एक्स्प्लोर

Ashadhi Wari : 'जय हरी विठ्ठल' म्हणत पंतप्रधान मोदींनी मराठीतून दिल्या एकादशीच्या शुभेच्छा! नक्की काय म्हणाले मोदी?

Ashadhi Wari 2023: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील विठ्ठल भक्तांना आषाढी एकादशीनिमित्त मराठीतून शुभेच्छा दिल्या आहेत.

PM Modi : महाराष्ट्रासह इतर राज्यांतून सुमारे नऊ लाखांहून अधिक वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपुरात (Pandharpur Wari) दाखल झाले आहेत. अवघा महाराष्ट्र (Maharashtra) आज विठ्ठलाच्या भक्तीत न्हाऊन निघाला आहे. राज्यातील विविध विठ्ठल मंदिरात भाविकांनी विठूमाऊलीच्या दर्शनासाठी गर्दी केली आहे. यातच आषाढी वारीनिमित्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी 'जय हरी विठ्ठल' म्हणत विठ्ठल भक्तांना मराठीतून शुभेच्छा दिल्या आहेत.

"सर्वांना आषाढी एकादशीच्या (Ashadhi Ekadashi) हार्दिक शुभेच्छा. हा शुभ दिवस आपल्याला वारकरी परंपरेला अनुसरुन भक्ती, नम्रता आणि करुणा हे भाव अंगीकारण्याची प्रेरणा देवो. भगवान विठ्ठलाच्या आशीर्वादाने, सुखी, शांतताप्रिय आणि सर्वसमावेशक समाजाच्या निर्मितीसाठी आपल्याला नेहमी एकत्र काम करता येऊ दे. जय हरी विठ्ठल!" असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

पंतप्रधान मोदींनी ईदनिमित्तही दिल्या शुभेच्छा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ईद निमित्तही शुभेच्छा दिल्या आहेत. "Eid-ul-Adha च्या शुभेच्छा. हा दिवस सर्वांना सुख-समृद्धी घेऊन येवो. तसेच आपल्या समाजात एकोप्याची आणि सलोख्याची भावना टिकून राहो. ईद मुबारक!" असं म्हणत पंतप्रधान मोदींनी ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

मुख्यमंत्र्यांची सपत्नीक विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा

आषाढी वारीनिमित्त राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि त्यांच्या पत्नी लता शिंदे यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न झाली. आज आषाढी एकादशीनिमित्त संपूर्ण पंढरपूर नगरी टाळ-मृदुंगाच्या गजरात आणि हरिनामाच्या जयघोषात दुमदुमून गेली आहे. बळीराजाला चांगले दिवस येऊ देत. चांगला पाऊस पडू दे, राज्य सुजलाम सुफलाम होऊ दे, शेतकरी-कष्टकरी, कामगार, वारकरी असा राज्यातील प्रत्येक घटक सुखी समाधानी होऊ देत, त्यांच्या आयुष्यात चांगले दिवस येऊ देत, असं साकडं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आज आषाढी एकादशीच्या मुख्य शासकीय महापूजेवेळी विठूरायाच्या चरणी घातलं आहे. आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांच्या पत्नी लता शिंदे तसेच मानाचे वारकरी दाम्पत्य भाऊसाहेब मोहिनीराज काळे आणि मंगल भाऊसाहेब काळे यांच्यासोबत विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा केली. यावर्षी मानाचे वारकरी म्हणून अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील वाकडी गावातील भाऊसाहेब मोहनीराज काळे आणि मंगल भाऊसाहेब काळे या शेतकरी दाम्पत्याला पूजेचा मान मिळाला.
 
हेही वाचा:

Aashadhi Wari 2023 : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्निक विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न, अहमदनगरचे काळे दाम्पत्य ठरले मानाचे वारकरी

महत्त्वाच्या बातम्या

Mangalagaur 2026: यंदा मंगळागौर कधीपासून आहे? लग्नानंतर पहिली 5 वर्षे व्रताची परंपरा काय? व्रताचे फळ? धार्मिक महत्त्व, पूजा पद्धत, तिथी, पौराणिक कथा... 
यंदा मंगळागौर कधीपासून आहे? लग्नानंतर पहिली 5 वर्षे व्रताची परंपरा काय? व्रताचे फळ? धार्मिक महत्त्व, पूजा पद्धत, तिथी, पौराणिक कथा... 
Shravan 2026: श्रावण मासात सत्यनारायण पूजेला मोठं महत्त्व? अनेकजण का करतात ही पूजा? सत्यनारायण म्हणजे कोण? धार्मिक महत्त्व, परंपरा...
श्रावण मासात सत्यनारायण पूजेला मोठं महत्त्व? अनेकजण का करतात ही पूजा? सत्यनारायण म्हणजे कोण? धार्मिक महत्त्व, परंपरा...
Shravan 2026: भगवान शिव स्मशानात वास का करतात? महादेव शरीराला सदैव भस्म का लावतात? शिवपुराणातील उल्लेख जाणून थक्क व्हाल..
भगवान शिव स्मशानात वास का करतात? महादेव शरीराला सदैव भस्म का लावतात? शिवपुराणातील उल्लेख जाणून थक्क व्हाल..
Lord Shiv: शिवलिंगाला चुकूनही पूर्ण प्रदक्षिणा का घातली जात नाही? अर्धीच प्रदक्षिणा का घातली जाते? धार्मिक, शास्त्रीय नियम जाणून थक्क व्हाल..
शिवलिंगाला चुकूनही पूर्ण प्रदक्षिणा का घातली जात नाही? अर्धीच प्रदक्षिणा का घातली जाते? धार्मिक, शास्त्रीय नियम जाणून थक्क व्हाल..

व्हिडीओ

Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
Embed widget