Shani Dev : शनिदेवाला प्रसन्न करायचे असेल, तर हिवाळा सर्वात चांगला ऋतु! सर्व कामात मिळेल यश, 'हा' उपाय अवश्य करा
Shani Dev : जर तुम्हाला शनिदेवाला प्रसन्न करायचे असेल तर हिवाळा हा सर्वात चांगला आहे, जाणून घ्या शनिदेवाला प्रसन्न करण्याचा निश्चित उपाय.
Shani Dev : शनिदेवाला न्यायाची देवता मानले जाते. शनिदेव नेहमी आपल्या भक्तांना त्यांच्या कर्मानुसार फळ देतात. त्यामुळे शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी लोक सर्व प्रकारे प्रयत्न करतात. जर तुम्हाला शनिदेवाला प्रसन्न करायचे असेल तर हिवाळा हा सर्वात चांगला आहे. जाणून घ्या उपाय
शनिदेवाचा आशीर्वाद मिळेल!
हिवाळा ऋतुमध्ये शनिदेवाला प्रसन्न करणे सोपे असते कारण हिवाळ्यात केलेल्या दानामुळे तुम्हाला शनिदेवाचा आशीर्वाद मिळतो. शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी मानवजातीच्या कल्याणासाठी मदत करणे किंवा कार्य करणे यासोबतच पूजा करणे अत्यंत आवश्यक आहे. हिवाळ्यात शनिदेवाला प्रसन्न करायचे असेल तर या दिवशी घोंगडी दान करा. हिवाळ्यात, विशेषतः शनिवारी ब्लँकेट दान करा. ब्लँकेट दान करणे खूप शुभ मानले जात असे. ब्लँकेट दान: या काळात अनेक गरजू लोक रस्त्यावर झोपतात.त्यांना आवश्यक असलेल्या वस्तू दान केल्याने शनिदेव प्रसन्न होतात.
हिवाळ्यात गरजूंना लोकरीचे कपडे किंवा ब्लँकेट दान करा
डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात भरपूर थंडी असते. म्हणूनच या काळात लोकरीचे कपडे किंवा ब्लँकेट दान करणे महत्त्वाचे आहे. असे केल्यास कामात मोठे यश मिळते. तुमची प्रलंबित कामे पूर्ण होऊ लागतात. तसेच, हिवाळ्यात ब्लँकेटसह लोकरीचे कपडे दान करणे देखील शुभ मानले जाते. लोकरीचे कपडे, रजाई, चपला आणि शीतपासून बचाव करणाऱ्या वस्तूंचे दान केल्याने लोकांचे दु:ख दूर होते आणि धनाची प्राप्ती होते. शनिदेवाचा आशीर्वाद मिळविण्यासाठी दान करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. म्हणूनच खऱ्या मनाने या वस्तूंचे दान केल्याने शनिदेव प्रसन्न होतात आणि भक्तांना आशीर्वाद देतात.
कोणत्या दिवशी दान करावे?
शनिशी संबंधित वस्तूंचे दान करण्यासाठी शनिवार हा सर्वोत्तम दिवस मानला जातो. ज्योतिषशास्त्रात शनि हा श्रम आणि मेहनतीचा कारक मानला जातो. यासोबतच गरीब आणि असहाय्य लोकांची सेवा आणि मदत केल्याने शनि सर्वात जास्त प्रसन्न होतात, एवढेच नाही तर इतरांच्या न्यायासाठी संघर्ष करणाऱ्यांनाही शनि शुभ फळ देतात. शनिवारी काळी ब्लँकेट दान करता येते, या दिवशी सूर्यास्तानंतर कधीही काळी ब्लँकेट दान करता येते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: