(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Relationship: एकाच गुरूंकडून दीक्षा घेणारे पती-पत्नी भाऊ-बहीण होतात का? प्रेमानंद महाराजांनी भक्ताला दिलं आश्चर्यकारक उत्तर
Lifestyle : अलीकडेच प्रेमानंद महाराजांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये एक भक्त त्यांना विचित्र प्रश्न विचारताना दिसत होता.
Relationship Tips : आजकाल वृंदावनच्या प्रेमानंद महाराजांचे (Premanand Maharaj) व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होताना दिसत आहेत. प्रेमानंद महाराजांच्या प्रत्येक व्हिडीओमध्ये ते त्यांच्या भक्तांच्या विविध प्रश्नांना उत्तरं देताना दिसतात. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओंमध्ये तेआपल्या भक्तांच्या मनातील शंका दूर करताना दिसत आहे. प्रेमानंद महाराजांकडे दररोज हजारो लोक धर्म आणि जगाशी संबंधित अनेक प्रश्न घेऊन येतात आणि योग्य उत्तरे मिळाल्यावर समाधानी होतात. केवळ सामान्य लोकच नाही, तर देशातील अनेक महान संत आणि सेलिब्रिटी देखील प्रेमानंद महाराजांचे भक्त आहेत. (Premanand Maharaj Viral Video)
भक्ताने विचारला विचित्र प्रश्न
अलीकडेच प्रेमानंद महाराजांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये एक भक्त त्यांना विचित्र प्रश्न विचारताना दिसत होता. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती प्रेमानंद महाराजांना प्रश्न विचारताना दिसत आहे, भक्त म्हणतो की, 'गुरूंकडून दीक्षा घेतल्यावर पती-पत्नी भाऊ-बहीण होतात का? कारण गुरूंकडून दीक्षा घेणारे भाऊ आणि बहिण होत असतील? असा विचित्र प्रश्न भक्ताने विचारताच उपस्थितांच्याही भुवया उंचावल्या, पण यावर प्रेमानंद महाराजांनी शांतपणे याचे उत्तर दिले. काय उत्तर दिले, ते जाणून घ्या...
प्रेमानंद महाराज काय म्हणाले?
प्रेमानंद महाराज म्हणाले की, भगवंताच्या मार्गात कोणाशीही भेदभाव नाही. पती-पत्नीने एकाच गुरूकडून दीक्षा घेतली असली तरी ते पती-पत्नीच राहतील आणि भाऊ-बहीण होणार नाहीत. कारण पती-पत्नीचे नाते हे ऐहिक असते आणि गुरू-शिष्याचे नाते अलौकिक असते. पती-पत्नीचे नाते आयुष्यभराचे असते तर गुरू आणि शिष्याचे नाते अतूट असते.
प्रेमानंद महाराज असेही म्हणाले...
प्रेमानंद महाराज म्हणाले की, 'गुरू कधीही स्त्री-पुरुष शरीरात भेद करत नाहीत, कारण शरीर नाशवंत आहे. गुरू शरीरात जे आहे ते योग्य मार्गावर चालण्यासाठी प्रेरित करतात. स्त्री-पुरुषाच्या शरीरात जे काही आहे ते ईश्वराचा अंश आहे, ते अविनाशी आहे. गुरु हे त्यांच्यासाठी ईश्वरप्राप्तीचे माध्यम आहे.
हेही वाचा>>>
Relationship : 'माझा मुलगा एका विवाहित महिलेसोबत राहतोय, लिव्ह इन रिलेशनशिपबाबत प्रेमानंद महाराजांनी भक्ताला सांगितली 'अंदर की बात!'
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )