Shiv Puran : भगवान शिव 'या' गोष्टींमुळे क्रोधित होतात, शिवपुराणात सांगितलेली भोलेनाथांच्या क्रोधाची कारणे जाणून घ्या
Shiv Puran : शिवमहापुराणात भगवान शंकराचा महिमा, त्यांची रूपे, अवतार, कथा, ज्योतिर्लिंग तसेच उपासना, व्रताचे फायदे सांगितले आहेत.
Shiv Puran : शिवपुराणानुसार, साध्या पध्दतीनेही भगवान शंकराची (Lord Shiv) भक्तीभावाने पूजा केली तर ते प्रसन्न होतात. पण अशा काही गोष्टी घडतात, ज्यामुळे महादेव क्रोधित होतात आणि भक्तांना कधीच माफ करत नाहीत. शिवपुराण हे शैव पंथाशी संबंधित एक महापुराण आहे. हिंदू धर्मातील 18 पुराणांमध्ये याला विशेष स्थान आहे. शिवमहापुराणात भगवान शंकराचा महिमा, त्यांची रूपे, अवतार, कथा, ज्योतिर्लिंग तसेच उपासना व व्रताचे फायदे सांगितले आहेत.
शिवपुराणात काय सांगितलय?
शिवपुराणानुसार, महादेवांना देवाधिदेवाचा दर्जा आहे आणि त्रिमूर्तीमध्ये शिवाला सर्वात शक्तिशाली मानले जाते. त्याची पूजा केल्याने भक्त सर्व समस्यांपासून दूर राहतात. भगवान शिवाची खऱ्या मनाने आणि भक्तीने पूजा केल्यास त्याचे फळ निश्चितच मिळते. भगवान शिव अतिशय निष्पाप आहेत, म्हणून त्यांना भोलेनाथ आणि भोले भंडारी या नावांनीही ओळखले जाते. साध्या उपासनेनेही भगवान शिव लवकर प्रसन्न होतात. जर एखाद्या भक्ताने शिवलिंगाला शुद्ध पाण्याचे भांडेही खऱ्या मनाने अर्पण केले तर त्याला त्याचा नक्कीच फायदा होतो.
जर भगवान शिव क्रोधित झाले तर..
पण भगवान शिव जितके साधे आणि निरागस आहेत तितकेच ते रागीष्ट देखील आहेत. भगवान शिवाचा कोप खूप उग्र आहे. जर भगवान शिव क्रोधित झाले तर त्यांचा तिसरा डोळा उघडतो आणि संपूर्ण विश्वाचा नाश होऊ शकतो. त्यामुळे शिवाच्या कोपाचा सामना करावा लागेल असे काहीही करू नका. शिवपुराणात अशा काही कामांचा उल्लेख करण्यात आला आहे, जे केल्यावर भगवान शिव क्रोधित होतात. त्यामुळे चुकूनही या गोष्टी करू नका. जाणून घेऊया सविस्तर
चुकूनही या गोष्टी करू नका
शिवपुराणानुसार, जे लोक दुसऱ्याच्या पुरुष किंवा स्त्रीवर वाईट नजर टाकतात त्यांना पापाच्या श्रेणीत टाकण्यात आले आहे. अशा लोकांना भगवान शंकराच्या कोपाचा सामना करावा लागतो. दान दिल्यानंतर दान परत घेणारे, गुरूच्या पत्नीवर वाईट नजर टाकणारे आणि धर्माचा अपमान करणाऱ्यांना महापापकारांच्या श्रेणीत टाकण्यात आले आहे. या गोष्टी करणाऱ्यांनाही शिवाच्या रोषाला सामोरे जावे लागते. मंदिरातून चोरी करणे, गुन्हा नसताना दोष देणे, महिला आणि पालकांना कठोर शब्द बोलणे, त्यांच्या पूर्वजांचा अपमान करणे यासारखे वाईट कृत्य करणारे लोक अक्षम्य गुन्हेगार मानले जातात. या गोष्टी करणाऱ्यांना शिव कधीच माफ करत नाही.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:
Masik Shivratri 2024 : फेब्रुवारीतील मासिक शिवरात्री खास! वैवाहिक जीवनात आनंद, उत्तम जोडीदार मिळेल; तारीख, शुभ मुहूर्त जाणून घ्या