Kartik Amavasya 2023: आज वर्षातील शेवटची अमावस्या; नवीन वर्षातील समस्या दूर करण्यासाठी करा 'हे' उपाय, कार्तिकी अमावस्येचं विशेष महत्त्व
Kartik Amavasya 2023: हिंदू धर्मात पौर्णिमा आणि अमावस्येला विशेष महत्त्व आहे. आज वर्षातील शेवटची अमावस्या, म्हणजेच कार्तिकी अमावस्या आहे. या अमावस्येच्या दिवशी पितृपूजनाला महत्त्व आहे.
![Kartik Amavasya 2023: आज वर्षातील शेवटची अमावस्या; नवीन वर्षातील समस्या दूर करण्यासाठी करा 'हे' उपाय, कार्तिकी अमावस्येचं विशेष महत्त्व Kartik Amavasya 2023 when is the last moon of year bhaumvati amavasya do not miss chance to do pitru pooja for happiness and prosperity in the new year Kartik Amavasya 2023: आज वर्षातील शेवटची अमावस्या; नवीन वर्षातील समस्या दूर करण्यासाठी करा 'हे' उपाय, कार्तिकी अमावस्येचं विशेष महत्त्व](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/12/4bd4e0ee5184f6ada9d72762ec95a2c31702347159610713_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Kartik Amavasya : हिंदू धर्मात अमावस्येला विशेष महत्त्व दिलं जातं. 2023 या वर्षातील शेवटची अमावस्या 12 डिसेंबरला, म्हणजेच आज आहे. कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील ही कार्तिकी अमावस्या (Kartiki Amavasya) आहे. अमावस्येच्या दिवशी स्नान, दान आणि उपासनेने विशेष लाभ होतो. या वर्षातील शेवटची अमावस्या मंगळवारी येते आणि शास्त्रानुसार, जी अमावस्या मंगळवारी येते तिला भौमवती अमावस्या (Bhaumvati Amavasya) असंही म्हणतात. या शेवटच्या अमावस्येला पूजा केल्याने तुमचं येणारं वर्ष, 2024 हे सुख-समृद्धीचं जाईल.
कार्तिकी अमावस्येला केलेल्या उपायांनी पितरांच्या आत्म्याला शांती मिळते, असं मानलं जातं. नवीन वर्षात सुख समृद्धीसाठी अमावस्येच्या तिथीला पितरांना प्रसन्न करण्याची संधी सोडू नका. अमावस्येला पितृपूजन, स्नान, पिंडदानाला महत्त्व आहे. अमावस्येला दानधर्म केल्यामुळे पुण्य मिळतं, अशी मान्यता आहे. अगदी पितृदोषापासून मुक्तीसाठी अमावस्येला महत्त्व आहे. या दिवशी काही उपाय केल्याने जीवनातील अडचणी दूर होतात, आर्थिक त्रास दूर होतो.
वर्षातील शेवटची अमावस्या कधी आहे?
12 डिसेंबर 2023
मुहूर्त
पंचांगानुसार, कार्तिक अमावस्या 12 डिसेंबरला सकाळी 6.24 वाजता सुरू होऊन 13 डिसेंबरला पहाटे 5.01 वाजता समाप्त होईल.
शुभ वेळ
सकाळी 5:14 ते 6:43 पर्यंत.
शुभ मुहूर्त
सकाळी 11.54 ते दुपारी 12.35 पर्यंत.
कार्तिक अमावस्येचे महत्त्व
कर्जमुक्तीसाठी अमावस्या तिथी अत्यंत शुभ मानली जाते. या दिवशी पूजा, दान आणि पवित्र नदीत स्नान केल्याने पुण्य प्राप्त होतं. पौराणिक मान्यतेनुसार, कार्तिक महिन्यातील अमावास्येला लक्ष्मीची पूजा करून व्रत केल्यास पापांपासून मुक्ती मिळते, अशी मान्यता आहे. कार्तिक अमावस्येला पितरांना तर्पण अर्पण करण्याची परंपरा आजही पाळली जाते.
कार्तिकी अमावस्येच्या दिवशी केलेल्या पूजेने पितरांच्या आत्म्याला शांती मिळते आणि त्यांचा आशीर्वाद प्राप्त होते, अशी मान्यता आहे. या दिवशी तर्पण आणि पिंडदान देण्याचं विशेष महत्त्व आहे. या अमावस्येचे व्रत केल्याने प्रत्येक समस्या संपुष्टात येऊन जीवनात सुख-समृद्धी प्राप्त होते. पौराणिक शास्त्रानुसार, या दिवशी पूजा केल्याने पितृदोष दूर होतो आणि पितरांचा आशीर्वाद कुटुंबावर कायम राहतो.
भौमवती अमावस्या हनुमानाच्या प्रभावाखाली आहे, त्यामुळे ऋणातून मुक्ती मिळवण्यासाठी भौमवती अमावस्येदिवशी हनुमानाची पूजा करावी, यामुळे विशेष लाभ मिळतो. भौमवती अमावस्येच्या दिवशी दान आणि पूजा केल्याने नकारात्मक शक्तींचाही नाश होतो.
(टीप: वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)