एक्स्प्लोर

Adhik Maas 2023 : श्रावणातील व्रतवैकल्य अधिक श्रावण महिन्यात करु नये, श्रावण महिना 17 ऑगस्ट ते 15 सप्टेंबरपर्यंत : पंचांगकर्ते मोहन दाते

Adhik Maas 2023 : यंदा अधिक महिना असल्याने उद्यापासून अधिक श्रावण महिन्यास सुरुवात होणार आहे. श्रावणातील सगळे व्रत, उपवास 17 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर 2023 या कालावधीत करावे, अधिक मासात करु नयेत. असे पंचांगकर्ते मोहन दाते यांनी स्पष्ट केले. 

Adhik Maas 2023 : आषाढ महिना संपल्यानंतर साधारणत: श्रावणाला सुरुवात होते. मात्र यंदा अधिक महिना (Adhik Mass) असल्याने उद्यापासून अधिक श्रावण महिन्यास (Shravan Month) सुरुवात होणार आहे. यंदा दोन श्रावण मास असल्याने श्रावण महिन्यात केले जाणारे व्रतवैकल्य कधी करायचे? श्रावण सोमवारचे उपवास नेमके कधी करायचे? असे प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत. मात्र हे सगळे व्रत, उपवास 17 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर 2023 या कालावधीत करावे, अधिक मासात करु नयेत. असे पंचांगकर्ते मोहन दाते (Mohan Date) यांनी स्पष्ट केले. 

श्रावणातील सर्व व्रते 17 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर 2023 दरम्यान करावीत

दर तीन वर्षांत एकदा कोणता तरी महिना अधिकमास येतो. दर 19 वर्षांनी पुन्हा तोच महिना अधिकमास येतो, असा एक साधारण नियम आहे. यंदाच्या वर्षी श्रावण महिना अधिक आला आहे. त्यामुळे काही लोकांच्या मनात आठ श्रावण सोमवार असल्याच्या शंका उपस्थित होत आहेत. यापूर्वी 2004 मध्ये अधिक श्रावण महिना आला होता. यावर्षी श्रावण अधिक असल्याने श्रावण मासात केली जाणारी सर्व वार व्रते नीज मासात म्हणजेच 17 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर 2023 या कालावधीत करावे, अधिक मासात करु नयेत, असे पंचांगकर्ते मोहन दाते यांनी स्पष्ट केले. 

अधिक श्रावण महिना 18 जुलै ते 16 ऑगस्टपर्यंत असून त्यानंतर 17 ऑगस्ट ते 15 सप्टेंबरपर्यंत नीज श्रावण मास असणार आहे. श्रावण महिन्यातील सर्व व्रते, सोमवारचे उपवास, मंगळागौर पूजन आदी याच नीज श्रावण (शुद्ध) महिन्यात करावे. त्यामुळे महाराष्ट्रात श्रावणाचे आठ सोमवार नाहीत. केवळ चार श्रावण सोमवार असतील, अशी माहिती पंचागकर्ते मोहन दाते यांनी दिली.

अधिक महिन्यामुळे यंदा गणपतीचं आगमन उशिराने

तसेच अधिक महिन्यामुळे गणपतीचे आगमन हे जवळपास 19 ते 20 दिवस उशिराने होणार आहे. अर्थात 19 सप्टेंबरला गणरायचे आगमन होणार आहे. अधिक श्रावण महिन्यांमध्ये विष्णूच्या पित्यर्थ दानधर्म, जप, पूजा, अनुष्टान, याग इत्यादी गोष्टी करायच्या आहेत. लग्न, मुंज, वास्तुशांत इत्यादी गोष्टी या अधिक महिन्यात करता येणार नाहीत. पण व्यावहारिक गोष्टी आहेत जसे साखरपुडा, बारसा या गोष्टी या अधिक महिन्यांमध्ये देखील करता येतील, अशी माहिती देखील पंचांगकर्ते मोहन दाते यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली.

'आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशीच दीप पूजा करावी'

आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच अमावस्येला आषाढी अमावस्या किंवा दीप अमावस्या असं म्हणतात. श्रावण महिना सुरु होण्याच्या आदल्या दिवशी ही अमवस्या येत असल्याने घरातील दिव्यांची पूजा केली जाते. मात्र ही पूजा अधिक श्रावण महिना सुरु होण्याआधी करावी की नीज श्रावण महिना सुरु होण्याआधी करावी असा प्रश्न देखील काही जण विचारत आहेत. मात्र दिव्यांची पूजा ही आषाढ महिन्यावर आधारित असल्याने आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी (17 जुलै 2023) रोजीच करावी अशी माहिती मोहन दाते यांनी दिली. तसेच रोज आपण वीजेवरील दिव्यांचा, ट्यूबचा वापर करत असतो म्हणून आज ते दिवे स्वच्छ करावेत आणि समई निरांजन स्वच्छ करुन त्यांचे पूजन करावे. असे आवाहन पंचागकर्ते मोहन दाते यांनी दिली.

हेही वाचा

Shravan 2023 : भाविकांचा संभ्रम दूर करणारी बातमी, 18 जुलैपासून अधिक श्रावण तर 17 ऑगस्ट पासून निज श्रावण

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यास पोलिसाकडून मारहाण, व्हिडिओ समोर येताच निलंबन
NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यास पोलिसाकडून मारहाण, व्हिडिओ समोर येताच निलंबन
पोरींचा नाद खुळा... टीम इंडियाचा 304 धावांनी मोठा विजय, मालिकाही जिंकली; मैदानावर चौकार, षटकारांची आतषबाजी
पोरींचा नाद खुळा... टीम इंडियाचा 304 धावांनी मोठा विजय, मालिकाही जिंकली; मैदानावर चौकार, षटकारांची आतषबाजी
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'देवाभाऊ' म्हणताच मुख्यमंत्री फडणवीस गोड हसले; शिंदेही खुलले, पाहा फोटो
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'देवाभाऊ' म्हणताच मुख्यमंत्री फडणवीस गोड हसले; शिंदेही खुलले, पाहा फोटो
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mahakumbh 2025: IIT Bombay चा एरोस्पेस इंजिनिअरकसा बनला साधू? UNCUT कहाणीManjili karad PC : मी मराठा असल्याने जरांगेंनी मला न्याय द्यावा; वाल्मिक कराडच्या पत्नीचं आवाहनWalmik Karad Custody : वाल्मिकला 7 दिवसांची पोलीस कोठडी, वकिलासह समर्थकांचा राडा | VIDEOPM Modi Speech ISKON Temple Navi Mumbai भारताला समजून घेण्यासाठी अध्यात्म समजून घेणं महत्वाचं : मोदी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यास पोलिसाकडून मारहाण, व्हिडिओ समोर येताच निलंबन
NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यास पोलिसाकडून मारहाण, व्हिडिओ समोर येताच निलंबन
पोरींचा नाद खुळा... टीम इंडियाचा 304 धावांनी मोठा विजय, मालिकाही जिंकली; मैदानावर चौकार, षटकारांची आतषबाजी
पोरींचा नाद खुळा... टीम इंडियाचा 304 धावांनी मोठा विजय, मालिकाही जिंकली; मैदानावर चौकार, षटकारांची आतषबाजी
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'देवाभाऊ' म्हणताच मुख्यमंत्री फडणवीस गोड हसले; शिंदेही खुलले, पाहा फोटो
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'देवाभाऊ' म्हणताच मुख्यमंत्री फडणवीस गोड हसले; शिंदेही खुलले, पाहा फोटो
Ladki Bahin Yojna Court Case : मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेबाबत फडणवीस सरकारची कोर्टात महत्त्वाची माहिती; जनहित याचिकेवर सुनावणी
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेबाबत फडणवीस सरकारची कोर्टात महत्त्वाची माहिती; जनहित याचिकेवर सुनावणी
Manoj Jarange : अजित दादा धनंजय मुंडे टोळ्या चालवणारा, उघडा पडला; उपमुख्यमंत्र्यांचं थेट नाव घेत मनोज जरांगेंचा इशारा
अजित दादा धनंजय मुंडे टोळ्या चालवणारा, उघडा पडला; उपमुख्यमंत्र्यांचं थेट नाव घेत मनोज जरांगेंचा इशारा
PM Narendra Modi: पंतप्रधान मोदींचं महायुतीच्या आमदारांना मार्गदर्शन, राज ठाकरेंचा खास उल्लेख; डब्बा पार्टीचा सल्ला
पंतप्रधान मोदींचं महायुतीच्या आमदारांना मार्गदर्शन, राज ठाकरेंचा खास उल्लेख; डब्बा पार्टीचा सल्ला
मोठी बातमी ! कोर्टात SIT चे 7 खळबळजनक दावे; खंडणीला अडथळा ठरल्याने संतोष देशमुखांचा खून, वाल्मिक कराड गोत्यात?
मोठी बातमी ! कोर्टात SIT चे 7 खळबळजनक दावे; खंडणीला अडथळा ठरल्याने संतोष देशमुखांचा खून, वाल्मिक कराड गोत्यात?
Embed widget