवा तो तितकासा चवदार नसतो. असे घडते, कारण साबुदाणा वडा बनवताना त्यांच्याकडून काही छोट्या चुका होतात. तर, आज या लेखात आम्ही तुम्हाला साबुदाणा वडा बनवताना होणाऱ्या काही सामान्य चुकांबद्दल सांगत आहोत, ज्या तुम्ही टाळल्या पाहिजेत.

 

साबुदाणा धुताना अशी काळजी घ्या..

जेव्हा तुम्ही साबुदाणा वडा बनवत असाल तेव्हा तो नीट भिजवून घेणे फार महत्वाचे आहे. बरेचदा असे घडते की लोक साबुदाणा न धुता भिजवतात किंवा पुरेसा वेळ भिजत नाहीत. यामुळे ते कठीण होऊ शकते किंवा कच्चे राहू शकते. नेहमी लक्षात ठेवा की साबुदाणा वडा बनवण्यापूर्वी तो हलकासा धुवावा आणि किमान ४-५ तास किंवा रात्रभर भिजत ठेवावा.

 

साबुदाण्यात किती पाणी हवं?

साबुदाणा भिजल्यावर वडा बनवण्यापूर्वी पाणी पूर्णपणे काढून टाकणे महत्त्वाचे आहे. साबुदाणामध्ये जास्त ओलावा असल्यास वडे तळताना तुटतात किंवा खूप मऊ आणि गुळगुळीत होतात. एवढेच नाही तर साबुदाणा भिजवताना जास्त पाणी वापरणे टाळावे. त्यामुळे साबुदाणा खूप ओला आणि चिकट होतो, त्यामुळे वडे बनवायला त्रास होतो आणि ते तळताना तुटून पडतात.

 

या कारणामुळे व्यवस्थित मॅश होत नाही

साबुदाणा वडा बटाटे, शेंगदाणे, लिंबाचा रस आणि इतर मसाल्यांच्या उत्कृष्ट मिश्रणाने तयार केला जातो. ते व्यवस्थित मॅश केले पाहिजे, ज्यामध्ये लोक अनेकदा गोंधळ करतात. उदाहरणार्थ, ते बटाटे व्यवस्थित मॅश करत नाहीत आणि त्याचे मोठे तुकडे सोडतात, परिणामी पोत खराब होते. एवढेच नाही तर तळताना वडे फुटू शकतात. पण जेव्हा तुम्ही वडा बनवण्यासाठी सर्व साहित्य एकत्र करत असाल तेव्हा तुम्ही हलक्या हातांनी मॅश करा. जर असे केले नाही तर साबुदाणा खूप ठेचून जाऊ शकतो, ज्यामुळे मिश्रण चिकट होईल.

 

 

एकाच वेळी भरपूर वडे पॅनमध्ये ठेवू नका


वेळ वाचवण्यासाठी अनेक वेळा लोक तव्यात अनेक वडे एकत्र ठेवतात. मात्र तुम्ही ही चूक करू नये. त्यामुळे तेलाचे तापमान कमी होते. त्यामुळे वडे नीट शिजत नाही आणि ओलसर होतात. वडामध्ये जो कुरकुरीतपणा प्रत्यक्षात मिळायला हवा होता, तो मिळत नाही.

 

हेही वाचा>>>

Food : श्रावण महिन्यात काय खावं? काय खाऊ नये? थकवा, अशक्तपणा टाळण्यासाठी आहार काय असावा?

 

 

 

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )

 

 

 

 

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Share Market Update : शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात 1.6 लाख कोटी स्वाहा
सेन्सेक्स- निफ्टीमध्ये सलग तिसऱ्या दिवशी घसरण, भारतीय गुंतवणूकदारांचे 1.6 लाख कोटी बुडाले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
IPL Auction 2026: आयपीएल लिलावात या 6 ऑस्ट्रेलियन खेळाडूंवर 45.70 कोटी अन् 5 अनकॅप्ड भारतीय खेळाडूंवर 45 कोटींची उधळण!
आयपीएल लिलावात या 6 ऑस्ट्रेलियन खेळाडूंवर 45.70 कोटी अन् 5 अनकॅप्ड भारतीय खेळाडूंवर 45 कोटींची उधळण!
मोठी बातमी! झेडपी, पंचायत समितीच्या निवडणुकांबाबत महत्वाचं, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 2 निर्णय
मोठी बातमी! झेडपी, पंचायत समितीच्या निवडणुकांबाबत महत्वाचं, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 2 निर्णय

व्हिडीओ

Eknath Shinde Brother : साताऱ्यातील सावरी गावात शिंदेंच्या भावाच्या रिसॉर्टजवळ ड्रग्स सापडलं- अंधारे
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, आमदारकी जाणार? वकील काय म्हणाले?
Sana Malik On Ajit Pawar : आम्ही अजितदादाना अहवाल सादर करणार, वरिष्ठांचा आदेश आल्यावर पुढे जाऊ - सना मलिक
Sanjay Raut PC : शिंदेंची शिवसेना ही अमित शाहांची टेस्ट ट्यूब बेबी, संजय राऊत यांचा घणाघात
Shivsena And BJP Seat Sharing : युतीचा बोलबाला, कधी ठरणार फॉर्म्युला? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market Update : शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात 1.6 लाख कोटी स्वाहा
सेन्सेक्स- निफ्टीमध्ये सलग तिसऱ्या दिवशी घसरण, भारतीय गुंतवणूकदारांचे 1.6 लाख कोटी बुडाले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
IPL Auction 2026: आयपीएल लिलावात या 6 ऑस्ट्रेलियन खेळाडूंवर 45.70 कोटी अन् 5 अनकॅप्ड भारतीय खेळाडूंवर 45 कोटींची उधळण!
आयपीएल लिलावात या 6 ऑस्ट्रेलियन खेळाडूंवर 45.70 कोटी अन् 5 अनकॅप्ड भारतीय खेळाडूंवर 45 कोटींची उधळण!
मोठी बातमी! झेडपी, पंचायत समितीच्या निवडणुकांबाबत महत्वाचं, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 2 निर्णय
मोठी बातमी! झेडपी, पंचायत समितीच्या निवडणुकांबाबत महत्वाचं, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 2 निर्णय
Bajrang Sonawane : दोन गोष्टी पक्क्या, वाल्मिक कराडला जामीन अन् धनंजय मुंडे यांना मंत्रिपद मिळणार नाही, बजरंग सोनवणेंचा टोला
धनंजय मुंडे महाराष्ट्राच्या, दिल्लीच्या मंत्रिमंडळात दिसणार नाहीत, त्यांनी मंत्रिपदासाठी अमेरिकेला जावं : बजरंग सोनवणे
Ajit Pawar: अजितदादांनी भाजप शिवसेनेच्या विरोधाला दाखवला कात्रजचा घाट! मुंबई मनपा निवडणुकीची कमान नवाब मलिकांच्याच खांद्यावर
अजितदादांनी भाजप शिवसेनेच्या विरोधाला दाखवला कात्रजचा घाट! मुंबई मनपा निवडणुकीची कमान नवाब मलिकांच्याच खांद्यावर
RBI : रिझर्व्ह बँकेची महाराष्ट्रातील आणखी एका सहकारी बँकेवर कारवाई, सहा महिन्यांचे निर्बंध, ठेवी स्वीकारणे, कर्ज देण्यास मनाई
रिझर्व्ह बँकेची महाराष्ट्रातील आणखी एका सहकारी बँकेवर कारवाई, सहा महिन्यांसाठी निर्बंध,
सुषमा अंधारेंकडून 145 कोटींच्या ड्रग्सचे गंभीर आरोप; प्रकाश शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, आरोप फेटाळले
सुषमा अंधारेंकडून 145 कोटींच्या ड्रग्सचे गंभीर आरोप; प्रकाश शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, आरोप फेटाळले
Embed widget