Ashadhi Ekadashi : आषाढी एकादशीचा उपवास द्वादशीलाच का सोडतात? पाहा त्यामागचं कारण...

Ashadhi Wari 2023: आषाढी एकादशीनिमित्त पंढरी सजली असून वारकऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. पाहा आषाढीचे प्रत्येक अपडेट्स एका क्लिकवर

abp majha web team Last Updated: 29 Jun 2023 05:01 PM
Maharashtra Rains Updates: राज्यात पावसाचं टायमिंग चुकलं! शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट
Monsoon Maharashtra: राज्यात पावसाचे आगमन उशिराने झाल्याने आणि काही ठिकाणी पाऊस दडी मारण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे. Read More
Ashadhi Ekadashi : आषाढी एकादशीचा उपवास द्वादशीलाच का सोडतात? पाहा त्यामागचं कारण...
Ashadhi Wari 2023 : विठुरायावर असलेल्या श्रद्धेपोटी आपल्याकडे आषाढी एकादशीचा उपवास आवर्जून केला जातो. द्वादशीलाच हा उपवास सोडला जातो, त्यामागे काही कारण आहे. Read More
Maharashtra Headlines 29th June : महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर, दुपारच्या बातम्या
राज्यातील दुपारच्या पाच महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील... Read More
Ashadhi Wari : 'जय हरी विठ्ठल' म्हणत पंतप्रधान मोदींनी मराठीतून दिल्या एकादशीच्या शुभेच्छा! नक्की काय म्हणाले मोदी?
Ashadhi Wari 2023: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील विठ्ठल भक्तांना आषाढी एकादशीनिमित्त मराठीतून शुभेच्छा दिल्या आहेत. Read More
 Parner News:  प्रतिपंढरपूर पळशी येथे आषाढी निमित्ताने भाविकांची मांदियाळी

 Parner News:  प्रतिपंढरपूर म्हणून ओळख असलेल्या पारनेर तालुक्यातील पळशी येथे आषाढी एकादशीनिमित्ताने तालुक्यातूनच नाही तर जिल्ह्यातून मोठ्या संख्येने भाविक दाखल झाले होते. यावेळी विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे पळशी येथे पुरातन विठ्ठल राई रुक्मिणी मंदिर आहे. पेशवेकालीन अशा या पुरातन मंदिराचे नक्षीकाम देखील अतिशय सुंदर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेच्या लुटीतील काही भाग या मंदिरासाठी दिल्याने स्थानिक ग्रामस्थ सांगतात. प्रतिपंढरी अशी ओळख असल्याने आषाढी निमित्त तालुक्यासह जिल्ह्यातून मोठया संख्येने दिंड्या येत असतात. लाखोंच्या संख्येने भाविक दिवसभर या मंदिरात विठुरायाच्या दर्शनासाठी येत असतात..

Ashadhi Wari: सिंधुदर्गच्या नेरूर गावचा युवा चित्रकार हर्षद मेस्त्रीनं तांदुळापासून साकारली विठ्ठलाची प्रतिकृती, हर्षदच्या या अनोख्या कलाकृतीचं कौैतुक

Ashadhi Wari: आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गातील कलाकारांच गाव असलेल्या नेरुर गावातील युवा कलाकाराने तांदळापासून विठ्ठलाची प्रतिकृती रेखाटली आहे. युवा चित्रकार हर्षद मेस्त्री याने तांदूळ भाजून त्यापासून विठ्ठलाचं चित्र साकारल आहे. पांढरे तांदूळ चुलीवर विशिष्ट पद्धतीने भाजत तांदळाला वेगवेगळे रंग येईपर्यंत भाजले. त्यानंतर वेगवेगळ्या शेडमध्ये ते तांदूळ विठ्ठलाचे चित्र ज्या पद्धतीने रेखाटतात त्या पद्धतीने मांडत विठ्ठलाच सुंदर चित्र हर्षद मेस्त्री यांनी साकारला आहे.

Mumbai Ashadhi Wari: वडाळ्यातील विठ्ठल मंदिरात मुंबईकरांची गर्दी

Mumbai Ashadhi Wari: आषाढी एकादशी निमित्त मुंबईतील वडाळा परिसरात असणाऱ्या आणि प्रतिपंढरपूर ओळख असलेल्या विठ्ठल मंदिरात भाविकांची गर्दी केली आहे. दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या आहेत. आषाढीसाठी विठ्ठल मंदिराला फुलांची आकर्षक सजावट कऱण्यात आली 

Ashadhi Wari: कोल्हापूरमधील मिरजकर टेकडी येथून नंदवाळच्या दिशेने पायी दिंडी

Ashadhi Wari: आषाढी एकादशीच्या निमित्ताने कोल्हापूरच्या मिरजकर तिकटी इथून नंदवाळच्या दिशेने पायी दिंडी निघते. प्रति पंढरपूर म्हणून नंदवाळची ख्याती कोल्हापूर जिल्ह्यात आहे. कोल्हापूर शहराच्या मार्गावरून दिंडी निघत असताना ठीक ठिकाणी स्वागत केले जाते. संपूर्ण शहरांमध्ये भक्तीचा वातावरण पाहायला मिळते

Mumbai News: मुंबईतील दादरमधील कर्णबधीर मुलांच्या विकास विद्यालयात निघाली दिंडी

Mumbai News: मुंबईतील दादरमधील कर्णबधीर मुलांच्या विकास विद्यालयमध्ये शाळेतील चिमुकल्यांनी  आषाढी एकादशीनिमित शाळेत दिंडी काढून एकादशी साजरी केली.

Jalgaon News: संत मुक्ताबाईच्या समाधीस्थळी खजूरची आरास

Jalgaon News: जळगाव जिल्ह्यातील श्री क्षेत्र कोथळी येथे संत मुक्ताबाईच्या समाधीस्थळी खजूरची आरास करण्यात आले आहे. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या शेतातील खजुरांची सुंदर आरास करण्यात आली आहे. आषाढीनिमित्त विठुमाऊलीचा गजर. 

Nandurbar News:  नंदुरबारमध्ये चिमुकल्यांची आषाढीनिमित्त दिंडी

Nandurbar News:  नंदुरबारमध्ये चिमुकल्यांची आषाढीनिमित्त दिंडी. दिंडीत विद्यार्थ्यांनी घेतलं विठ्ठल रुक्मिणीचं रूप. हरी नामाचा गजराने वातावरण भक्तिमय. आकर्षक पारंपारिक वेशभूषेत निघालेली चिमुकल्यांची वारी सर्वांचं लक्ष वेधून घेत होती.

Maharashtra News: राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका 30 सप्टेंबरनंतरच होणार, सहकारमंत्री अतुल सावेंचा मोठा निर्णय
जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार निवडणूक प्रक्रिया सुरू असलेल्या संस्था वगळून इतर सर्व संस्थांच्या निवडणुका ज्या टप्प्यावर आहेत त्याच ठिकाणी थांबण्याचे आदेश राज्य सरकारकडून देण्यात आले आहेत. Read More
Nagpur News: नागपूर जिल्ह्यातील धापेवाडा मंदिरात सकाळपासूनच विठ्ठल दर्शनासाठी भाविकांची रीघ

Nagpur News: आषाढी एकादशीच्या निमित्ताने नागपूर जिल्ह्यातील धापेवाडा मंदिरात सकाळपासूनच विठ्ठल दर्शनासाठी भाविकांची रीघ लागली आहे. धापेवाडा हे ठिकाण विदर्भातील पंढरी म्हणून ओळखले जाते. धापेवाड्यात सुमारे साडेतीनशे वर्षे जुने विठ्ठल रखुमाई चे मंदिर असून मंदिरात स्थापित असलेल्या विठ्ठल रखुमाईच्या मूर्ती स्वयंभू आहे. फक्त नागपूर जिल्ह्यात नव्हे, तर पूर्व विदर्भातून मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येतात. आषाढी एकादशीनंतर अनेक दिवस गावात यात्रा ही भरते...

Ratnagiri Ashadhi Wari:  रत्नागिरी शहरांमध्ये देखील आषाढी वारीचा उत्साह

Ratnagiri Ashadhi Wari:  रत्नागिरी शहरांमध्ये देखील आषाढी वारीचा उत्साह पाहायला मिळाला. शहरातील मारुती मंदिर ते विठ्ठल मंदिर या दरम्यान विठू नामाचा गजर करत हजारो नागरिक या वारीमध्ये सहभागी झाले. लहान थोर प्रत्येक जण यावेळी विठू नामाचा गजर करताना दिसून आला. शहरामध्ये असलेल्या विठ्ठल मंदिरात आकर्षक सजावट करण्यात आली आहे. प्रति पंढरपूर अशी या विठ्ठल मंदिराची ओळख आहे. भजन, कीर्तन, विठ्ठल नामाचा गजर अशा भक्तिमय वातावरणात संपूर्ण जिल्हाभरात आषाढी एकादशी साजरी केली जात आहे.

 Ashadhi Ekadashi: आषाढी एकादशी निमित्ताने नाशिकमध्ये साकारली 12 × 18 आकाराची रांगोळी

 Ashadhi Ekadashi: आषाढी एकादशी निमित्ताने नाशिकच्या मालेगाव मधील साई आर्टच्या रांगोळी कलाकारांनी 12 × 18 आकाराची सलग 80 तास राबत सुंदर अशी पंढरीच्या वारीची रांगोळी आपल्या कलेतून साकारली आहे. लेक पिगमेंटचे रासायनिक रांगोळीचे रंग एकत्रित करुन सुमारे 35 किलो रांगोळीच्या माध्यमातून ही रांगोळी साकारण्यात आली आहे. मालेगावातील ही रांगोळी विठ्ठल भक्तांना पाहण्यासाठी खुली करण्यात आली आहे. 

Sindhudurga Ashadhi Ekadashi:  आ आषाढी एकादशीनिमित्त साकारलं विठ्ठलाचं स्टोन आर्ट , दगडातून साकारलं विठ्ठलाचं रुप

Sindhudurga Ashadhi Ekadashi:  आषाढी एकादशीनिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चित्रकार सुमन दाभोलकर यांनी स्टोन आर्ट साकारलंय. कणकवलीच्या गदनदीत मिळणाऱ्या दगडावर रंगाची उधळण करीत दगडाला कोणताही आकार न देता विट्ठलाचे स्टोन आर्ट साकारलं आहे. समुन दाभोलकर यांनी आतापर्यंत अनेक स्टोन आर्ट साकारली आहेत. 

Navi Mumbai Rangoli:  24 रांगोळीतून साकारले विठ्ठल रुक्मिणी, रांगोळी काढण्यासाठी लागले तीन दिवस

Navi Mumbai Rangoli:  आषढी एकादशीनिमित्त नवी मुंबईच्या मिताली सुर्वे यांनी विठ्ठल रुक्मिणीची रांगोळी साकारली आहे, ही रांगोळी काढण्यासाठी त्यांना तीन दिवसांचा वेळ लागलाय,   

 Nandurbar Ashadi Ekadashi : नंदुरबार शहरातील विठ्ठल मंदिरात विठ्ठलाची रांगोळी, कलाकारांनी साकारली विठ्ठलाची प्रतिकृती..

 Nandurbar Ashadi Ekadashi Rangoli: आषाढी एकादशीनिमित्त नंदुरबार शहरातील विठ्ठल मंदिरात विठ्ठलाची रांगोळी साकारण्यात आलीय. रांगोळी कलाकार गौरव माळी आणि त्यांच्या सहकाऱ्यांना ही रांगोळी साकारण्यासाठी तब्बल 12 तासांचा वेळ लागलाय. विठ्ठलांची  रांगोळी मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचं लक्ष वेधून घेत आहे. 

Hingoli Ashadhi Ekadashi:  हिंगोलीतील नरसी नामदेव येथील नामदेव मंदिरामध्ये भक्तांची दर्शनासाठी गर्दी

Hingoli Ashadhi Ekadashi:   आषाढी एकादशीच्या निमित्ताने संत शिरोमणी नामदेव महाराज यांचं जन्मगाव असलेल्या हिंगोलीतील नरसी नामदेव येथील नामदेव मंदिरामध्ये भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे.  पहाटे पाच वाजल्यापासून नामदेव महाराजांच्या दर्शनाला सुरुवात झाली आहे. पहाटे 5 वाजता प्रशासकीय पूजा झाल्यानंतर पंचक्रोशीतील तसेच मराठवाड्यातील भाविकांची दर्शनासाठी रिघ लागली आहे.

Buldhana Ashadhi Ekadashi: बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर येथील विठ्ठल रखुमाई मंदिरात पहाटेपासूनच भाविकांची मोठी गर्दी

Buldhana Ashadhi Ekadashi:  बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील प्राचीन अशा विठ्ठल रखुमाई मंदिरात पहाटेपासूनच भाविकांनी मोठी गर्दी केलेली आहे . विठ्ठल रखुमाईचे हे अतिशय प्राचीन मंदिर असून या मंदिरात दरवर्षी आषाढी एकादशीचा मोठा उत्सव साजरा करण्यात येतो. आज पहाटेपासूनच अभिषेक झाल्यावर या उत्सवाला सुरुवात झाली आहे .

Ashadhi Ekadashi: विठुरायाच्या दर्शनासाठी लागतायेत तब्बल 26 तास, भाविकांकडून संताप व्यक्त
Pandharpur Ashadhi Wari: शासकीय महापुजेमुळे रात्री 12 ते 4 वाजेपर्यंत फक्त मुखदर्शन सुरू होते.  पायावरील दर्शन पाच तास बंद राहिल्याने 26 तासांचा वेळ लागत आहे. Read More
Shegaon Ashadhi Ekadashi:  आषाढी एकादशीनिमित्त शेगावच्या संत गजानन महाराज मंदिरात भाविकांची पहाटेपासूनच गर्दी

Shegaon Ashadhi Ekadashi:  आषाढी एकादशीनिमित्त शेगावच्या संत गजानन महाराज मंदिरातही भाविकांनी पहाटेपासूनच गर्दी केली आहे. या वर्षी आषाढी एकादशी उत्सवाचे हे 54 वे वर्ष आहे. आज जवळपास एक लाख भाविक शेगावात दाखल झाले आहेत.

Kesarkar On Ashadhi Wari: विठ्ठलाने न मागता सर्व काही दिलंय, एवढं काम करणारा मुख्यमंत्री दिलाय : दीपक केसरकर

Kesarkar On Ashadhi Wari: आषाढीनिमित्त शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर देखील पंढरपूरमध्ये आहेत. विठ्ठलाने न मागता सर्व काही दिलंय, एवढं काम करणारा मुख्यमंत्री दिलाय, अशी प्रतिक्रिया राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिलीय.

Ashadhi Wari :  मानाचे वारकरी म्हणून नगर जिल्ह्यातील काळे दाम्पत्याला मान

Ashadhi Wari :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत विठूमाऊलीच्या पूजेचा मान अहमदनगर जिल्ह्यातील काळे दांपत्याला मिळाला. भाऊसाहेब आणि मंगल काळे 25 वर्षांपासून पंढरपूरची पायी वारी करत आहेत. माउलीच्या पूजेचा मान मिळाल्याबद्दल त्यांनी खूप आनंद व्यक्त केलाय.

Ashadhi Ekadashi :  आषाढी एकादशीनिमित्त पंंढरपुरात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा

Ashadhi Ekadashi :  आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा पार पडली.. मुख्यमंत्र्यांच्या सोबत मानाचे वारकरी म्हणून नगर जिल्ह्यातील काळे दाम्पत्याला मान मिळाला. आषाढीनिमित्त पंढरपुरात लाखो वारकरी दाखल झाले आहेत.. विठूमाऊलाच्या दर्शनासाठी त्यांचं मन आतूर झालंय.. कधी एकदा विठ्ठलाचं मुखदर्शन होतं अशी भावना त्यांच्या मनात आहे. वारकऱ्यांसाठी प्रशासनानं देखील अनेक सोयीसुविधांची व्यवस्था केलीये.. 

Ashadhi Wari:  आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर नगरीत सर्व पालख्या दाखल झाल्या आहेत

Ashadhi Wari:  आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर नगरीत सर्व पालख्या दाखल झाल्या आहेत.  लाखो वारकऱ्यामुळे पंढरीनगरी दुमदुमली आहे. 

पार्श्वभूमी

 आज (29 जून) आषाढी एकादशी (Aashadhi Wari 2023) आहे. यानिमित्त पंढरपुरात वैष्णवांचा मेळा भरला आहे. या आषाढी वारीनिमित्त राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath shinde) आणि त्यांच्या पत्नी लता शिंदे यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापुजा संपन्न झाली. यावर्षी मानाचे वारकरी म्हणून अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील वाकडी गावातील भाउसाहेब मोहनीराज काळे आणि मंगल भाऊसाहेब काळे या शेतकरी दाम्पत्याला पुजेचा मान मिळाला


बळीराजा कष्टकऱ्याला चांगले दिवस येऊ दे


मोठ्या उत्साहात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath shinde) यांनी सपत्निक विठ्ठल रक्मिणीची  शासकीय महापुजा केली. यावेळी त्यांनी बळीराजाला (Farmers) कष्टकऱ्याला चांगले दिवस येऊ दे .. सुजलाम सुफलाम होऊ दे .. पाऊस पडू दे .. प्रत्येक राज्यातल्या माणसाला चांगले दिवस यावेत हे मागणं विठुरायाच्या चरणी केलं. तसेच मंदिरातील कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगानुसार महागाई आणि घर भत्ता मंजूर करण्याची घोषणा देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. या शासकीय महापूजेवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्यांच्या परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते. याचबरोबर सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, कामगार मंत्री सुरेश ख्याडे, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, आरोग्यमंत्री तानाजी सावंत, मंत्री दादा भुसे, खासदार श्रीकांत शिंदे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा परिषदेचे सीइओ दिलीप स्वामी, देवस्थान समितीचे सह अध्यक्ष गहिणीनाथ महाराज औसेकर महाराज यांच्यासह जिल्ह्यातील खासदार, आमदार अन्य लोकप्रतिनिधी उपस्थित होते.


25 वर्षापासून अहमदनगरच्या काळे दाम्पत्याची वारी


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत मानाचा वारकरी म्हणून अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील वाकडी गावातील भाउसाहेब मोहनीराज काळे आणि मंगल भाऊसाहेब काळे या शेतकरी दाम्पत्याला पुजेचा मान मिळाला. हे दाम्पत्य गेल्या 25 वर्षापासून भास्कर गिरी महाराज यांच्या सोबत देवगड ते पंढरपूर पायी वारी करत आहे.  देवगड ते पंढरपूर अशी पायी वारी हे काळे दापत्य करत आहे. भाऊसाहेब काळे हे व्यवसायाने शेती करतात. काळे दाम्पत्य हे आठ तास दर्शन रांगेत उभे होते. आज आषाढी एकादशी आहे. यानिमित्त राज्याच्या कानाकोपऱ्यातून तसेच परराज्यातून वारकरी पंढरपुरात दाखल झाले आहेत. चंद्रभागेच्या तिरी वैष्णवांचा मेळा भरला आहे. विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या भक्तीत वारकरी तल्लीन झाले आहेत. चंद्रभागेच्या तिरावर विठुनामाचा, ज्ञानोबा तुकोबांचा गजर सुरु आहे.            

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.