Janmashtami 2023: आज देशभरात मोठ्या थाटामाटात साजरी होणार 'श्रीकृष्णजन्माष्टमी'! यंदाची जन्माष्टमी विशेष, जाणून घ्या
Janmashtami 2023: आज मध्यरात्री 12 च्या सुमारास श्रीकृष्णाचा जन्म होईल. पंचागानुसार यावर्षी जन्माष्टमी 6 आणि 7 सप्टेंबर 2023 असे दोन दिवस निश्चित करण्यात आली आहे.जाणून घ्या सविस्तर
![Janmashtami 2023: आज देशभरात मोठ्या थाटामाटात साजरी होणार 'श्रीकृष्णजन्माष्टमी'! यंदाची जन्माष्टमी विशेष, जाणून घ्या Janmashtami 2023 Marathi News Shri Krishna Janmashtami Will Be Celebrated Today Janmashtami 2023: आज देशभरात मोठ्या थाटामाटात साजरी होणार 'श्रीकृष्णजन्माष्टमी'! यंदाची जन्माष्टमी विशेष, जाणून घ्या](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/06/09a0fed467635013d7b95128c6a048151693963559428381_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Janmashtami 2023 : श्रीकृष्ण जन्माष्टमीचा (Janmashtami 2023) सण आज उत्साहात साजरा होणार आहे. भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला हा उत्सव साजरा केला जातो. या दिवशी भगवान श्रीकृष्णाचा (Shri Krishna) जन्म मथुरा नगरीत देवकीच्या आठव्या अपत्याच्या रूपात कंसाच्या कैदेत झाला. जन्माष्टमीच्या दिवशी घरोघरी श्रीकृष्णाच्या बालस्वरुपाची पूजा केली जाते. भाविक भजन आणि कीर्तन गात या दिवशी उपवास करतात, तसेच भव्य सजावटही करतात. दरम्यान, आज मध्यरात्री 12 च्या सुमारास श्रीकृष्णाचा जन्म होईल. पंचागानुसार यावर्षी जन्माष्टमी 6 आणि 7 सप्टेंबर 2023 असे दोन दिवस निश्चित करण्यात आले आहे. जाणून घेऊयात...
यंदाची जन्माष्टमी विशेष
आज श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे. भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला भगवान श्रीकृष्णाची पूजा करणे अत्यंत शुभ आहे. धार्मिक पुराणानुसार, ज्यावेळेस कृष्णाचा जन्म झाला, त्यावेळी रोहिणी नक्षत्र होते. यंदाची जन्माष्टमी विशेष मानली जाते. श्रीकृष्णाचा जन्म अष्टमी तिथीला रोहिणी नक्षत्र, वृषभ राशीत आणि बुधवारी झाला असे सांगितले जाते. त्यामुळे बुधवारी कृष्णाचा जन्मदिवस साजरा केला जाणार आहे. जन्माष्टमीला देवाची पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात, असा विश्वास आहे.
कृष्ण जन्माष्टमीचा शुभ मुहूर्त
श्री कृष्ण पूजेची वेळ - 6 सप्टेंबर 2023, रात्री 11.57 ते 12:42 पर्यंत
पूजा कालावधी - 46 मिनिटे असेल
मध्यरात्रीचा क्षण - 12.02 प्रात:
जन्माष्टमीचे रोहिणी नक्षत्र कधी सुरू होणार?
भगवान श्रीकृष्णाचा जन्म काळ मध्यरात्र होता. त्यावेळी रोहिणी नक्षत्र होते. यामुळे कृष्णाचा जन्मदिवस साजरा करण्यासाठी एक विशेष वेळ निश्चित केली जाते. यावर्षी जन्माष्टमीचे रोहिणी नक्षत्र 6 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 09.20 पासून सुरू होईल. तो दुसऱ्या दिवशी 07 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 10:25 वाजता संपेल.
जन्माष्टमी 2 दिवस साजरी केली जाते का?
स्मार्त आणि वैष्णव पंथ वेगवेगळ्या तारखांना आपापली जन्माष्टमी साजरी करतात. जन्माष्टमीच्या पहिल्या तिथीला स्मार्त आणि वैष्णव समाजातील लोक दुसऱ्या तिथीला पूजा करतात.
जन्माष्टमी पूजा विधी
कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी सूर्योदयापासून उपवास सुरू केला जातो, पूजा केल्यानंतर किंवा दुसऱ्या दिवशी सूर्योदयानंतर हा उपवास सोडला जातो.
हे व्रत करणाऱ्याने उपवासाच्या एक दिवस आधी (सप्तमीला) हलके व सात्विक अन्न खावे.
उपवासाच्या दिवशी सकाळी स्नान करून उपवासाचा संकल्प करावा.
संध्याकाळी पूजास्थळी सुंदर देखावे सजवा. देवकीजींसाठी प्रसूतिगृह बांधावे. झोपाळ्यावर बाळकृष्णाला बसवावे.
देवकी, वासुदेव, बलदेव, नंद, यशोदा आणि लक्ष्मी यांची विधिवत पूजा करावी. बालगोपाळ सजवा.
रात्री 12 वाजता शंख आणि घंटा वाजवून श्रीकृष्णाच्या जन्माचा अभिषेक करा.
बालगोपाळांना भोजन अर्पण करावे.
कृष्ण चालिसा पाठ करा आणि शेवटी आरती करा.
जन्माष्टमीच्या उपवासात काळजी घ्या
जन्माष्टमीच्या दिवशी तुमच्या जिभेवर ताबा ठेवावा,
हे व्रत करत असताना अन्नधान्य खाऊ नये.
जन्माष्टमीच्या व्रतामध्ये फळांचे सेवन करावे.
यासोबतच वरीचा भात, माव्याची बर्फी किंवा शिंगाड्याच्या पिठाचा हलवा खाऊ शकता.
जन्माष्टमीचे व्रत करणाऱ्यांनी फळांचे सेवन करावे.
पाणी भरपूर प्यावे, हायड्रेटेड राहा.
उपवासात खाण्यापिण्याची विशेष काळजी घ्या.
श्रीकृष्णाचे मंत्र (जन्माष्टमी मंत्र)
श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवा
हरे कृष्ण, हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण, हरे हरे राम, हरे राम, राम राम, हरे हरे
ॐ नमो भगवते श्री गोविन्दाय
ॐ नमो भगवते तस्मै कृष्णाया कुण्ठमेधसे। सर्वव्याधि विनाशाय प्रभो माममृतं कृधि।।
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)